Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Revelation Chapters

Revelation 7 Verses

Bible Versions

Books

Revelation Chapters

Revelation 7 Verses

1 यानंतर मी चार देवदूतांना पुथ्वीच्या चार कोपऱ्यांना उभे राहिलेले पाहिले. देवदूतांनी पृथ्वीचे चारही दिशांचे वारे अडविलेहोते. जमिनीवर, समुद्रावर किंवा कोणत्याही झाडावर वारा वाहू नये म्हणून ते वाऱ्याला थोपवीत होते.
2 तेव्हा मी आणखीएक देवदूत पूर्वेकडून वर येताना पाहिला. या देवदूताकडे जिवंत देवाचा शिक्का होता. या देवदूताने त्या चार देवदूतांनामोठ्या आवाजात बोलाविले. हे चार देवदूत असे होते की ज्यांना देवाने पृथ्वी व समुद्राला इजा करण्याचे सामर्थ्य दिले.देवदूत त्या देवदूतांना म्हणाला,
3 "मिनीला, किंवा समुद्राला किंवा झाडांना, जे देवाची सेवा करतात त्या लोकांना आम्हीशिक्का मारेपर्यंत इजा करु नका."
4 मग मी ज्यांना शिक्का मारला होता त्यांची संख्या ऐकली. इस्राएल लोकांच्या प्रत्येकवंशावर शिक्का मारला, ते एकशे चळेचाळीस हजार होते.
5 यहूदा वंशातील 12,000 लोकांनारऊबेन वंशातील 12,000 लोकांनागाद वंशातील 12,000 लोकांना
6 अशेर वंशातील 12,000 लोकांनानफताली वंशातील 12,000 लोकांनामनश्शे वंशातील 12,000 लोकांना
7 शिमोन वंशातील 12,000 लोकांनालेवी वंशातील 12,000 लोकांनाइस्साखार वंशातील 12,000 लोकांना
8 जबुलून वंशातील 12,000 लोकांनायोसेफ वंशातील 12,000 लोकांनाबन्यामिन वंशातील 12,000 लोकांना
9 यानंतर मी पाहिले, तेव्हा अफाट लोकसमुदाय मला दिसला. तेथे इतके लोक होते की, कोणालाही ते मोजता आले नसते.ते प्रत्येक राष्ट्राचे, वंशाचे, जमातीचे, आणि भाषेचे लोक होते, हे लोक सिंहासनासमोर आणि कोकऱ्यासमोर उभे होते. त्यासर्वांनी पांढरे शुभ्र झगे घातले होते आणि त्यांच्या हातात झावळ्याच्या फांद्या होत्या.
10 ते मोठ्याने ओरडत होते, “तारणआमच्या देवाचे आहे. व आमच्या कोकऱ्याचे आहे, जो सिंहासनावर बसतो.”
11 सर्व देवदूत सिंहासनाभोवती उभे होते आणिवडिलजनांच्या आणि चार प्राण्यांच्या भोवती उभे होते. ते सिंहासनासमोर पालथे पडले आणि त्यांनी देवाची आराधना केली.
12 ते म्हणाले, “आमेन! स्तुति गौरव, शहाणपण, आभार, सन्मान, सामर्थ्य आणि पराक्रम अनंतकाळासाठी आमच्यादेवाची आहेत. आमेन!”
13 मग वडीलांपैकी एकाने मला विचारले, “हे पांढरे झगे घातलेले कोण आहेत? व कोठून आले आहेत?”
14 मी म्हणालो, “महाराज, आपणाला माहीत आहे.”आणि तो वडील म्हणाला, “हे लोक मोठ्या त्रासातून बाहेर आलेले आहोत, त्यांनी त्यांची वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुतलीआहेत. आता स्वच्छ व शुभ्र झाले आहेत.
15 म्हणून आता हे लोक देवाच्या सिंहासनासमोर आहेत. हे लोक देवाची त्याच्यामांदिरात रात्रंदिवस सेवा करतात आणि जो सिंहासनावर बसलेला आहे, तो त्यांचे रक्षण करील.
16 त्या लोकांना पुन्हाकेव्हाच भूक लागणार नाही. त्यांना पुन्हा केव्हाच तहान लागणार नाही, सूर्यामुळे त्यांना बाधा होणार नाही. कोणतीहीउष्णता त्यांना जाळून टाकणार नाही.
17 सिंहासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ असेल. ज्या झऱ्यांचेपाणी जीवन देते तेथे तो त्यांना नेईल. आणि देव त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रु पसून टाकील.”

Revelation 7:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×