1
|
देवा, तुझ्या अधिकाराचा उपयोग करुन मला वाचव. तुझे महान सामर्थ्य वापर आणि मला मुक्त कर. |
2
|
देवा, माझी प्रार्थना ऐक मी काय म्हणतो ते ऐक. |
3
|
जे देवाची उपासना करत नाहीत असे परके माझ्या विरुध्द गेले आहेत आणि शक्तिशाली लोक मला मारायला निघाले आहेत. |
4
|
पाहा, माझा देव मला मदत करेल. माझा मालक मला साहाय्य करेल. |
5
|
जे लोक माझ्याविरुध्द गेले आहेत त्यांना देव शिक्षा करेल. देव माझ्याशी प्रमाणिक असेल आणि तो त्या लोकांचा नाश करेल. |
6
|
देवा, मी तुला खुशीने अर्पणे देईन. परमेश्वरा, मी तुझ्या चांगल्या नावाची स्तुती करेन. |
7
|
परंतु मी तुला सर्व संकटांतून सोडवण्याची विनंती करीत आहे. माझ्या शत्रूंचा पराभव झाल्याचे मला पाहू दे. |
Psalms 54:8 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...