Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Judges Chapters

Judges 9 Verses

Bible Versions

Books

Judges Chapters

Judges 9 Verses

1 यरुब्बाल (गिदोन) याचा अबीमलेख हा मुलगा. शखेम येथे तो आपल्या आजोळी गेला आणि मामांना व सर्व नातेवाईकांना म्हणाला,
2 शखेम नगरातील वडीलधाऱ्यांना विचारा की, यरुब्बालच्या सत्तर मुलांच्या सत्तेखाली राहणे चांगले की एकाच माणसाच्या आधिपत्याखाली असणे चांगले? मी तुमचा नातेवाईक आहे हे लक्षात ठेवा.”
3 अबीमलेखच्या मामांनी शखेम नगरातील अधिकारी मंडळींना हा प्रश्न विचारला. त्यांनीही अबीमलेखला आपला पाठिंबा द्यायचे ठरवले. ते म्हणाले, “हा तर आमचा बंधू आहे.”
4 शखेमच्या या अधिकाऱ्यांनी बआल-बेरीथच्या मंदिरातून सत्तर रौप्यमुद्रा अबीमलेखला दिल्या. त्यातून अबीमलेखने काही रिकामटेकडी कसलाही मुलाहिजा नसलेली माणसे आपल्या पदरी बाळगली. ती सतत अबीमलेख बरोबर राहात असत.
5 अबीमलेख अफ्रा येथे आपल्या वडीलांच्या गावी आला व त्याने आपल्या सत्तर भावांची एकाचवेळी कत्तल केली. फक्त त्यातला सगव्व्यात धाकटा लपून बसल्यामुळे बचावला. त्याचे नाव योथाम होते.
6 मग शखेम आणि मिल्लो येथील नेते एकत्र आले. शखेममधील स्तंभाजवळच्या एका वृक्षाखाली जमून त्यांनी अबीमलेखला आपला राजा म्हणून घोषित केले.
7 हे वर्तमान योथामने ऐकले तेव्हा तो गेला आणि गरिज्जीम डोंगरावर उभा राहून मोठयाने लोकांशी बोलू लागला.“शखेम नगरातील अधिकाऱ्यांनो ऐका. मग परमेश्वरही तुमचे ऐकेले.”
8 एक दिवस, आपल्यांला कोणीतरी राजा असावा असे सर्व झाडांच्या मनात आले. तेव्हा जैतून वृक्षाला ती झाडे म्हणाली, “तू आमचा राजा हो.”
9 जैतून वृक्ष त्यांना म्हणाला, “सर्व माणसे आणि परमेश्वर माझ्यापासून जे तेल मिळते त्यासाठी माझी स्तुती करतात. ते तेल करायचे सोडून मी नुसता इतर झाडांवर डोलत राहू काय?”
10 मग ती झाडे अंजीराच्या झाडाकडे गेली व म्हणाली, “तू आमचा राजा हो.”
11 पण अंजीराच्या झाडाने उत्तर दिले, “माझी गोड आणि रसाळ फळे करायचे थांबवून मी इतर झाडांवर डोलत राहायला जाऊ की काय?”
12 तेव्हा ती झाडे द्राक्षवेलीकडे जाऊन म्हणाली “तू आम्हावर राज्य कर.”
13 पण द्राक्षवेलीने उत्तर दिले, “माझ्या द्राक्षरसामुळे माणसे, राजेलोक संतुष्ट होतात. ते करायचे सोडून मी इतर झाडांवर हालत डोलत राहू का?”
14 शेवटी ती सर्व झाडे काटेरी झुडुपाकडे जाऊन म्हणाली, “तू ये आणि आम्हावर राज्य कर.”
15 ते काटेरी झुडूप त्यांना म्हणाले, “तुम्हाला खरोखरच मला राजा करायचे असेल तर माझ्या सावलीत आश्रयाला या. तसे केले नाहीत तर काटेरी झुडुपातून आग्नि निघून तो लबानोनचे गंधसरु भस्मसात करील.”
16 “आता, अबीमलेखला आपला राजा म्हणून घोषित करताना तुम्ही पूर्णपणे प्रमाणिक राहिला असलात तर त्याच्या कारकीर्दीत सुखात असा. यरुब्बाल आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी तुमचे वर्तन योग्य असेल तर ठीकच आहे.
17 पण माझ्या वडीलांनी तुमच्यासाठी काय केले ते आठवा ते तुमच्यासाठी झुंजले. मिद्यानापासून तुमचे रक्षण करताना त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला.
18 पण आता तुम्ही त्यांच्या कुटुंबीयांकडे पाठ फिरवली आहे. तुम्ही माझ्या वडालांच्या सतर मुलांना एकाच वेळीठार केले आहे. अबीमलेखला तुम्ही शखेमचा राजा केले आहे. तो तुमचा नातेवाईक म्हणून तुम्ही असे केलेत पण तो निव्वळ दासीपुत्र आहे.
19 यरुब्बाल आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी तुम्ही खरोखरच प्रमाणिक असाल तर अबीमलेखच्या राज्यात सुखी असा. तो ही तुमच्यावर आंनदाने राज्य करो.
20 पण तुमचे हे वागणे बरोबर नसेल तर मात्र अबीमलेखच्या हातून शखेम आणि मिल्लो यांचा नाश होवो. तसेच अबीमलेखचाही नाश होवो!”
21 एवढे बोलून योथाम बैर या शहराला पळून गेला. अबीमलेखाच्या भीतीने तो तेथेच राहिला.
22 अबीमलेखने इस्राएल लोकांवर तीन वर्षे राज्य केले.
23 अबीमलेखने यरुब्बालाच्या सत्तर मुलांची म्हणजे आपल्याच भावंडांची हत्या केली होती. या दुष्कृत्यात त्याला शखेमच्या अधिकाऱ्यांची साथ होती. तेव्हा अबीमलेख आणि हे अधिकारी यांच्यात परमेश्वराने वैमनस्य निर्माण केले. अबीमलेख विरुद्ध या अधिकाऱ्यांनी कपट कारस्थान करायला सुरुवात केली.
25 आता त्यांना अबीमलेख आवडेनासा झाला होता. त्यांनी वाटमारी करायला डोंगरांवर माणसे ठेवली. या लूटमारीच्या बातम्या अबीमलेखपर्यंत येऊन पोचल्या.
26 याच सुमाराला एबेदचा मुलगा गाल आपल्या भाऊ बंदांसह शखेम शहरी राहायला आला. तेव्हा शखेमच्या वडीलधान्यांनी गालवर विश्र्वास टाकून राहायचे ठरवले.
27 एक दिवस शखेममधील लोक द्राक्ष खुडणीसाठी मव्व्यामध्ये गेले. त्यांनी द्राक्षरस काढला आणि त्यांच्या दैवतांच्या देवळात उत्सव केला. खाद्यपेयांची मेजवानी केली आणि अबीमलेखला शिव्याशाप दिले.
28 तेव्हा एबेदपुत्र गाल म्हणाला, “आपण शखेमचे लोक आपण त्याच्या राजवटीत का राहावे? तो कोण समजतो स्वत:ला? यरुब्बालच्या मुलांपैकी तो एक, बरोबर? जबूलला अबीमलेखने अधिकारी केले आहे. खरे ना?आपण अबीमलेखला जुमानता कामा नये. आपण आपल्याच लोकांचे हमोरच्या लोकांचे ऐकले पाहिजे. (हमोर हा शखेमचा मूळ पुरुष)
29 तुम्ही मला या लोकांचा सेनापती नेमले तर मी अबीमलेखला नेस्तनाबूत करीन. “आपल्या सैन्याची जमवाजमव कर आणि युध्दाला सज्ज हो, असे मी त्याला आव्हान देईन.”
30 जबूल शखेम नगराचा अधिकारी होता त्याने हे ऐकले आणि तो संतापला.
31 त्याने अरुमा येथे दूत पाठवून अबीमलेखला हे वर्तमान पोचवले. तो संदेश असा:एबेदाचा मुलगा गाल आणि त्याचे भाऊबंद शखेम शहरात येऊन राहिले आहेत. ते तुला त्रास देण्यासाठी कारस्थान करत आहेत. त्यांनी सगव्व्या शहरवासियांना तुझ्याविरुद्ध फितवले आहे.
32 तेव्हा तू आणि तुझी माणसे रातोरात येऊन नगराच्या बाहेर शेतात लपून राहा.
33 सकाळी सूर्य वर येताच शहरावर हल्ला चढवा. गाल आणि त्याची माणसे तुझा प्रतिकार करायला येतील तेव्हा त्यांचा चांगला समाचार घ्या.
34 तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैनिक रात्रीच निघून नगराकडे आले. चार तुकडचा करुन ते सैन्य शखेम बाहेर दबा धरून बसले.
35 इकडे एबेद पुत्र गाल बाहेर पडून नगराच्या वेशीपाशी उभा राहिला तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैन्य दबा धरुन बसले होते ते एकदम बाहेर आले.
36 गालने ते पाहिले व तो जबूलला म्हणाला, “ते पाहा डोंगरमाथ्यावरुन लोक उतरत आहेत.”जबूल त्याला म्हणाला, “तू पाहातोस त्या डोंगराच्या सावल्या आहेत त्या तुला माणसांसारख्या वाटत आहेत.”
37 पण गाल पुम्हा म्हणाला, “ती पाहा तिकडून काही माणसे प्रदेशाची नाभी नानक जागा उतरुन येत आहेत. आणि जादूगाराच्या वृक्षाजवळही कोणाचे तरी डोके मी पाहिले आहे.”
38 तेव्हा जबूल गालला म्हणाला, “मग आता तुझे बढाया मारणे कुठे गेले? “अबीमलेख कोण? आम्ही त्याचे का ऐकावे’ असे तू म्हणत होतास नाही का? त्यांना तू हसण्यावारी नेलेस. आता आणि त्यांचा सामना कर.”
39 तेव्हा गाल शखेमच्या लोकांचे नेतृत्व करुन लढाईला बाहेर पडला.
40 अबीमलेखच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. ते मागे आपल्या नगराच्या वेशीच्या दिशेने पळत सुटले. गालची पुष्कळ माणसे तर तेथे पोहोंचायच्या आधीच मारली गेली.
41 तेव्हा अबीमलेख अरूमा या नगराला परतला. जबूलने गाल आणि त्याचे भाऊबंद यांना शखेम सोडून जायला भाग पाडले.
42 दुसऱ्या दिवशी शखेमचे लोक आपापल्या शेतीवाडीवर कामाला गेले असे अबीमलेखला कळले.
43 त्याने आपल्या सैन्याच्या तीन तुकडचा केल्या. शखेमच्या लोकांवर त्याला गनिमी काव्याने हल्ला करायचा होता म्हणून त्याने आपल्या सैन्याला शेतात दबा धरून बसायला सांगितले. लोक गावातून शेतावर जायला निघतात तोच त्याने त्यांच्यावर हल्ला चढवला.
44 अबीमलेख एका तुकडी बरोबर शखेमच्या वेशीपाशी गेला. राहिलेल्या दोन तुकडचांनी शेतातील लोकांवर हल्ला करुन त्यांना ठार केले.
45 दिवसभर लढाई चालली. अबीमलेखच्या सैन्याने शखेम शहरावर ताबा मिळवला, तेथील लोकांना ठार मारले. मग त्याने शहराची पूर्ण नासधूस करुन त्यावर मीठ पसरले.
46 शखेमच्या गढीमध्ये काही माणसे अजूनही होती. त्यांनी हे ऐकले तेव्हा एल-बरीथ परमेश्वराच्या मंदिराच्या सर्वात सुरक्षित खोलीमध्ये ती एकत्र जमली.
47 हे ही अबीमलेखच्या कानावर आले.
48 तेव्हा तो आपल्या माणसांना घेऊन सलमोन डोंगरावर गेला. तेथे त्याने कुऱ्हाडीने झाडांच्या काही फांद्या छाटल्या. त्या फांद्या खांद्यावर घेतल्या. बरोबरच्या लोकांनाही त्याने वेळ न दवडता तसेच करायला सांगितले.
49 तेव्हा त्यांनीही फांद्या तोडून घेतल्या व अबीमलेखच्या पाठोपाठ ते चालू लागले. एल-बरीथच्या तळघरासमोर त्या रचून ठेवल्या मग त्यांनी त्या ढिगाला आग लावली. त्या आगीत आतील सर्व माणसे जळून खाक झाली. शखेमच्या मनोऱ्याजवळ राहाणारी बायकापुरुष मिळून जवळ जवळ हजार माणसे त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
50 नंतर अबीमलेख आपल्या बरोबरच्या लोकांसह तेबेस या नगरी गेला. तेही नगर त्यांनी काबीज केले.
51 पण त्या नगराच्या आत एक मजबूत गढी होती. तिच्यात नगरातील बायका, पुरुष, अधिकारी आश्रयाला गेले. आत जाताच त्यांनी दरवाजा पक्का बंद केला. मग ते गढीच्या छतावर चढून बसले.
52 अबीमलेख व त्याची माणसे हल्ला करायला गढीपर्यंत आली. त्यांना गढीला आग लावायची होती.
53 पण अबीमलेख गढीच्या दरवाजाशी थांबलेला असताना, वर चढून बसलेल्या एका बाईने त्याच्या डोक्यावर जाते टाकले. अबिमलेखच्या डोक्याला त्यामुळे भयंकर मार लागला.
54 अबीमलेख आपल्या सशस्त्र नोकराला तेवढड्यात म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला ठार कर “एका बाईने” अबीमलेखला मारले असे लोकांनी म्हणता कामा नये म्हणून तुझ्या हातून मला मरण येऊ दे.” तेव्हा त्याची शस्त्रे वाहून नेणाऱ्या सेवकाने त्याला तलवारीने भोसकले व अबीमलेख मरण पावला.
55 ते पाहिल्यावर इस्राएल लोक आपापल्या घरी परतले.
56 अशाप्रकारे, अबीमलेखला त्याच्या दृष्कृत्यांबद्दल परमेश्वराने सजा केली. आपल्या सत्तर भांवाना ठार करुन त्याने आपल्या वडीलांचा घोर अपराध केला होता.
57 शखेमच्या लोकांनाही त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल परमेश्वराने शिक्षा केली. एकंदरीत योथामचा शाप खरा ठरला. (गिदोन यरुब्बालचा योथाम हा सर्वात धाकटा मुलगा.)

Judges 9:10 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×