1
|
परंतु बंधूंनो आध्यात्मिक लोक म्हणून मी तुमच्याशी बोलू शकत नव्हतो. त्याऐवजी मला तुमच्याशी देहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकासारखे बोलावे लागले. |
2
|
मी तुम्हांला पिण्यासाठी दूध दिले, जड अन्र दिले नाही. कारण तुम्ही जड अन्र खाऊ शकत नव्हता. व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही. |
3
|
कारण तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात. कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाही काय, व जगातील लोकांसारखे वागत नाही काय? |
4
|
कारण जेव्हा काही म्हणतात, “मी पौलाचा आह,” आणि इतर दुसरे म्हणतात, “मी अपुल्लोसाचा आहे,” तेव्हा तुम्ही जगिक लोकांसारखे वागत नाही काय? |
5
|
तर मग अपुल्लोस कोण आणि पौल कोण? आम्ही केवळ सेवक आहोत, ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वासणारे झाला आणि आम्हा प्रत्येकाला देवाने जे काम नेमून दिले ते काम आम्ही केले. |
6
|
मी बी लावले, अपुल्लोसाने त्याला पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली. |
7
|
म्हणून जो बी पेरतो तो किंवा जो पाणी घालतो तो महत्त्वाचा नाही, तर देव जो त्याची वाढ करतो तो महत्त्वाचा आहे. |
8
|
जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत व प्रत्येकाला त्याच्या फळावर आधारित अशी मजूरी मिळेल |
9
|
कारण देवा समवेत आपण सर्वजण कामगार आहोत.तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात. |
10
|
आणि देवाच्या दानाप्रमाणे जे मला दिले होते त्याप्रमाणे सूज्ञ, कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला. पण दुसरा कोणी तरी त्यावर बांधतो, परंतु प्रत्येकाने आपण त्यावर कसे बांधतो याविषयी खबरदारी घ्यावी. |
11
|
येशू ख्रिस्त जो पाया आहे त्याच्यावाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही. |
12
|
जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंढा यांनी बांधतो, |
13
|
तर प्रत्येक व्यक्तीचे काम स्पष्ट दिसून येईल. कारण तो दिवस ते स्पष्ट करील, तो दिवस अग्नीने प्रगट होईल व तोच अग्नि प्रत्येक माणसाचे काम कसे आहे हे ठरविण्यासाठी परीक्षा घेईल. |
14
|
ज्या कोणाचे बांधकाम, जे त्या पायावर बांधलेले आहे ते टिकेल. |
15
|
त्याला बक्षीस मिळेल जर एखाद्याचे काम जळून गेले, तर त्याचे नुकसान होईल, परंतु जेव्हा तो इमारतीला लागलेल्या अग्नीपासून बचावासाठी पळून जाईल तेव्हा तो तारला जाईल. |
16
|
तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हांला माहीत नाही काय? |
17
|
जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात. |
18
|
कोणीही स्वत:ला फसवू नये. जर कोणी स्वत:ला या जगाच्या दृष्टिकोणानुसार शहाणा समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे. |
19
|
कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे. असे लिहिले आहे, “देव शहाण्यांना हुशारीमध्ये पकडतो.” |
20
|
आणि पुन्हा “देव जाणतो की, शहाण्यांचे विचार निरर्थक आहेत.” |
21
|
म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारु नये. कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत. |
22
|
तर तो पौल, अपुल्लोस, पेत्र, जग, जीवन किंवा मरण असो, वर्तमानकाळाच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळाच्या गोष्टी असोत, सर्व गोष्टी तुमच्या आहेत. |
23
|
तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे. |
1-Corinthians 3:2 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...