1
|
परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते? इस्राएल, मला उत्तर दे. |
2
|
लोकांनी आपल्यावर हल्ला केला तेव्हा जर परमेश्वर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते? |
3
|
आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते. |
4
|
आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते. नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते. |
5
|
गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे आपल्या तोंडापर्यंत येऊन आपल्याला बुडवले असते. |
6
|
परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रूंना आपल्याला पकडू दिले नाही आणि ठार मारु दिले नाही. |
7
|
जाळ्यात सापडलेल्या आणि नंतर त्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे आपण आहोत. जाळे तुटले आणि आपण त्यातून सुटलो. |
8
|
परमेश्वराकडून आपली मदत आली. परमेश्वराने पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केला. |
Psalms 124:1 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...