Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Lamentations Chapters

Lamentations 1 Verses

Bible Versions

Books

Lamentations Chapters

Lamentations 1 Verses

1 एके काळी काळी यरुशलेम लोकांनी गजबजलेली नगरी होती. पण आता ती अगदी ओसाड झाली आहे. यरुशलेम जगातील मोठ्या नगरांमधील एक होती. पण आता ती वधवेप्रमाणे झाली आहे. एके काळी ती नगरांमधील राजकुमारी होती. पण आता तिला दासी केले गेले आहे.
2 रात्री ती खूप दु:काने रडतेतिच्या गालांवर अश्रु ओघळतात. पण तिचे सांत्वन करणारे नाही. खूप राष्ट्रांशी तिची मैत्री होती. पण आता तिचे दु:ख हलके करणारे कोणीही नाही. तिच्या सर्व मित्रांनी तिच्याकडे पाठ फिरविली. तिचे मित्रच तिचे शत्रू झाले.
3 यहूदाने फार सोसले. नंतर यहूदाला कैद करून परमुलुखांत नेले गेले. यहूदा इतर राष्ट्रंमध्ये जगते, पण तिला आराम मिळाला नाही. तिचा पाठलाग करणाऱ्यांनी तिला पकडले. अरूंद दरीत त्यांनी तिला गाठले.
4 सियोनचे रस्ते दु:खी आहेतकारण आता पूर्वकाळासाठी कोणीही कधीही सियोनकडे येत नाही. सियोनची सर्व दारे नष्ट केली गेली. तिचे याजक उसासे टाकतात. तिच्या तरुणींना पकडून नेले आहे ह्य सर्वामुळे ती दु:खी कष्टी झाली आहे.
5 यरुशलेमच्या शत्रूंची जीत झाली आहे. त्यांना यश मिळाले आहे. परमेश्वराने तिला शिक्षा केली म्हणून असे झाले. त्याने यरुशलेमच्या पापांबद्दल तिला शिक्षा केली. तिची मुले दूर निघून गेली. त्यांचे शत्रू त्यांना पकडून घेऊन गेले.
6 सियोनकन्येचे सौंदर्य सरले. तिचे राजपुत्र हरणांसारखे झाले. चरण्यासाठी कुरण नसणाऱ्या हरणांसारखे ते झाले. ते हतबल होऊन पळाले. त्यांचा पाठलाग करणाऱ्यांपासून ते लांब पळाले.
7 यरुशलेम मागचा विचार करते. यरुशलेमला ती दुखावली गेल्याची व बेघर झाल्याची आठवण आहे. पूर्वी तिच्याजवळ असलेल्या चांगल्या गोष्टींचे तिला स्मरण आहे. तिच्या लोकांना शत्रूने पकडल्याचे तिला स्मरते तिला मदत करणारे कोणीही नव्हते हेही तिला आठवते. तिचे शत्रू तिला पाहताच हसले. कारण तिचा नाश झाला
8 यरुशलेमने फार पाप केले. तिच्या पापांमुळेच ती भग्नावशेष उरली. लोकांनी पाहून चुकचुकावे असेच ते रूप होय. पूर्वी लोकांनी तिचा आदर केला. पण आता तेच तिचा तिरस्कार करतात. त्यानी तिची निर्भर्त्सना केली म्हमून ते आता तिची घृणा करतात. यरुशलेम आता कण्हत आहे. ती तोंड फिरविते.
9 यरुशलेमची वस्त्रे मळीन झाली. तिच्यावर बितणाऱ्या गोष्टींची तिला कल्पना नव्हती. तिचे पतन विस्मयकारक होते. तिचे सांत्वन करणारे कोणीही नव्हते. “हे परमेश्वरा” ती म्हणते, “माझी दशा काय झाली आहे पाहा! माझा शत्रू त्याच्या मोठेपणाचा कसा तोरा मिळवितो आहे ते पाहा!”
10 शत्रूने हात लाबंवून तिच्या सर्व चांगल्या गोष्टी घेतल्या. खरे तर, तिने परकीय राष्टांना तिच्या मंदिरात जाताना पाहिले. पण परमेश्वरा, तू तर म्हणालास की ते आपल्या समूहात येऊ शकणार नाहीत.
11 यरुशलेममधील सर्व लोक उसासे टाकत आहेत. ते अन्न शोधत आहेत. तो अन्नाच्या बदल्यात त्यांच्याजवळच्या चांगल्या वस्तू देऊन टाकत आहेत. जगण्यासाठी ते असे करीत आहेत. यरुशलेम म्हणते, “परमेश्वरा, माझ्याकडे जरा पाहा! लोक माझा तिरस्कार कसा करतात ते बघ तरी!
12 रस्त्यावर जाणाऱ्या-येणाऱ्यांनो, तुम्हाला काहीच वाटत नाही असे दिसते! पण जरा माझ्याकडे निरखून पाहा. माझ्या वेदनेप्रमाणे आणखी दुसऱ्या कोणाच्या विदना आहेत का? माझ्या वाठ्याला आलेल्या यातनांप्रमाणे दुसऱ्या काही यातना आहेत का? परमेश्वराने शिक्षा म्हणून मला दिलेल्या विदनेप्रमाणे दुसऱ्या वेदना आहेत का? त्याच्या कोपाच्या दिवशी त्याने मला शिक्षा केली आहे.
13 परमेश्वराने वरून ज्वाला पाठविली, ती माझ्या हाडात भिनली. त्याने माझ्या पायात फास अडकविला. आणि मला गरगर फिरविले. त्याने मला ओसाड बनविले. मला दिवसभर बरे वाटत नसते.
14 “माझी पापे परमेश्वराने आपल्या स्वत:च्या हाताने जोखडाप्रमाणे जखडली आहेत. परमेश्वराचे जोखड माझ्या मानेवर आहे. परमेश्वराने मला दुर्बळ केले. ज्यांच्या समोर मी उभी राहू शकणार नाही, अशांच्या हाती परमश्वराने मला दिले आहे.
15 “माझ्या शूर सैनिकांना परमेश्वराने दूर लोटले. मग माझ्या विरुध्द लढण्यासाठी व माझ्या तरुण सैनिकांना मारण्यासाठी परमेश्वराने काही लोक आणले. देवाने द्राक्षकुंडातील द्राक्षे तुडविली. ते द्राक्षकुंड यरुशलेमच्या कुमारी कन्येचे आहे.
16 “हग्र सगळयाबद्दल मी आक्रोश करते. माझ्या डोळयांतून अश्रू पाण्याप्रमाणे वाहात आहेत. सांत्वन करायला माझ्याजवळ कोणी नाही. माझे दु:ख हलके करणारा कोणीही नाही. माझी मुले ओसाड भूमीप्रमाणे झाली आहेत, कारण शत्रूचा विजय झाला आहे.”
17 सियोनने मदतीसाठी हात पसरले. तिला मदत करणारे कोणीही नव्हते. परमेश्वराने याकोबाच्या शत्रूंना हुकूम केला आहे. परमेश्वराने याकोबच्या शत्रूंना नगराला वेढा देण्याची आज्ञा दिली. यरुशलेम तिच्या शत्रूंमध्ये अपवित्र आहे.
18 आता यरुशलेम म्हणते, “मी परमेश्वराचे ऐकण्याचे नाकारले. म्हणून परमेश्वर जे करीत आहे. ते योग्यच होय. तेव्हा सर्व लोकांनो, ऐका! माझ्या यातना पाहा! माझे तरुण तरुणी कैदी झाले आहेत.
19 मी माझ्या प्रियकरांना हाका मारल्या पण त्यांनी मला फसविले. माझे पुजारी आणि वृध्द नगरीत वारले. ते स्वत:साठी अन्न शोधीत होते. त्यांना जगायचे होते.
20 “परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! मी दु:खी झाले आहे. माझे अंत:करण अस्वस्थ झाले आहे माझ्या मनात खळबळ उडाली आहे. असे होण्याचे कारण माझा हट्टी स्वभाव रस्त्यांवर माझी मुले तलवारीने मारण्यात आली. तर घरा घरांत प्रत्यक्ष मृत्यू होता.
21 “माझे ऐका मी उसासे टाकीत आहे. माझे सांत्वन करणारा कोणीही नाही. माझा त्रासाबद्दल माझ्या शत्रूंना कळले आहे. त्यांना आनंद झाला आहे. तू माझे असे केल्यामुळे ते आनंदित झाले आहेत. तू म्हणालास की शिक्षेची वेळ येईल. व तू माझ्या शत्रूंना शिक्षा करशील. आता म्हटल्याप्रमाणे कर. माझ्याप्रमाणेच त्यांची स्थिती होऊ दे.
22 “माझे शत्रू किती दुष्ट आहेत ते पाहा! मग माझ्या पापांमुळे तू माझ्याशी जसे वागलास तसाच तू त्यांच्याशी वागू शकशील. तू असे कर कारण मी पुन्हा पुन्हा उसासत आहे. माझे हृदय म्लान झाले आहे म्हणून तरी असेच कर.

Lamentations 1 Verses

Lamentations 1 Chapter Verses Marathi Language Bible Words display

COMING SOON ...

×

Alert

×