विषयसुखासाठी एकमेकाला वचित करु नका, तुम्हालां प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा. आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुम्च्यात आत्मसंयमन नसल्याने मोहात पाडू नये.
मला असे वाटते की, सर्व लोक माझ्यासारखे असावेत पण प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वत:चे असे देवापासून दान आहे. एकाला एका प्रकारे राहण्याचे आणि दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारे राहण्याचे.
आता इतरासाठी सांगतो, आणि हे मी सांगत आहे, प्रभु नाही: जर एखाद्या ख्रिस्ती बांधवाची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल, आणि त्याच्याबरोबर राहण्यास ती राजी असेल तर त्याने तिला सोडचिठ्ठी देऊ नये.
कारण विश्वास न ठेवणाऱ्या पतीचे त्याच्या ख्रिस्ती पत्नीबरोबरच्या निकट सहवासाद्वारे पवित्रीकरण झाले आहे आणि विश्वास न ठेवणाऱ्या पत्नीचे त्या ख्रिस्ती पतीबरोबरच्या निकट सहवासाद्वारे त्यांचे नाते देवाच्या दृष्टीनेही कायदेशीर आहे. नाहीतर तुमची मुले अशुद्ध झाली असती, परंतु आता ती पवित्र आहेत.
तरीही विश्वास न ठेवणारा वेगळा होत असेल तर त्याने वेगळे व्हावे. याबाबतीत ख्रिस्ती बंधु किंवा बहीण यांना मोकळीक आहे. देवाने आपल्याला शांतीने राहण्यासाठी बोलावले आहे.
कारण पत्नी, तू तुइया विश्वास न ठेवणाऱ्या पतीला तारु शकशील हे तुला कसे माहीत? किंवा पती, तू आपल्या विश्वास न ठेवणाऱ्या पत्नीला तारशील हे तुला कसे माहीत? देवाने पाचारण केल्याप्रमाणे राहा.
एखाद्याला जेव्हा देवाने पाचारण केले होते तेव्हा त्याची अगोदरच सुंता झाली होती काय? त्याने आपली सुंता लपवू नये. कोणाला सुंता न झालेल्या स्थितीत पाचारण झाले काय, तर त्याने सुंता करु नये.
कारण जो कोणी प्रभुमध्ये गुलाम असा पाचारण केलेला होता तो देवाचा मुक्त केलेला मनुष्य आहे, त्याचप्रमाणे ज्या मुक्त मनुष्याला देवाचे पाचारण झाले आहे तो देवाचा गुलाम आहे.
पण जरी तुम्ही लग्न केले तरी तुम्ही पाप केलेले नाही. आणि जर कुमारिका लग्न करते तर तिने पाप केले नाही. पण अशा लोकांना शारीरिक पीडा होतील आणि या पीडा टाळण्यासाठी मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
जे शोक करीत आहेत त्यांनी शोक करीत नसल्यासारखे, जे आनंदी आहेत त्यांनी आनंदी नसल्यासारखे, जे वस्तु विकत घेत आहेत, त्यांनी जणू काही त्यांच्याकडे स्वत:चे काहीच नाही
आणि जे लोक जग त्यांना ज्या त्यांना ज्या गोष्टी देऊ करते व त्या गोष्टींचा जे उपयोग करुन घेतात, त्यांनी जणू काय त्या गोष्टींचा पूर्ण उपयोग करुन घेतला नाही, असे राहावे. कारण या जगाची सध्याची स्थिती लयास जात आहे.
त्यामुळे तो द्विधा अवस्थेत असतो. आणि एखादी अविवाहित स्त्री किंवा कुमारिका, प्रभूच्या कामाबद्दल उत्सुक असते. यासाठी की, तिने शरीराने आणि आत्म्याने पवित्र असावे. परंतु विवाहित स्त्री जगिक गोष्टी आणि तिच्या पतीला कसे आनंदी ठेवता येईल याचीच चिंता करते.
मी हे तुमच्याच फायद्यासाठी सांगत आहे. तुमच्यावर बंधने लादण्यासाठी सांगत नाही. आचरणातील, सुव्यवस्थेतील फायद्यासाठी व प्रभूच्या सेवेसाठी विनाअडथळा तुम्हाला समर्पण करणे शक्य व्हावे म्हणून सांगतो.
जर एखाद्याला असे वाटते की, तो त्याच्या कुमारिकेविषयी योग्य ते करीत नाही आणि जर त्याच्या भावना तीव्र आहेत, तर त्या दोघांनी पुढे होऊन लग्न करुन घेणे आवश्यक आहे. त्याला जे वाटते ते त्याने करावे.
तो पाप करीत नाही. त्याने लग्न करुन घ्यावे. परंतु जो स्वत: मनाचा खंबीर आहे व जो कोणत्याही दडपणाखाली नाही पण ज्याचा स्वत:च्या इच्छेवर ताबा आहे. व ज्याने आपल्या मनात विचार केला आहे की आपल्या कुमारिकेला ती जशी आहे तशीच ठेवावी म्हणजे तिच्याशी विवाह करु नये, तर तो चांगले करतो.