अशी इश्माएलाच्या पुत्रांची नावे होती; प्रत्येक मुलाच्या परिवार गटाचा एक तळ होता; पुढे त्याचेच एक गांव बनले; हे बारा पुत्र आपापल्या लोकासहीत बारा वंशाचे संस्थापक सरदार झाले.
त्याचे वंशज सर्व वाळवंट भागात तळ देत राहिले; हा भाग मिसर जवळील हवीलापासून शूरपर्यंत आहे आणि तो शूरपासून पार अश्शूरपर्यंत जातो. अश्शूर इश्माएलाचे वंशज अधूनमधून आपल्याच भाऊबंदावर हल्ला करीत असत.
पाठोपाठ दुसरा मुलगा जन्मला तेव्हा त्याने एसावाची टाच हाताने घट्ट धरली होती; म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. रिबकेला ही जुळी मुले झाली तेव्हा इसाहक साठ वर्षांचा होता.
ही जुळी मुले वाढत जाऊन मोठी झाली तेव्हा एसाव तरबेज शिकारी झाला; शेताशेतातून व रानावनातून फिरण्याची त्याला आवड होती. पण याकोब शांत होता तो त्याच्या तंबूत राहिला.
परंतु याकोब म्हणाला, “तर प्रथम, तू तुझा ज्येष्ठपणाचा वारसा हक्क मला देशील अशी शपथ माझ्याशी वाहा.” तेव्हा एसावाने तशी शपथ वाहिली; अशा रीतीने एसावाने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या सगळ्या मालमत्तेचा व ज्येष्टपणाचा आपला वारसा हक्क आपला धाकटा भाऊ याकोब याला मोबदला म्हणून दिला.
मग याकोबाने त्याला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. एसावाने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर तो तेथून निघून गेला. अशा रीतीने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या ज्येष्ठपणाच्या हक्काची एसावाने बेपर्वाईने कदर केली नाहीं.