Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Psalms Chapters

Psalms 89 Verses

Bible Versions

Books

Psalms Chapters

Psalms 89 Verses

1 मी सदैव परमेश्वराच्या प्रेमाचे गाणे गाईन मी सदैव त्याच्या इमानदारीचे गाणे गाईन.
2 परमेश्वरा, तुझे प्रेम सार्वकालिक आहे यावर माझा विश्वास आहे. तुझी इमानदारी आकाशा इतकी अथांग आहे.
3 देव म्हणाला, “मी निवडलेल्या राजाशी करार केला. मी दावीदला, माझ्या सेवकाला वचन दिले.
4 दावीद, मी तुझा वंश चालू राहील असे करीन. तुझे राज्य सदैव राहील असे मी करीन.”
5 परमेश्वरा, तू अद्भुत गोष्टी करतोस याबद्दल स्वर्ग तुझी स्तुती करतात. लोक तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. पवित्र लोकांची सभा याबद्दलचे गाणे गाते.
6 स्वर्गातला कोणीही परमेश्वरा समान नाही. “देवा” पैकी कुणाचीही परमेश्वराशील तुलना होऊ शकत नाही.
7 देव पवित्र लोकांना भोटतो. ते देवदूत त्याच्या सभोवती असतात. ते देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात. ते भयग्रस्त होऊन त्याच्या भोवती उभे राहातात.
8 सर्वशाक्तिमान परमेश्वरा, देवा, तुझ्यासारखा कुणीही इथे नाही. आम्ही तुझ्यावर संपूर्ण विश्वास टाकू शकतो.
9 तू गर्वाने समुद्रावर राज्य करतोस तू त्याच्या क्रोधित लाटांना शांत करु शकतोस.
10 देवा, तू राहाबचा पराभव केलास तू तुझ्या बलवान बाहूंनी तुझ्या शत्रूंना इतस्तत पांगवलेस.
11 देवा, स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वगोष्टी तुझ्या आहेत, तूच जग आणि त्यातल्या सर्वगोष्टी निर्माण केल्यास.
12 उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या सर्व गोष्टी तूच निर्माण केल्यास ताबोर पर्वत आणि हार्मोन पर्वत तुझ्या नावाचा जयजयकार करतात.
13 देवा, तुझ्याजवळ शक्ती आहे. तुझीशक्ती महान आहे. विजय तुझाच आहे.
14 तुझे राज्य सत्य आणि न्याय यावर वसलेले आहे. प्रेम आणि सत्य तुझ्या सिंहासनासमोर सेवक आहेत.
15 देवा, तुझे इमानी भक्त खरोखरच सुखी आहेत. ते तुझ्या दयेच्या प्रकाशात जगतात.
16 तुझे नाव त्यांना नेहमी आनंद देते. ते तुझ्या चांगलुपणाची स्तुती करतात.
17 तू त्यांची अद्भुत शक्ती आहेस. त्यांची शक्ती तुझ्यापासूनच येते.
18 परमेश्वरा, तू आमचा रक्षणकर्ता आहेस. इस्राएलचा पवित्र देव आमचा राजा आहे.
19 तू तुझ्या भक्तांशी दृष्टांतात बोललास आणि म्हणालास, “मी गर्दीतला एक माणूस निवडला आणि त्या माणसाला महत्व दिले. मी त्या तरुण सैनिकाला बलवान केले.
20 माझा सेवक दावीद मला सापडला आणि मी त्याला माझ्या खास तेलाने अभिषेक केला.
21 मी दावीदला माझ्या उजव्या हाताने आधार दिला आणि माझ्या शक्तीने मी त्याला बलवान केले.
22 त्या निवडलेल्या राजाचा शत्रू पराभव करु शकला नाही. दुष्टलोक त्याचा पराभव करु शकले नाहीत.
23 मी त्याच्या शत्रूंना संपवले, जे लोक माझ्या निवडलेल्या राजाचा तिरस्कार करीत होते त्यांचा मी पराभव केला.
24 माझ्या निवडलेल्या राजावर मी नेहमी प्रेम करीन आणि त्याला मदत करीन. मी त्याला नेहमी सामर्थ्यवान बनवेन.
25 मी माझ्या निवडलेल्या राजाला समुद्राच्या हाती सोपवले, तो नद्यांना काबूत ठेवल.
26 तो मला म्हणेल, ‘तुम्ही माझे वडील आहात तू माझा देव आहेस माझा खडक माझा तारणारा आहेस.’
27 आणि मी त्याला माझा पहिला मुलगा बनवेन. तो पृथ्वीवरचा महान राजा असेल.
28 माझे प्रेम त्या राजाचे सदैव रक्षण करेल त्याच्या बरोबरचा माझा करार कधीही संपणार नाही.
29 त्याचा वंश सदैव चालू राहील. स्वर्ग असेपर्यंत त्याचे राज्य असेल.
30 जर त्याचे वंशज माझा कायदा पाळायचे थांबवतील आणि माझ्या आज्ञा पाळणे बंद करतील तर मी त्यांना शिक्षा करेन.
31 जर त्या निवडलेल्या राजाच्या वंशजांनी माझे नियम मोडले.
32 आणि माझ्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले तर मी त्यांना जबरदस्त शिक्षा करेन.
33 परंतु त्या लोकांवरचे माझे प्रेम मी कधीच बाजूला करणार नाही. मी त्यांच्याशी नेहमी निष्ठावान राहीन.
34 मी दावीदशी झालेला माझा करार मोडणार नाही. मी आमचा करार बदलणार नाही.
35 माझ्या पवित्रतेतून मी त्याला वचन दिले आहे आणि मी दावीदशी खोटे बोलणार नाही.
36 दावीदाचा वंश सदैव चालू राहील. त्याचे राज्य सूर्य असे पर्यंत राहील.
37 ते चंद्राप्रमाणे सदैव राहील. आकाश या कराराचा पुरावा आहे त्या करारावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.”
38 पण देवा, तू तुझ्या निवडलेल्या राजावर रागावलास आणि तू त्याला एकटे सोडून दिलेस.
39 तू तुझा करार पाळला नाहीस. तू राजाचा मुकुट धुळीत फेकून दिलास.
40 तू राजाच्या नगरातील भिंती पाडल्यास. तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस.
41 लोक जाता जाता त्याच्या वस्तू चोरतात. त्याचे शेजारी त्याला हसतात.
42 तू राजाच्या सर्व शत्रूंना आनंदी केलेस. तू त्याच्या शत्रूंना युध्द जिंकू दिलेस.
43 देवा, तू त्यांना स्व:तचे रक्षण करायला मदत केलीस. तू तुझ्या राजाला युध्द जिंकायला मदत केली नाहीस.
44 तू त्याला युध्द जिंकू दिले नाहीस. तू त्याचे सिंहासन जमिनीवर फेकलेस.
45 तू त्याचे आयुष्य कमी केलेस. तू त्याला शरम आणलीस.
46 परमेश्वरा, हे किती काळ चालणार आहे? तू आमच्याकडे सदैव दुर्लक्ष करणार आहेस का? तुझा राग अग्रीसारखा सदैव धुमसत राहाणार आहे का?
47 माझे आयुष्य किती लहान आहे ते लक्षात ठेव तू आम्हाला छोटे आयुष्य जगण्यासाठी व नंतर मरुन जाण्यासाठी निर्माण केलेस.
48 कोणीही माणूस जगून कधीही मरणार नाही असे होणार नाही. कोणीही थडगे चुकवू शकणार नाही.
49 देवा, तू पूर्वी दाखवलेले प्रेम कुठे आहे? तू दावीदला त्याच्या कुटुंबाशी इमान राखण्याचे वचन दिले होतेस.
50 प्रभु, तुमच्या सेवकाचा लोकांनी कसा अपमान केला होता ते लक्षात ठेवा. परमेश्वरा, तुझ्या शत्रूंनी केलेल्या सर्व अपमानांना मला तोंड द्यावे लागले. त्या लोकांनी तू निवडलेल्या राजाचा अपमान केला.
52 परमेश्वराला सदैव दुवा द्या. आमेन आमेन.

Psalms 89:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×