Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

1 Corinthians Chapters

1 Corinthians 11 Verses

Bible Versions

Books

1 Corinthians Chapters

1 Corinthians 11 Verses

1 मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करणारे व्हा.
2 मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी जी शिकवण तुम्हाला दिली, ती तुम्ही काटेकोरपणे पाळता.
3 परंतु तुम्हाला हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे. आणि प्रत्येक पुरुष हा स्त्रीचे मस्तक आहे, आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे.
4 प्रत्येक मनुष्य जो प्रार्थना करताना किंवा देवाकडून आलेला संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो मस्तकाला लज्जा आणतो.
5 परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक न झाकता लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते. कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे.
6 जर स्त्री आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कापून घ्यावेत. परंतु केस कापणे किंवा मुंडण करणे स्त्रीस लज्जास्पद आहे. तिने आपले मस्तक झाकावे.
7 ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे.
8 पुरुष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे.
9 आणि मनुष्य स्त्रीकरिता निर्माण केला गेला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण केली गेली.
10 यासाठी देवाने स्त्रीला अधिकार दिलेला आहे त्याचे चिन्ह म्हणून तिने आपले मस्तक आच्छादावे व देवदूतांकरितासुद्धा तिने हे करावे.
11 तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरुष स्त्रीपासून स्वतंत्र नाही.
12 कारण स्त्री जशी पुरुषापासून आहे, तसा पुरुषही स्त्रीपासून जन्माला येतो. परंतु सर्व गोष्टी देवापासून आहेत.
13 हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता सभेत देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का?
14 पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हाला शिकवीत नाही काय?
15 परंतु स्त्रीने लांब केस राखणे हा तिचा मान आहे कारण तिला तिचे केस निसर्गत: आच्छादनासाठी दिले आहेत.
16 जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रुढी नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही.
17 पण आता ही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही, कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमची हानि होते.
18 प्रथम, मी ऐकतो की, जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही एकत्र जमता, तेथे तुमच्यामध्ये गट असतात, आणि काही प्रमाणात ते खरे मानतो.
19 (तरीही तुम्हांमध्ये पक्ष असावेत) यासाठी की, जे तुमच्यामध्ये पसंतीस उतरलेले आहेत ते प्रगट व्हावेत.
20 म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभुभोजन घेत नाही.
21 कारण तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्हांतील प्रत्येक जण अगोदरच आपले स्वत:चे भोजन करतो. एक भुकेला राहतो तर दुसरा प्यायलेला असतो.
22 खाण्यापिण्यासाठी तुम्हांला घरे नाहीत का? का तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ मानता आणि जे गरीब आहेत त्यांना खिजविता? मी तुम्हांला काय म्हणू? मी तुमची प्रशंसा करु काय? याबाबतीत मी तुमची प्रशंसा करीत नाही.
23 कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हांला दिले. प्रभु येशूला ज्या रात्री मारण्यासाठी धरुन देण्यात आले. त्याने भाकर घेतली.
24 आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, ‘हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.ʆ
25 त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने द्राक्षारसाचा प्याला घेतला आणि म्हणाला, “हा द्राक्षारसाचा प्याला माइया रक्ताने स्थापित केलेला नवा करार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही द्राक्षारस प्याल तेव्हा माझी आठवण करण्यासाठी हे करा.”
26 कारण जितके वेळा तुम्ही ही भाकर खाता व हा द्राक्षारसाचा प्याला पिता, तितके वेळा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
27 म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खातो किंवा द्राक्षारसाचा प्याला पितो. तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल.
28 पंरतु मनुष्याने स्वत:ची परीक्षा करावी. आणि नंतर भाकर खावी किंवा द्राक्षारसाचा प्याला प्यावा.
29 कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व द्राक्षारसाचा प्याला पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वत:वर न्याय ओढवून घेतो.
30 याच कारणामुळे तुम्हांतील अनेक जण आजारी आहेत. आणि पुष्कळजण झोपलेले आहेत.
31 परंतु जर आम्ही आमची परीक्षा करु तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही.
32 प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हांला शिस्त लावण्यात येते, यासाठी की, जगातील इतर लोकांबरोबर आम्हांलाही शिक्षा होऊ नये.
33 म्हणून माइया बंधूनो, जेव्हा तुम्ही भोजनास एकत्र येता, तेव्हा एकमेकांसाठी थांबा.
34 जर कोणी खरोखरच भुकेला असेल तर त्याने घरी खावे यासाठी की तुम्ही न्यायनिवाड्यासाठी एकत्र जमू नये. मी येईन तेव्हा इतर गोष्टी सुरळीत करुन देईन.

1-Corinthians 11:13 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×