1
|
परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
2
|
देवांच्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
3
|
परमेश्वरांच्या परमेश्वराची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
4
|
देवाची, जो एकमेव अद्भुत चमत्कार करतो त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
5
|
ज्याने आकाश निर्माण करण्यासाठी शहाणपणा वापरला त्याची, देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
6
|
देवाने समुद्रावर शुष्क जमीन ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
7
|
देवाने मोठा प्रकाश निर्माण केला. त्याचे प्रेम सदैव असते. |
8
|
दिवसावर राज्य करण्यासाठी देवाने सूर्यांची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
9
|
देवाने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि चांदण्यांची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
10
|
देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या पहिल्या पुरुषांना आणि प्राण्यांना मारले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
11
|
देवाने इस्राएलला मिसरमधून बाहेर काढले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
12
|
देवाने त्याची महान शक्ती आणि बळ दाखविले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
13
|
देवाने लाल समुद्र दोन भागात विभागला. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
14
|
देवाने इस्राएलला समुद्रामधून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
15
|
देवाने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात बुडवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
16
|
देवाने त्याच्या माणसांना वाळवंटातून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
17
|
देवाने शक्तिशाली राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
18
|
देवाने बलवान राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
19
|
देवाने अमोऱ्यांच्या सिहोन राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
20
|
देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
21
|
देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
22
|
देवाने ती जमीन इस्राएलला नजराणा म्हणून दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
23
|
आमचा पराभव झाला तेव्हा देवाने आमची आठवण ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
24
|
देवाने आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
25
|
देव प्रत्येक माणसाला अन्न देतो. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
26
|
स्रवर्गातल्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
Psalms 136:19 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...