1
|
परमेश्वराची स्तुती करा. स्वर्गातल्या देवदूतांनो स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा. |
2
|
सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा. |
3
|
सूर्य - चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा. |
4
|
सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा. आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा. |
5
|
परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा. का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली. |
6
|
देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती त्या सदैव राहाव्यात म्हणून केली. देवाने कधीही न संपणारे नियम केले. |
7
|
पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा. महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा. |
8
|
देवाने अग्न्नी आणि गारा, बर्फ आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली. |
9
|
देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे आणि देवदार वृक्ष निर्मिले. |
10
|
देवाने सर्व जंगली प्राणी आणि पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले. |
11
|
देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले. त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले. |
12
|
देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या. देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली. |
13
|
परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा. त्याच्या नावाला सदैव मान द्या. स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा. |
14
|
देव त्याच्या माणसांना बलवान करील. लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील. लोक इस्राएलची स्तुती करतील. हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो. परमेश्वराची स्तुती करा. |
Psalms 148:1 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...