Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

2 Corinthians Chapters

2 Corinthians 11 Verses

Bible Versions

Books

2 Corinthians Chapters

2 Corinthians 11 Verses

1 माझी आशा आहे की, आपण माझा थोडासा मूर्खपणा माझ्यासाठी सहन कराल. पण तो तुम्ही करीतच आहा.
2 मला तुमचा हेवा वाटतो व तो दैवी हेवा वाटतो. मी तुम्हांला एक पती देण्याचे (म्हणजे) ख्रिस्ताला देण्याचे अभिवचन दिले होते. यासाठी की मला तुम्हांला शुद्ध कुमारिका असे त्याला सादर करता येईल.
3 पण मला भीति वाटते की जसे हळेला फसविण्यात आले व ते सर्पाच्या धुर्ततेने फसविण्यात आले, तसे तुमचे मनही कसेतरी तुमच्या प्रामाणिकपणापासून आणि ख्रिस्ताच्या शुद्ध भक्तीपासून दूर नेले जाईल.
4 कारण जर एखादा तुमच्याकडे येऊन आम्ही जो येशू गाजवितो त्यापेक्षा वेगळ किंवा तुम्ही जे शुभवर्तमान स्वीकारले, त्यापेक्षा वेगळे शुभवर्तमान स्वीकारले तर तुम्ही ते सहज सहन करता.
5 पण मला वाटते मी अति श्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कुठल्या प्रकारे कमी आहे असे नाही.
6 मी प्रशिक्षित वक्ता नसेन. परंतु मला ज्ञान आहे. आम्ही हे तुम्हांला प्रत्येक प्रकारे पूर्णपणे स्पष्ट केले आहे.
7 तूम्ही उंच व्हावे म्हणून मी आपणांला नीच केले म्हणजे मी देवाचे शुभवर्तमान तुम्हांला फुकट सांगितले यात मी पाप केले काय?
8 तुमची सेवा करण्यासाठी मी दुसऱ्या मंडळ्यांकडून वेतन घेऊन त्यांना लुटले.
9 आणि मी तुम्हांजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही. कारण मासेदिनियाहून जे बंधु आले त्यांनी माझी गरज पुरविली. आणि सर्व गोष्टीत मी तुम्हांस ओझे होऊ नये म्हणून मी स्वत:स ठेवले आणि यापुढेही ठेवीन.
10 ख्रिस्ताचे खरेपण माझ्यामध्ये आहे म्हणून मी सांगतो की, अखया प्रांतात कुणीही माझ्या आभिमानास विरोध करणार नाही.
11 का? कारण मी तुम्हांवर प्रेम करीत नाही काय? देव जाणतो की, मी तुमच्यावर प्रेम करतो!
12 आणि मी जे करतो ते मी करीत राहीन यासाठी की, जे आमच्याबरोबर समानता साधण्याची संधी शोधत आहेत. ज्या गोष्टीविषयी ते अभिमान बाळगतात, त्यांना मी त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल असे करीन.
13 कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रुप धारण करणारे आहेत
14 आणि यात आश्चर्य नाही, कारण सैतानदेखील प्रकाशाच्या दूताचे रुप धारण करतो.
15 म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाच्या सेवकाचे रुप धारण करतात, त्यामुळे त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कार्याप्रमाणे होईल.
16 मी पुन्हा म्हणतो: कोणीही मला मूर्ख समजू नये, पण जर तुम्ही समजता तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा. यासाठी की मी थोडासा अभिमान बाळगीन.
17 या आत्मप्रौढी मिरविण्याच्या प्रकारामध्ये मी जसा प्रभु बोलतो तसे बोलत नाही. तर मूर्खासारखे बोलतो.
18 जसे बरेच लोक जगिक गोष्टीविषयी प्रौढी मिरवितात, तशी मीही प्रौढी मिरवीन.
19 तुम्ही शहाणे असल्याने मूर्खांचे आनंदाने सहन करता!
20 वस्तुत: जे कोणी तुम्हाला गुलाम करते, किंवा छळ करते किंवा तुमचा गैर फायदा घेते किंवा स्वत: पुढे येण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या तोंडावर मारते तरी तुम्ही त्यांचे सहन करता.
21 आम्ही जणू अशक्त असल्यासारखे मी लज्जेने बोलतो.पण ज्याविषयी कोणी अभिमान धरण्याविषयी धीट असेल त्याविषयी मीही धीट आहे (हे मी मूर्खापणाने बोलतो)
22 ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? (मी हे मूर्खासारखे बोलतो) मी अधिक आहे.
23 मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, पराकाष्ठेचे फटके खाल्ले, पुन्हा आणि पुन्हा मरणाला सामोरे गेलो.
24 पाच वेळेला यहूंद्याकडून मला एकोणचाळीस फटके बसले.
25 तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व एक दिवास घालविला.
26 मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वत:च्या देशबांधवांकडून धोका होता. विदेशी लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रात धोका होता, खोठ्या बंधूंकडून धोका होता.
27 मी कष्ट केले आणि घाम गाळला, व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक माहीत आहे. तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी अन्नाशिवाय राहिलो, थंडीत व उघडा असा मी राहिलो,
28 या सर्व गोष्टीशिवाय मी दररोज मंडळ्याप्रती माझ्या असलेल्या आस्थेमुळे दबावाखाली होतो.
29 कोण अशक्त आहे, आणि मला अशक्तपणा माहीत नाही? कोण पापात पडला आहे? आणि मी माझ्यामध्ये जळत नाही?
30 जर मला अभिमान बाळगायचा असेल तर, माइया अशक्तपणा दाखविणान्या गोष्टीविषयी मी अभिमान बाळगीन.
31 देव आणि प्रभु येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुति केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही.
32 दिमिष्कात अरीतास राजाचा राज्यपाल याने मला अटक करण्यासठी शहराला पहारा दिला होता.
33 पण मला दोपलीत बसवून खिडकीतून गावकुसावरुन उतरविण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो.

2-Corinthians 11:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×