1
|
मी संकटात होतो, मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने मला वाचवले. |
2
|
परमेश्वरा, माझ्याविषयी खोट बोलणाऱ्या लोकांपासून मला वाचव. त्या लोकांनी खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगितल्या. |
3
|
खोटारड्यांनो तुम्हाला काय मिळणार आहे ते माहीत आहे का? त्यापासून तुमचा काय फायदा होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे का? |
4
|
सैनिकाचे अणकुचीदार बाण आणि जळते निखारे तुम्हाला शिक्षा म्हणून मिळतील. |
5
|
खोटारड्यांनो, तुमच्याजवळ राहाणे म्हणजे मेशेखात राहाण्यासारखे आहे, केदारच्या तंबून राहाण्यासारखे आहे |
6
|
शांतीचा तिरस्कार करणाऱ्या लोकांजवळ मी खूप काळ राहिलो आहे. |
7
|
मी म्हणालो, मला शांती हवी, म्हणून त्यांना युध्द हवे आहे. |
Psalms 120:1 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...