Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

2 Corinthians Chapters

2 Corinthians 7 Verses

Bible Versions

Books

2 Corinthians Chapters

2 Corinthians 7 Verses

1 प्रिय मित्रांनो, देवाची अभिवचने आमच्याकडे असल्याने जे शरीर व आत्म्याला दुषित करते त्या प्रत्येक गोष्टीपासून स्वत:ला शुद्ध ठेऊ या. देवाविषयी असलेल्या आदराने पवित्रतेत परिपूर्ण होऊ या.
2 तुमच्या अंत:करणात आमच्यासाठी जागा करा: आम्ही कोणाचेही वाईट केले नाही. आम्ही कोणाला भ्रष्ट केले नाही. आम्ही कोणाचा गैर फायदा घेतला नाही.
3 मी तुम्हांला तुमचा निषेध करावा म्हणून असे म्हणत नाही. मी तुम्हांला अगोदरही सांगितले आहे की, आमच्या अंत:करणात तुमच्याविषयी असे स्थान आहे की, आम्ही तुमच्याबरोबर जगू किंवा मरु.
4 मला तुमच्याविषयी मोठा विश्वास वाटतो, मला तुमच्याविषयी खूप अभिमान वाटतो, तुमच्या बाबतीत मी अधिक उत्तेजित झालो आहे. अनेक त्रास झाले तरी आमच्या सर्व त्रासात आमच्या आनंदाला उधाण आले आहे.
5 कारण जेव्हा आम्ही मासेदिनियाला आलो, तेव्हा आमच्या या शरीराला विसावा नव्हता. पण आम्हांला प्रत्येक ठिकाणी त्रास देण्यात आला, बाहेरुन भांडणे, आतून भीति होती.
6 पण जे हताश झाले आहेत त्याचे सांत्वन देव करतो, त्याने तीताच्या येण्याने आमचे सांत्वन केले.
7 त्याच्यामुळेच नव्हे तर तुम्ही त्याला दिलेल्या सांत्वनामुळेसुद्धा. तुमच्या आमच्याबद्दल असलेल्या ओढीबद्दल त्याने आम्हांला सांगितले आहे. तुमचे खोलवरचे दु:ख, माइयाबद्दलची तुमची असलेली तीव्र सदिच्छा याविषयी सांगितले, त्यामुळे माझा आनंद पूर्वीपेक्षा वाढला आहे.
8 जरी मी माझ्या पत्रामुळे तुम्हांला दु:खावले असले तरी त्याबद्दल मला खेद होत नाही, जरी मला खेद होत असला तरी मला आता जाणवले आहे की, माझ्या पत्रामुळे तुम्हांला दु:ख झाले, पण फक्त थोड्या वेळापुरते असावे.
9 तरी आता मी आनंदी आहे. यासाठी नाही की, तुम्हांला दु:खी केले, तर यासाठी की तुमच्या दु:खामुळे तुम्ही पशचात्ताप केला. कारण देवाने इच्छिल्याप्रमाणे तुम्ही दु:खी झाला आणि म्हणून आमच्याकडून कुणाची कोणत्याही प्रकारे हानि झाली नाही.
10 दैवी दु:ख तारणाप्रत नेणारा पश्र्चात्ताप आणते आणि कोणताही खेद बाळ्गीत नाही, पण जगिक दु:ख मरण आणते.
11 पहा दैवी दु:खामुळे तुमच्यात काय निर्माण झाले आहे: किती तरी गंभीरपणा आणि आत्मियता, स्वत:ला स्पष्ट करण्यासाठी किती उत्सुकता, किती संताप, किती सावधानता, किती ओढ, किती सदिच्छा व न्याय मिळवून देण्यासाठी किती तत्परता, या बाबतीत प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वत:ला निर्दोष असे सिद्ध केले.
12 म्हणून जरी मी तुम्हांला लिहिले तरी ते कोणी चूक केली म्हणून किंवा कोणी दूसऱ्याला दु:ख दिले म्हणून नाही तर उलट देवासमोर तुम्ही आमच्या बाबतीतील तुमची आत्मियता दाखवली हे तुम्हांला पाहता यावे.
13 यामुळे आम्हास उत्तेजन मिळाले.आमच्या स्वत:च्या उत्तेजनाशिवाय आणखी आम्ही विशेषत: तीताला आनंदीत पाहून आम्हांला आनंद झाला कारण त्याचा आत्मा तुम्हा सर्वांमुळे ताजातवाना झाला आहे.
14 मी त्याला तुमच्याविषयी अभिमानाने सांगितले आणि तुम्ही मला लज्जित केले नाही. पण जे सर्व काही आम्ही तुम्हांला सांगितले ते खरे खरे होते. तसा आमचा तुमच्याविषयीचा अभिमान जो तीताला सांगितला ह्याच रीतीने स्वत:चा खरेपणा सिद्ध केला.
15 आणि जेव्हा त्याला तुमचा आज्ञाधारकपणा आठवतो तेव्हा त्याचे तुमच्या विषयीचे प्रेम अधिकच वाढते. त्याचा स्वीकार तुम्ही भीत व कांपत केला.
16 मला आनंद वाटतो की मला तुमच्याविषयी पूर्ण विश्वास वाटू शकतो.

2-Corinthians 7:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×