1
|
परमेश्वरा, तुझ्या देशाला दया दाखव. याकोबाचे लोक परदेशात कैदी आहेत. कैद्यांना त्यांच्या देशात परत आण. |
2
|
परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर. त्यांची पापे पुसून टाक. |
3
|
परमेश्वरा, रागावणे सोडून दे. क्रोधित होऊ नकोस. |
4
|
देवा, तारणहारा, आमच्यावर रागावणे सोडून दे. आणि आमचा पुन्हा स्वीकार कर. |
5
|
तू आमच्यावर कायमचा रागावणार आहेस का? |
6
|
कृपा करुन आम्हाला पुन्हा जगू दे. तुझ्या लोकांना सुखी कर. |
7
|
परमेश्वरा, आम्हाला वाचव आणि तू आमच्यावर प्रेम करतोस ते दाखव. |
8
|
परमेश्वर देव काय म्हणाला ते मी ऐकले. तो म्हणाला की त्याच्या लोकांसाठी येथे शांती असेल, जर ते त्यांच्या मूर्ख जीवन पध्दतीकडे परत वळले नाहीत तर त्याच्या भक्तांना शांती लाभेल. |
9
|
देव लवकरच त्याच्या भक्तांना वाचवील. आम्ही परत मानाने आमच्या जमिनीवर राहू. |
10
|
देवाचे खरे प्रेम त्याच्या भक्तांना भेटेल. चांगुलपणा आणि शांती त्यांचे चुंबन घेऊन त्यांचे स्वागत करील. |
11
|
पृथ्वीवरचे लोक देवाशी प्रामाणिक राहातील आणि स्वर्गातला तो देव त्यांच्याशी चांगला वागेल. |
12
|
परमेश्वर आपल्याला खूप चांगल्या गोष्टी देईल. जमीन खूप चांगली पिके देईल. |
13
|
देवाच्या समोर चांगुलपणा जाईल आणि त्याच्यासाठी मार्ग तयार करील. 14 |
Psalms 85:1 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...