Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Philippians Chapters

Philippians 3 Verses

Bible Versions

Books

Philippians Chapters

Philippians 3 Verses

1 शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. त्याच गोष्टी मी पुन्हा लिहिण्यास मला त्रासदायक वाटत नाहीत, आणि ते तुमच्यासाठी सुरक्षित आहे.
2 “कुत्र्या” विषयी सावध असा! दुष्कर्माविषयी सावध असा! शरीराला इजा करणाऱ्यांपासून सावध असा,
3 कारण आम्हीच खरे सुंता झालेले लोक आहोत, आणि आम्ही जे देवाच्या आत्म्याने त्याची सेवा करतो ते आम्ही येशू ख्रिस्ताचा अभिमान बाळगतो आणि ऐहिक गोष्टींवर विश्वास ठेवीत नाही.
4 जरी मला स्वत:ला जगिक गोष्टींवर विश्वास ठेवण्यास जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला जगिक गोष्टीवर विश्वास ठेवण्यास कारण आहे असे वाटते.
5 तर मला अधिक वाटते. मी जेव्हा आठ वर्षांचा होतो, तेव्हा माझी सुंता झाली. मी इस्राएल देशाचा आहे. बन्यामिन वंशाचा आहे. इब्री आईवडिलांपासून झालेला मी इब्री आहे. नियमशास्त्राच्या माझ्या दष्टिकोनाबद्दल म्हणाला तर मी परुशी आहे.
6 माझ्या आस्थेविषयी म्हणाला तर मी मंडळीचा छळ केला. नियमशास्त्राने ठरवून दिल ल्या नीतिमत्वाविषयी मी निर्दोष आहे.
7 त्याऐवजी जो मला लाभ होता तो आता मी ख्रिस्तासाठी नुकसान असे समजतो.
8 शिवाय माझ्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या विषयीच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानामुळे मी इतर सर्व काही हानि समजतो. त्याच्यासाठी सर्व काही मी गमावलेले आहे. ख्रिस्ताला मिळविण्यासाठी मी सर्व काही कचरा समजतो.
9 आणि त्याला शोधण्यासाठी माझे नीतिमत्त्व नसताही म्हणजे नियमशास्त्रावर आधारित नव्हे, परंतु नीतिमत्व जे ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त होते ते देवापासून प्राप्त होणारे आणि विश्वासावर आधारित आहे.
10 मला ख्रिस्ताला जाणून घ्यायचे आहे आणि जेव्हा तो मरणातून पुन्हा उठला तेव्हा जे सामर्थ्य प्रगट झाले त्याचा अनुभव घ्यायचा आहे, मला त्याच्या दु:खसहनामध्ये सुद्धा त्याचा अनुभव घेण्यासाठी त्यात भाग घ्यायचा आहे आणि त्याच्या मरणाशी अनुरुप व्हायचे आहे.
11 या आशेने की, मला मृतांमधून पुनरुत्थान मिळावे.
12 हे असे नाही की मी अगोदरच बक्षिस मिळविले आहे किंवा अगोदरच परिपूर्ण झालो आहे. ज्या बक्षिसासाठी ख्रिस्त येशूने मला ताब्यात घेतले ते बक्षिस मिळविण्याचा मी प्रयत्न करतो.
13 बंधूंनो, त मी मिळविले असे मानीत नाही, परंतु एक गोष्ट आहे की, जी करण्याचा मी निश्चय करतो, जे भूतकाळात आहे ते मी विसरतो, आणि ते माझ्यापुढे आहे ते मिळविण्याचा प्रयत्न करतो.
14 ख्रिस्त येशूमध्ये वरील पाचारण जे देवाचे बक्षीस त्या उद्दीष्टासाठी मी झटतो.
15 तेव्हा आपण सर्व जे परिपक्व (प्रौढ) त्या आम्ची एकच प्रवृती आहे आणि एखाद्या मुद्यावर तुम्ही वेगळा विचार केला तरी देव तुम्हांस तेही प्रकट करील.
16 फक्त आपण ज्या सत्यापर्यंत पोहोंचलो त्याच्याच मागे चालत राहावे.
17 बंधूनो, माझे अनुकरण करण्यासाठी इतरांबरोबर सहभागी व्हा. आणि आम्ही जसे तुमच्यासमोर उदाहरणादाखल आहोत, त्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.
18 कारण यापूर्वी मी तुम्हांला जसे अनेक वेळा सांगितले व आताही पुन्हा रडत सांगतो, पुष्कळ जण असे आहेत की, जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैऱ्यासारखे वागातात.
19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचा देव आहे आणि त्यांच्या निर्लज्जपणामध्ये त्यांचे गौरव आहे ते फक्त ऐहिक गोष्टीविषयीच विचार करतात.
20 आमचा स्वदेश स्वर्गात आहे, तेथून येणारा तारणारा प्रभु येशू ख्रिस्त याची आम्ही वाट पाहता आहोत.
21 त्याच्या ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्याने तो आपले शरीर बदलून टाकील, आणि त्याच्या वैभवी शरीरासारखे करील.

Philippians 3:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×