1
|
परमेश्वरा, देवा, तू माझा तारणारा आहेस. मी रात्रांदिवस तुझी प्रार्थना करीत आहे. |
2
|
कृपा करुन माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. दयेखातर माझी प्रार्थना ऐक. |
3
|
माझ्या आत्म्याला हे दु:ख पुरेसे आहे. मी आता लवकरच मरणार आहे. |
4
|
लोक मला आताच मृत आहे असे समजून वागवतात. मी जगायला अगदी शक्तिहीन आहे असे समजून वागवतात. |
5
|
मला तू मृत माणसात शोध. मी थडग्यात असलेल्या प्रेतासारखा आहे. ज्याला तू विसरलास असा एक मृतात्मा, तुझ्यापासून आणि तुझ्या निगराणीपासून दूर गेलेला असा एक. |
6
|
तू मला जमिनीतल्या त्या खड्यांत टाकलेस. होय, तूच मला त्या अंधाऱ्या जागेत ठेवलेस. |
7
|
देवा, तू माझ्यावर रागावला होतास आणि तू मला शिक्षा केलीस. |
8
|
माझे मित्र मला सोडून गेले. ज्याला कोणीही स्पर्श करु इच्छीत नाही. अशा माणसाप्रमाणे ते मला टाळतात. मी घरात बंद झालो आहे आणि मी बाहेर पडू शकत नाही. |
9
|
अति द:ुखाने रडल्यामुळे माझे डोळे दुखत आहेत. परमेश्वरा, मी सतत तुझी प्रार्थना करीत आहे. माझे बाहू उभारुन मी तुझी प्रार्थना करत आहे. |
10
|
परमेश्वरा, तू मृतांसाठी चमत्कार करतोस का? भुते उठून तुझी स्तुती करतात का? नाही. |
11
|
थडग्यातले मृत लोक तुझ्या प्रेमाबद्दल बोलू शकत नाहीत. मृत्युलोकातील मृतलोक तुझ्या इमानीपणाविषयी बोलू शकत नाहीत. |
12
|
अंधारात पडलेले मृतलोक तुझी अद्भुत कृत्ये पाहू शकत नाहीत. विस्मृतीच्या जगातले मृतलोक तुझ्या चांगुलपणाविषयी बोलू शकत नाहीत. |
13
|
परमेश्वरा, मी तुला मदत करण्याविषयी विचारत आहे. प्रत्येक दिवशी पहाटे मी तुझी प्रार्थना करतो. |
14
|
परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? तू माझे ऐकायला नकार का देतोस? |
15
|
मी तरुणपणापासूनच अशक्त आणि आजारी आहे. मी तुझा राग सोसला आहे आणि मी असहाय्य आहे. |
16
|
परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला होतास आणि शिक्षा मला मारुन टाकीत आहे. |
17
|
दु:ख आणि वेदना सदैव माझ्याबरोबर असतात. मी माझ्या दु:खात आणि वेदनात बुडून मरत आहे असे मला वाटते. |
18
|
आणि परमेश्वरा, तूच माझ्या आप्तेष्टांना आणि इष्ट मित्रांना मला सोडून जाण्यास भाग पाडलेस. केवळ भयाण अंधकार माझी सोबत करत माझ्याजवळ राहिला. |
Psalms 88:2 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...