Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Revelation Chapters

Revelation 17 Verses

Bible Versions

Books

Revelation Chapters

Revelation 17 Verses

1 सात वाट्या असलेल्या सात देवदूतांपैकी एक जण माइयाकडे आला आणि मला म्हणाला, “ये, मी तुला त्या अति नीचवेश्येला झालेली शिक्षा दाखवतो. ती बहुत जलांवर बसली आहे.
2 पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला. आणितिच्या लैंगिक पापाच्या द्राक्षारसाने पृथ्वीवरील लोक धुंद झाले आहेत.”
3 मग देवदूताने मला आत्म्याद्वारे वाळवंटात नेले. तेथे मी एका स्त्रीला किरमिजी रंगाच्या श्र्वापदावर बसलेले पाहिले. त्याश्र्वापदाच्या अंगावर वाईट नावे लिहिली होती. त्या श्र्वापदाला सात डोकी आणि दहा शिंगे होती,
4 त्या स्त्रीने किरमिजी वजांभळी वस्त्रे घातली होती. तिने घातलेल्या सोने, जवाहिर व मोत्यांनी ती चमकत होती. तिच्या हातात सोन्याचा पेलाहोता, हा पेला वाईट गोष्टींनी आणि तिच्या लैंगिक पापांच्या अशुद्धतेने भरला होता.
5 तिच्या कपाळावर नाव लिहिले होते.त्या नावाला गुपित अर्थ आहे. त्यावर असे लिहीले होते:
6 मी पाहिले ती स्त्री रक्तसेवनाने मस्त झाली होती. ती देवाच्या पवित्र लोकांचे रक्त प्याली होती. ज्या लोकांनी येशूविषयीसांगितले त्याचे रक्त ती प्याली होती.जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा फार आश्चर्यचकित झालो.
7 मग देवदूत मला म्हणाला, “तू आश्चर्यचकित का झालास? मीतुला त्या स्त्रीचे आणि ती ज्या श्र्वापदावर बसली आहे, ज्याला सात डोकी व दहा शिंगे आहेत त्याचे रहस्य सांगतो.
8 जो श्र्वापद तू पाहिला तो (पूर्वी) होता, आता तो नाही. आणि तो तळविरहीत बोगद्यातून येईल आणि नष्ट केला जाईल.पृथ्वीवर राहणारे लोक ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात पृथ्वीच्या स्थापनेपासून लिहिलेली नाहीत ते जेव्हा श्र्वापदालापाहतील, तेव्हा ते आश्चर्यचकित होतील कारण तो (पूर्वी) होता, आता तो नाही आणि तरी तो येईल.
9 “यासाठी शाहणपण असलेल्या बुद्धीची आवश्यकता आहे. सात डोकी या सात टेकड्या आहेत, ज्यावर ती स्त्री बसते.
10 “ते सात राजेसुद्धा आहेत. त्यापैकी पाच राजे पतन पावले आहेत. एक आहे आणि एक अजून आला नाही. पण जेव्हातो येईल तेव्हा तो फारच थोडा वेळ थांबेल.
11 जो प्राणी (पूर्वी) होता आणि जो आता नाही तो आठवा राजा आहे. आणितो त्या सात राजांपासून आहे. आणि तो आपल्या नाशाकडे जात आहे.
12 “जी दहा शिंगे तू पाहिलीस ते ज्यांना अजून सत्ताधिकार मिळाला नाही, असे दहा राजे आहेत. पण त्यांना श्र्वादाबरोबरएका घटकेसाठी राजासारखा अधिकार मिळेल.
13 त्यांचा एकच हेतू आहे. आणि ते त्यांची शक्ती व अधिकार श्र्वापदालादेतील.
14 ते कोकऱ्याबरोबर युद्ध करतील पण कोकरा त्यांच्यावर मात करील. कारण तो प्रभूंचा प्रभु व राजांचा राजा आहे.आणि त्याच्याबरोबर त्याने बोलाविलेले, निवडलेले, विश्वासू अनुयायी असतील.”
15 मग देवदूत मला म्हणाला, “जे पाण्यांचे प्रवाह तू पाहिले, ज्यावर वेश्या बसली होती, ते म्हणजे पुष्कळ लोक,समुदाय, राष्ट्रांचे व भाषा बोलणारे लोक आहेत.
16 तो श्र्वापद आणि दहा शिंगे तू पाहिलीस ते त्या वेश्येचा तिरस्कारकरतील. ते तिला ओसाड, उजाड करतील आणि तिला नग्न सोडून देतील, ते तिचे मांस खातील, व अग्नीने तिलाजाळतील.
17 देवाचे वचन पूर्ण होईपर्यंत, देवाने त्या श्र्वापदाला सत्ता चालविण्याचा अधिकार देण्याचे कबूल केले आहे.देवाने त्याचा हेतु पूर्ण करण्याचे त्यांच्या मनात घातले आहे.
18 जी स्त्री तू पाहिलीस ती मोठी नगरी आहे, जी पृथ्वीवरच्याराजांवर सत्ता गाजवील.”

Revelation 17:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×