1
|
मी वर डोंगरांकडे बघतो. पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे? |
2
|
माझी मदत परमेश्वराकडून, स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे. |
3
|
देव तुला खाली पडू देणार नाही. तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही. |
4
|
इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही. देव कधीही झोपत नाही. |
5
|
परमेश्वर तुझा पाठीराखा आहे तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो. |
6
|
ख पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही. |
7
|
परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील. |
8
|
परमेश्वरा तुला जाण्या - येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील. |
Psalms 122:4 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...