1
|
मी देवाला मदतीसाठी जोरात हाक मारली, देवा मी तुझी प्रार्थना करतो. माझ्याकडे लक्ष दे. |
2
|
माझ्या प्रभु, मी संकटात असतो तेव्हा तुझ्याकडे येतो. मी रात्रभर तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. माझ्या आत्म्याने शांत व्हायला नकार दिला. |
3
|
मी देवाचा विचार करतो आणि मला काय वाटते ते त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण मला ते शक्य नाही. |
4
|
तू मला झोपू देत नाहीस, मी काही तरी बोलायचा प्रयत्न केला पण मी फारच गोंधळलेल्या मनस्थितीत होतो. |
5
|
मी सतत भूतकाळाचा विचार करीत राहिलो. खूप दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांचा मी विचार करत होतो. |
6
|
रात्री मी माझ्या गाण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करतो. मी स्व:तशीच बोलतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो. |
7
|
मी आश्चर्य करतो, “आमचा प्रभु आपल्याला कायमचा सोडून गेला का? तो आपल्याला कधी तरी परत घेईल का? |
8
|
देवाचे प्रेम कायमचे नाहीसे झाले का? तो आपल्याशी कधी तरी परत बोलेल का? |
9
|
देव दयेचा अर्थ विसरला का? त्याच्या कृपेचे आता रागात परिवर्तन झाले का?” |
10
|
नंतर मी विचार केला, “जी गोष्ट मला राहून राहून खटकते आहे ती ही ‘सर्वशक्तिमान सर्वोच्च असा देव त्याची शक्ती घालवून बसला आहे का?”‘ |
11
|
परमेश्वराने काय केले ते मला आठवते आहे. देवा, खूप पूर्वी तू ज्या अद्भूत गोष्टी केल्यास त्या मला आठवतात. |
12
|
तू केलेल्या गोष्टींचा मी विचार केला. मी त्या गोष्टींबद्दल विचार केला. |
13
|
देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत, देवा, तुझ्यासारखा महान कोणीही नाही. |
14
|
अद्भुत गोष्टी करणारा देव तूच आहेस. तू लोकांना तुझी महान शक्ती दाखवलीस. |
15
|
तू तुझ्या शक्तीने लोकांना वाचवलेस. तू याकोबाच्या आणि योसेफाच्या वंशजांना वाचवलेस. |
16
|
देवा, पाण्याने तुला पाहिले आणि ते घाबरले, खोल पाणी भयाने थरथरले. |
17
|
दाट ढगांनी पाणी खाली सोडले, लोकांनी वरच्या उंच ढगातला गडगडाट ऐकला. नंतर तुझे विजांचे बाण ढगातून चमकू लागले. |
18
|
तिथे ढगांचा भयानक गडगडाट होत होता. विजांनी जगाला प्रकाशमय केले होते. पृथ्वी हलली आणि थरथरली. |
19
|
देवा, तू खोल पाण्यातून चाललास. तू खोल समुद्र ओलांडलास, पण तुझे पाऊल कुठेही उमटले नाही. |
20
|
तू मोशेच्या आणि अहरोनच्या मदतीने तुझ्या माणसांना मेंढ्यांप्रमाणे मार्गदर्शन केलेस. |
Psalms 77:16 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...