Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Luke Chapters

Luke 5 Verses

Bible Versions

Books

Luke Chapters

Luke 5 Verses

1 मग असे झाले की, लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती व ते देवाचे वचन ऐकत होते आणि तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा होता,
2 तेव्हा त्याने सरोवरातील दोन होड्या पाहिल्या, पण होड्यातील कोळी बाहेर गेले होते व त्यांची जाळी धूत होते.
3 त्यातील, शिमोनाच्या होडीवर येशू चढला आणि त्याने ती होडी किनाऱ्यापासून थोडी दूर नेण्यास सांगितले. नंतर तो होडीत बसला व लोकांना शिक्षण देऊ लागला.
4 जेव्हा त्याने बोलणे संपविले, तेव्हा तो शिमोनाला म्हणाला, “खोल पाण्यात होडी ने आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.”
5 शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी आपण सांगत आहात म्हणून मी जाळे खाली सोडतो.”
6 जेव्हा त्यांनी तसे केले तेव्हा त्यांच्या जाळ्यात भरपूर मासे लागले. पण त्यांचे जाळे तुटू लागल्याने
7 त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या जोडीदारांना मदत करण्यासाठी बोलाविले. ते आले आणि त्यांनी इतके मासे भरले की, दोन्ही होड्या बुडु लागल्या.
8 शिमोन पेत्राने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो येशूच्या पाया पडला आणि म्हणाला, “प्रभु, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे!”
9 तो असे म्हणाला कारण तो आणि त्याच्या साथीदारांना इतके मासे मिळाले होते की, हे कसे झाले म्हणून ते आश्चर्यात पडले.
10 जब्दीचे पुत्र याकोब व योहान हे ही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले होते. ते शिमोनाचे भागीदार होते. मग येशू शिमोनाला म्हणाला, “भिऊ नको. कारण येथून पुढे तू माणसे धरशील.”
11 त्यांनी त्यांच्या होड्या किनाऱ्याला आणल्या, नंतर त्यानी सर्व काही सोडले आणि त्याच्यामागे गेले.
12 आणि असे झाले की, तेव्हा येशू कुठल्या एका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता, जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो तोंडावर उपडा पडला आणि त्याला विनंति केली, “प्रभु, जर तुझी इच्छा असेल तर तू मला बरे करण्यास समर्थ आहेस.”
13 येशूने आपला हात लांब करुन त्याला स्पर्श केला आणि म्हटले, “मला तुला बरे करायचे आहे, बरा हो!” आणि ताबडतोब त्याचे कुष्ठ नाहीसे झाले.
14 मग येशूने त्याला आज्ञा केली की, “कोणालाही सांगू नकोस, पण जा आणि स्वत:ला याजकाला दाखव आणि तुझ्या शुद्धतेबद्दल मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे अर्पण कर. त्यांना समजेल की तू बरा झाला आहेस. ते आश्चर्यचकित झाले, त्यांच्यासाठी हा पुरावा म्हणून कर.”
15 परंतु येशूविषयीच्या बातम्या अधिक पसरतच गेल्या. आणि मोठे जमाव त्याचे ऐकण्यासाठी व त्यांच्या रोगांपासून मुक्त होण्यासाठी येत असत.
16 परंतु येशू नेहमी एकांतात जात असे व प्रार्थना करीत असे.
17 असे झाले की एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते गालील, यहूदीया आणि यरुशलेम या भागातील प्रत्येक गावातून आले होते. प्रभूचे सामर्थ्य त्याच्याजवळ होते त्यामुळे तो बरे करत होता.
18 काही लोक एका अर्धांगवायु झालेल्या मनुष्याला बिछान्यात घालून घेऊन आले. त्यांनी त्याला आत आणण्याचा व येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला.
19 परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापडेना. ते छपरावर गेले, आणि त्याला खाटेसाहित आत सोडले, कौले काढून बरोबर मध्यभागी जेथे येशू बसला होता तेथे सोडले.
20 त्यांचा विश्वास पाहून येशू त्याला म्हणाला, “मनुष्या, तुइया पापांची क्षमा झाली आहे!”
21 नियमशास्त्राचे शिक्षक आणि परुशी स्वत:शी विचार करु लागले: “हा कोण आहे, जोे असे दुर्भाषण करीत आहे? देवाशिवाय कोण पापांची क्षमा करु शकतो?”
22 पण येशू विचार जाणून होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपल्या अंत:करणात असा विचार का करता?
23 “तुुझ्या पापांची क्षमा झाली आहे’ किंवा “ऊठ आणि चालू लाग’ यांतील कोणते म्हणणे सोपे आहे?
24 पण तुम्हांला हे कळावे की मनुष्याच्या पुत्राला”पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” तो अर्धांगवायु झालेल्या मनुष्याला म्हणाला, “मी तुला सांगतो ऊठ, आपला बिछाना उचल आणि घरी जा.”
25 ताबडतोब तो उभा राहिला, ज्या बिछान्यावर तो झोपला होता तो त्याने उचलला व देवाची स्तुति करीत आपल्या घरी गेला.
26 आणि ते सर्व आश्चर्यचकित झाले, आणि देवाची स्तुति करु लागले, ते खरोखरच आश्चर्यचकित झाले, ते म्हणाले, “आम्ही आज आश्चर्य पाहिले!”
27 यानंतर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले, येशू त्याला म्हणाला, “माइया मागे ये!”
28 लेवी सर्व काही तेथेच सोडून उठला आणि त्याच्या मागे गेला.
29 नंतर लेवीने त्याच्या घरी येशूसाठी मोठी मेजवानी दिली. जकातदारांचा आणि इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्याबरोबर जेवत होता.
30 परुशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्या शिष्यांकडे तक्रार केली, ते म्हणाले, “तुम्ही जकातदार आणि पापी लोकांबरोबर का जेवता?”
31 येशू त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, पण जे रोगी आहेत, त्यांना वैद्याची गरज आहे.
32 मी धार्मिकांस नाही तर पाप्यांस पश्चाताप करण्यासाठी बोलावण्यास आलो आहे.
33 ते त्याला म्हणाले, योहानाचे शिष्य नेहमी उपास करतात आणि प्रार्थना करतात. आणि परुश्यांचे शिष्यसुद्धा तसेच करतात, पण तुझे शिष्य नेहमीच खातपीत असतात.”
34 येशू त्यांना म्हणाला, “नवरा मुलगा (वर) बरोबर असताना त्याच्या पाहुण्यांना तुम्ही उपाशी ठेवाल काय?
35 पण असे दिवस येत आहेत की, वराला त्यांच्यापासून घेतले जाईल आणि त्या दिवसांत ते उपास करतील.”
36 त्याने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली, “कोणीही नवीन कापडाचा तुकडा फाडून जुन्याला लावीत नाही, जर तो तसे करतो तर तो नवे कापड फाडतो पण नव्या कापडांचे ठिगळ जुन्या कापडाला योग्य दिसणार नाही.
37 आणि कोणीही नवा द्राक्षारस जुन्या द्राक्षारसाच्या कातडी पिशवीत ठेवीत नाही जर तो असे करतो तर नवा द्राक्षारस कातडी पिशवी फोडून बाहेर उसळेल.
38 नवा द्राक्षारस नव्या कातडी पिशवीतच ठेवला पाहिजे.
39 कोणालाही जुना द्राक्षारस प्याल्यानंतर नवा नको असतो कारण तो म्हणतो, “जुना द्राक्षारसच चांगला आहे.”‘

Luke 5:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×