1
|
आम्ही बाबेलच्या नद्यांजवळ बसलो आणि सियोनची आठवण काढून रडलो. |
2
|
आम्ही जवळच्या वाळुंज झाडावर आमच्या वीणा ठेवल्या. |
3
|
बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले. त्यांनी आम्हाला आनंदी गाणे गायला सांगितले. त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले. |
4
|
परंतु परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे गाऊ शकत नाही. |
5
|
यरुशलेम, मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधीही गाणे वाजवणार नाही असे मला वाटते. |
6
|
यरुशलेम मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधी गाणे म्हणणार नाही, असे मला वाटते. मी तुला कधीही विसरणार नाही असे मी वचन देतो. |
7
|
यरुशलेम नेहमी माझा सर्वांत मोठा आनंद असेल असे मी वचन देतो. |
8
|
ख जो तुला देईल त्याला धन्यवाद. |
9
|
जो माणूस तुझी मुले धरतो आणि त्यांना दगडावर आपटून ठार मारतो त्याचा धन्यवाद असो. |
Psalms 137:1 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...