(5-6) देव रागावला आहे आणि तो त्या लोकांनाकच सांगत आहे, “मी या माणसाची राजा म्हणून निवड केली तो सियोन पर्वतावर राज्य करेल सियोन हा माझा खास पर्वत आहे.” यामुळे ते दुसरे पुढारी भयभीत झाले आहेत.
तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा. तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात. पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे. तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे.