(4-5) “काही लोक गर्विष्ठ असतात. ते शक्तीशाली आणि महत्वपूर्ण आहेत असे त्यांना वाटते, परंतु मी त्यांना सांगतो, ‘फुशारक्या मारु नका. एवढे गर्विष्ठ बनू नका.’
देव दुष्टांना शासन करण्यास तयार आहे. परमेश्वराच्या हातात पेला आहे. तो पेला विषयुक्त द्राक्षारसाने भरलेला आहे. तो तो द्राक्षारस ओतेल आणि दुष्ट लोक तो शेवटच्या थेंबापर्यंत पितील.