Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

1 Corinthians Chapters

1 Corinthians 6 Verses

Bible Versions

Books

1 Corinthians Chapters

1 Corinthians 6 Verses

1 जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा दुसऱ्या व्यक्तीबरोबर भांडणतंटा असेल तर ती समस्या (वाद) देवाच्या पवित्र लोकांपुढे न आणता ती व्यक्ति तो वाद न्यायालयात अनीतिमान लोकांसमोर नेण्याचे धाडस का करते?
2 किंवा तुम्हांला माहीत नाही का की देवाचे पवित्र लोक जगाचा न्याय करतील? आणि जर जगाचा न्याय तुमच्याकडून होणार आहे तर लहानशा बाबींमध्ये त्याचा न्याय करण्यासाठी तुम्ही अपात्र आहात काय?
3 आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत हे तुम्हांला माहीत नाही का? तर मग रोजच्या जीवनातील साध्या गोष्टींचा विचारसुद्धा कशाला?
4 म्हणून जर दररोज तुम्हांला प्रकरणे निकालात काढायची असतील, तर ज्यांना मंडळीत काही पाठिंबा नाही, अशा माणसांना न्यायाधीश म्हणून का नियुक्त करता?
5 तुम्हांला लाज वाटावी म्हणून मी हे म्हणत आहे. गोष्टी इतक्या वाईट होत आहेत का की, तुमच्यामध्ये एकही सुज्ञ मनुष्य नाही जो त्याच्या (ख्रिस्ती) भावांचा समेट घडवून आणू शकेल?
6 पण एक भाऊ दुसऱ्या भावाविरुद्ध न्यायालयात जातो आणि तुम्ही हे सर्व अविश्वासणाऱ्यांसमोर करीत आहात?
7 वास्तविक, तुमचे एकमेकांविरुद्ध खटले आहेत यातच तुमचा संपूर्ण पराभव झाला आहे. त्याऐवजी तुम्ही स्वत:वर अन्याय का होऊ देत नाही? त्याऐवजी तुम्ही स्वत:ची लुबाडणूक का होऊ देत नाही?
8 उलट तुम्ही स्वत: अन्याय करता व लुबाडणूक करता, आणि तुम्ही हे सर्व तुमच्या ख्रिस्ती बांधवांना करता!
9 किंवा तुम्हांला माहीत नाही का की, अनीतिमान लोकांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही? तुमची स्वत:ची फसवणूक होऊ देऊ नका! जारकर्मी, मूर्तिपूजक, व्याभिचारी, पुरुषवेश्या (पुरुष जे समलिंगी संबंधास तयार होतात), समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष, किंवा
10 दरोडेखोर, लोभी, दारुडे, निंदा करणारे, फसविणारे यांपैकी कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाही.
11 आणि तुमच्यातील काही असे होते. पण तुम्ही स्वत:स धुतलेले होते, तुम्हाला देवाच्या सेवेला समर्पित केलेले होते. प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही नीतिमान ठरला होता व देवाच्या आत्म्यामध्ये नीतिमान ठरला होता.
12 “मी काहीही करण्यास मुक्त आहे.” पण प्रत्येक गोष्ट हितकारक नसते, होय, “मी काहीही करण्यास मुक्त आहे, पण कोणत्याही गोष्टीचे वर्चस्व माइयावर होऊ देणार नाही.
13 “अन्र पोटासाठी आहे व पोट अन्रासाठी आहे.” आणि हे खरे आहे. पण देव अन्राचा व पोटाचा अशा दोघांचाही नाश करील. आणि आमची शरीरे ही जारकर्मसाठी नाही तर देवाच्या सेवेसाठी आणि प्रभूच्या शरीराच्या हितासाठी आहेत.
14 आणि देवाने केवळ प्रभूलाच मरणातून उठविले असे नाही तर तो आम्हंलाही आपल्या सामर्थ्याने मरणातून उठवील.
15 तुम्हाला माहीत नाही का की, तुमची शरीरे ख्रिस्ताला जोडलेली आहेत? तर मग जे ख्रिस्ताशी जोडलेले आहे ते घेऊन मी वेश्येला जोडावे काय? निश्चितच नाही! किंवा तुम्हांस ठाऊक नाही काय की, जो वेश्येशी जडतो तो तिच्याशी एकदेह होतो.
16 “कारण ती दोघे एकदेह होतील असे शास्त्रच सांगते.”
17 पंरतु जो स्वत: प्रभूशी जडतो तो त्याच्याशी आत्म्यात एक आहे.
18 जारकर्मापासून दूर पळा. मनुष्य एखादे पाप करणे शक्य आहे ते त्याच्या शरीराबाहेरचे आहे. परंतु जो जारकर्म करतो तो त्याच्या स्वत:च्या शरीराविरुद्ध पाप करतो.
19 किंवा तुम्हाला हे माहीत नाही काय तुमची शरीरे ही तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे व जो तुम्हांला देवाकडून प्राप्त झाला त्यांचे मंदिर आहे, आणि स्वत:चे असे तुम्ही नाही?
20 0कारण तुम्हांला किंमत देऊन विकत घेतले आहे. म्हणून तुमच्या शरीराने देवाला गौरव द्या.

1-Corinthians 6:1 Urdu Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×