1
|
एसाव (म्हणजे ‘अदोम’) याची वंशावळ |
2
|
एसावाने कनानी मुलींशी लग्ने केली; त्याच्या बायका येणे प्रमाणे - एलोन हित्ती याची मुलगी आदा; सिबोन हिळी याचा मुलगा अना, त्याची मुलगी ओहोलीबामा |
3
|
आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ. |
4
|
एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रेऊल होते. |
5
|
आणि ओहोलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे तीन मुलगे होते. हे एसावाचे मुलगे; हे त्याला कनान देशात झाले. |
6
|
याकोब व एसाव यांच्या कुटुंबांची एवढी वाढ झाली की कनान देश सर्वांना पुरेनासा झाला म्हणून एसाव आपला भाऊ याकोब याजपासून बाजूला निघाला; तो आपल्या बायका, मुले, मुली तसेच सर्व नोकर चाकर, गाईगुरे व इतर जनावरे आणि कनान देशात त्याने मिळवलेली धनसंपत्ती व मालमत्ता हे सर्व घेऊन सेईर या डोंगराळ प्रदेशाकडे गेला. |
9
|
एसाव हा अदोमी लोकांचा मुळ पुरुष होय. सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहाणाऱ्या एसावाची वंशावळ: |
10
|
एसावाच्या मुलांची नाव-एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमाथ यांचा मुलगा रेऊल. |
11
|
अलीपाजाला पांच मुलगे होते; तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज; |
12
|
अलीपाज याची तिम्ना नावांची एक गुलामस्त्री होती; तिम्ना व अलीपाज यांना एक मुलगा झाला; त्याचे नाव अमालेक. |
13
|
रेऊलास चार मुलगे होते. त्यांची नाव-नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा ही एसावाची नातवंडे होती.बासमथाच्या पोटी झालेल्या रगुवेलाची ही मुले. |
14
|
सिबोनाचा मुलगा अना याची मुलगी अहलीबामा ही एसावाची तिसरी बायको होती. यऊश, यालाम व कोरह हे एसाव व अहलीबामा यांचे मुलगे होते. |
15
|
एसावाचे मुलगे आपापल्या कुळांचे प्रमुख झाले ते हे -एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे मुलगे; तेमान, ओमार, सपो, कनाज |
16
|
कोरह, गाताम व अमालेख;हे आपापल्या कुळांचे प्रमुख एसावास त्याची बायको आदा हिच्या पोटी झाले. |
17
|
एसावाचा मुलगा रेऊल याचे मुलगे हे - नाहथ, जेरह, शाम्मा व मिज्जा;हे सर्व कूळप्रमुख एसावास त्याची बायको बासमथ हिच्या पोटीं झाले. |
18
|
एसावाची बायको अनाची मुलगी अहलीबामा हिचे मुलगे-यऊश, यालाम व कोरह; हे तिघे जण आपापल्या कुळांचे प्रमुख झाले; |
19
|
हे सर्व पुरुष एसावापासून (अदोमपासून) झालेल्या कुळांचे नेते होत. |
20
|
एसावापूर्वी अदोममध्ये सेईर नावाचा एक होरी माणूस होता. त्याचे मुलगे हे - लोटन, शोबाल, सिबोन, |
21
|
अना, दीशोन, एसर व दिशान; हे सेईराचे मुलगे होरी वंशातील आपापल्या कुळांचे प्रमुख झाले. |
22
|
लोटानाचे मुलगे होते होरी व हेमाम. (तिम्ना ही लोटानाची बहीण होती.) |
23
|
शोबालाचे मुलगे अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम. |
24
|
सिबोनाचे दोन मुलगे होते; अय्या व अना (आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सांपडले तोच हा अना.) |
25
|
अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा. |
26
|
दीशोनाला चार मुलगे होते;हेमदान, एश्बान, यित्रान व करान. |
27
|
एसराला बिल्हान, जावान व अकान हे तीन मुलगे होते. |
28
|
दीशानाला ऊस व अरान हे दोन मुलगे होते. |
29
|
होरी कुळांचे जे प्रमुख झाले त्यांची नावे अशी - लोटान, शोबाल, सिबोन, अना, |
30
|
दीशोन, एसर व दीशान, यहूदा प्रांताच्या पूर्वे कडील सेईर (अदोम) प्रदेशात राहाणाऱ्या आपापल्या कुळांचे हे प्रमुख झाले. |
31
|
इस्राएलने राज्य करण्यापूर्वी अदोमला राजे होते. |
32
|
बौराचा मुलगा बेला याने अद्रोमावर राज्य केले; दिन्हाबा नगर ही त्याची राजधानी होती. |
33
|
बेला मेल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब हा त्याच्या जागी राजा झाला. |
34
|
योबाब मेल्यावर तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने त्याच्या जागी राज्य केले. |
35
|
हुशाम मेल्यावर बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. (यानेच मवाब देशात मिघानांचा पराभव केला) अवीत नगर ही त्याची राजधानी होती. |
36
|
हदाद मेल्यावर मास्त्रेका येथील साम्ला याने त्या देशावर राज्य केले. |
37
|
साम्ला मेल्यावर फरात (युफ्रेटीस) नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले. |
38
|
शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल - हानान याने त्या देशावर राज्य केले. |
39
|
बाल-हानान मेल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. पाऊ हा त्याची राजधानी होती. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल होते; ही मे-जाहाबाची मुलगी मात्रेद हिची मुलगी होती. |
40
|
एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या प्रमुखांची नावे-तिम्ना, आल्वा, यतेथ, अहलीबामा, एला, पीनोन, कनाज तेमान, मिब्सार, माग्दीएल व ईराम हयातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले. |
Genesis 36:9 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...