Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Psalms Chapters

Psalms 71 Verses

Bible Versions

Books

Psalms Chapters

Psalms 71 Verses

1 परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही.
2 तुझ्या चांगुलपणात तू मला वाचवशील. तू माझी सुटका करशील, माझ्याकडे लक्ष दे आणि मला वाचव.
3 माझा किल्ला हो, सुरक्षित ठिकाणी धावत जाण्याचे माझे घर तू हो, तू माझे सुरक्षित ठिकाण माझा खडक आहेस. तेव्हा मला वाचवण्याची आज्ञा दे.
4 देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव. मला वाईट, पापी लोकांपासून वाचव.
5 प्रभु, तू माझी आशा आहेस मी तरुण मुलगा असल्यापासूनच तुझ्यावर विश्वास टाकला आहे.
6 जन्माला यायच्या आधीपासूनच मी तुझ्यावर अवलंबून आहे मी माझ्या आईच्या शरीरात होतो तेव्हा पासूनच तुझ्यावर विसंबून होतो मी नेहमीचतुझी प्रार्थना केली.
7 तू माझ्या शक्तीचा ठेवा आहेस म्हणून मी दुसऱ्यांसाठी एक उदाहरण झालो.
8 तू केलेल्या अद्भुत गोष्टींचे मी नेहमी गुणगान करीत असतो.
9 केवळ मी आता म्हातारा झालो आहे म्हणून मला दूर लोटू नकोस, माझी शक्ती क्षीण होत असताना मला सोडून जाऊ नकोस.
10 माझ्या शंत्रूंनी माझ्याविरुध्द योजना आखल्या आहेत. ते लोक खरोखरच एकत्र आले, भेटले आणि मला मारण्याची योजना त्यांनी आखली.
11 माझे शत्रू म्हणाले, “जा त्याला पकडा देवाने त्याला सोडले आहे आणि कोणीही माणूस त्याला मदत करणार नाही.”
12 देवा, मला सोडून जाऊ नकोस. देवा, त्वरा कर! ये आणि मला वाचव.
13 माझ्या शत्रूंचा पराभव कर. ते मला इजा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना त्याबद्दल लाज वाटावी अशी माझी इच्छा आहे.
14 नंतर मी तुझ्यावर नेहमीच विश्वास ठेवीन आणि मी तुझी जास्त स्तुती करीन.
15 तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन, तू जेव्हा जेव्हा मला वाचवलेस त्याबद्दलही मी सांगेन. ते प्रसंग मोजता न येण्याइतके अगणित होत.
16 मी तुझ्या मोठेपणाबद्दल सांगेन, परमेश्वरा, माझ्या प्रभु मी केवळ तुझ्याबद्दल आणि तुझ्या चांगुलपणाबद्दल बोलेन.
17 देवा, तू मला मी लहान मुलगा होतो तेव्हापासून शिकवीत आहेस आणि आजच्या दिवसापर्यंत मी लोकांना तू करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगितले.
18 आता मी म्हातारा झालो आहे आणि माझे केस पांढरे झाले आहेत. पण देवा, तू मला सोडून जाणार नाहीस हे मला माहीत आहे. मी प्रत्येक नव्या पिढीला तुझ्या सामर्थ्याबद्दल आणि महानतेबद्दल सांगेन.
19 देवा, तुझा चांगुलपणा आकाशापेक्षाही उंच आहे. देवा, तुझ्यासारखा देव कुठेही नाही. तू अद्भुत गोष्टी केल्या आहेस.
20 तू मला संकटे आणि वाईट काळ दाखविलास परंतु तू मला त्या प्रत्येकातून वाचविलेस आणि मला जिवंत ठेवलेस. मी कितीही खोल बुडालो तरी तू मला माझ्या संकटांतून वर खेचलेस.
21 पूर्वीपेक्षाही महान गोष्टी करण्यास मला मदत कर. माझे सांत्वन करणे चालूच ठेव.
22 आणि मी तंतुवाद्य वाजवून तुझी स्तुती करीन. देवा, तुझ्यावर विश्वास टाकणे शक्य आहे असे गाणे मी गाईन. माझ्या तंतुवाद्यावर मी इस्राएलाच्या पवित्र देवासाठी गाणी वाजवीन.
23 तू माझ्या आत्म्याचा उध्दार केलास. माझा आत्मा आनंदी होईल. मी माझ्या ओठांनी स्तुतिगीते गाईन.
24 माझी जीभ नेहमी तुझ्या चांगुलपणाची गाणी गाईल आणि ज्या लोकांना मला ठार मारायची इच्छा होती त्यांचा पराभव होईल आणि ते कलंकित होतील.

Psalms 71:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×