1
|
परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा. |
2
|
त्यांचे गुणवर्णन करा. परमेश्वराच्या मंदिरात उभे राहाणाऱ्या लोकांनो, आमच्या देवाच्या मंदिराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, त्याची स्तुती करा. |
3
|
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याच्या नावाचे गुणगान करा. कारण तो चांगला आहे. |
4
|
परमेश्वराने याकोबला निवडले. इस्राएल देवाचा आहे. |
5
|
परमेश्वरा महान आहे हे मला माहीत आहे. आमचा प्रभु सगळ्या देवांपेक्षा महान आहे. |
6
|
परमेश्वर त्याला हवे ते पृथ्वीवर आणि स्वर्गात समुद्रात आणि खोल महासागरात करत असतो. |
7
|
देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो. विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो. |
8
|
देवाने मिसर मधले सगळे पहिल्यांदा जन्माला आलेले पुरुष आणि प्राणी मारुन टाकले. |
9
|
देवाने मिसरमध्ये अनेक अद्भूत आणि चमत्कारिक गोष्टी केल्या. देवाने फारो आणि त्याच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत या गोष्टी केल्या. |
10
|
देवाने पुष्कळ राष्ट्रांचा पराभव केला. देवाने शक्तिशाली राजांना मारले. |
11
|
देवाने अमोऱ्याच्या सिहोन राजाचा पराभव केला. देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. देवाने कनानमधल्या सर्व राष्ट्रांचा पराभव केला. |
12
|
आणि देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली. देवाने ती जमीन त्याच्या लोकांना दिली. |
13
|
परमेश्वरा, तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील. परमेश्वरा, लोकांना तुझी नेहमी आठवण येईल. |
14
|
परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली. पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता. |
15
|
दुसऱ्या लोकांचे देव केवळ सोन्याचांदीचे पुतळे होते. त्यांचे देव म्हणजे लोकांनी केलेले पुतळे होते. |
16
|
त्या पुतळ्यांना तोंड होते पण ते बोलू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना डोळे होते पण ते पाहू शकत नव्हते. |
17
|
पुतळ्यांना कान होते पण ते ऐकू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना नाक होते पण ते वास घेऊ शकत नव्हते. |
18
|
आणि ज्या लोकांनी हे पुतळे केले तेही या पुतळ्यांसारखेच होतील. का? कारण त्यांनी त्या पुतळ्यांवर मदतीसाठी विश्वास टाकला होता. |
19
|
इस्राएलाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. अहरोनाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. |
20
|
लेवीच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. |
21
|
परमेश्वराला सियोनहून त्याचे घर असलेल्या यरुशलेममधून धन्यवाद मिळोत. परमेश्वराची स्तुती करा. |
Psalms 135:1 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...