Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Revelation Chapters

Revelation 9 Verses

Bible Versions

Books

Revelation Chapters

Revelation 9 Verses

1 पाचव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला, तेव्हा मी आकाशातून एका ताऱ्याला, पृथ्वीवर पडताना पाहिले. अथांगदऱ्याकडे नेणाऱ्या खोल बोगद्याची किल्ली त्याला देण्यात आली.
2 मोठ्या भट्टीतून धूर यावा तसा त्या बोगद्यातून धूर येऊलागला. बोगद्यातून येणाऱ्या धुरामुळे सूर्य आणि आकाश काळे झाले
3 मग धुरातून टोळधाड पृथ्वीवर आली. त्यांनापृथ्वीवरील विंचवासारखा दंश करण्याचा अधिकार दिला होता.
4 टोळांना सांगण्यात आले होते की त्यांनी गवताला, रोपांनाकिंवा झाडांना हानि पोहचवू नये. ज्या लोकांच्या कपाळावर देवाचा शिक्का मारण्यात आला नसेल त्यांनाच चावण्यास त्यांनासांगण्यात आले होते.
5 या टोळांना लोकांना वेदना देण्यासाठी पाच महिने वेळ दिला होता. अधिकार दिला होता. पणत्यांना लोकांना ठार मारण्याचा अधिकार देण्यात आला नव्हता. त्यांच्या दंशाने ज्या वेदना होत त्या वेदना विंचवाने डंखमारल्यावर होतात तशा होत होत्या.
6 या दिवसात अनेक जण मरण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना तोसापडणार नाही. त्यांना मरावेसे वाटेल पण मरण त्यांच्यापासून लपून राहील.
7 युद्धासाठी तयार असलेल्या घोड्यांसारखे टोळ दिसत होते. त्यांच्या डोक्यांवर त्यांनी सोनेरी मुगुटासारखे काही घातले होते.त्यांचे चेहरे मनुष्यांच्या चेहऱ्यासारखे दिसत होते.
8 त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते. त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखेहोते.
9 त्यांची छाती लोखंडी उरस्त्राणासारखी (चिलखतासारखी) दिसत होती आणि त्यांच्या पंखांचा आवाज युद्धात वेगानेधावणाऱ्या अनेक घोडयांच्या रथासारखा होता.
10 त्यांना विंचवासारख्या शेपट्या व नांग्या होत्या. लोकांना पाच महिनेवेदना देण्याची त्यांच्या शेपटीत ताकद होती.
11 टोळांचा एक राजा होता. हा राजा अथांग दऱ्याचा दूत होता. यहूदी भाषेतत्याचे नाव अबद्दोन, आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपुल्लोन (विध्वंसमूलक) होते.
12 पहिले मोठे संकट आता येऊन गेलेहोते. आणखी दोन मोठी संकटे येणार आहेत.
13 सहाव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा मी देवासमोर असलेल्या सोनेरी वेदीवरुन चारपैकी एका शिंगापासूनयेणारा आवाज ऐकला.
14 तो आवाज त्या सहाव्या दूताला ज्याच्याकडे कर्णा होता त्याला म्हणाला, “फरान नदीवर बांधूनठेवलेले चार देवदूत सोड.”
15 ते चार देवदूत या घटकेसाठी, या दिवसासाठी, या महिन्यासाठी, या वर्षासाठी तयार ठेवलेहोते. पृथ्वीवरील एक तृतीयांश लोकांना मारण्यासाठी हे देवदूत सोडण्यात आले.
16 घोडदळाची संख्या मी ऐकली. तो 20 0,000,000 इतके घोडदळ होते.
17 माइया दृष्टान्तात मी घोडे आणि घोड्यांवर असलेले स्वार पाहिले, ते अशाप्रकारे दिसत होते: तांबड्या रंगाचे, गडद निळे आणि पिवळे असे त्यांचे उरस्त्राण (चिल खत) होते. घोड्यांची मस्तकेसिंहाच्या मस्तकासारखी दिसत होती. घोड्यांच्या तोंडांतून अग्नि, धूर व गंधरस येत होते.
18 घोडयांच्या तोंडातून येणाऱ्याया तीन पीडा - अग्नि, धूर व गंधरस यामुळे पृथ्वीवरील एक तृतीयांश लोक मारले गेले.
19 घोड्यांची शाक्ति त्यांच्यातोंडात तशी त्यांच्या शेपटीतसुद्धा होती. त्या शेपट्या सापासारख्या असून त्यांना दंश करण्यासाठी डोके होते. ते लोकांनाजखमी करीत असत.
20 इतर लोकांना या वाईट गोष्टींमुळे मारले गेले नाहीत. पण तरीही या लोकांनी आपली अंत:करणे वजीविते बदलली नाहीत. आणि आपल्या हातांनी ज्या गोष्टी ते करीत होते त्यापासून वळले नाहीत. ते सैतानाची म्हणजेसोने, चांदी, तांबे. दगड आणि लाकूड यांच्या मूर्तींची, ज्या पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत व चालू शकत नाहीत,अशांची भक्ति करण्याचे त्यांनी थांबविले नाही.
21 या लोकांनी इतरांना मारण्यापासून आपली अंत:करणे बदलली नाहीत खूनचेटके तसेच लैंगिक पापांपासून आणि चोरीपासून परावृत्त झाले नाहीत.

Revelation 9:9 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×