Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Judges Chapters

Judges 10 Verses

Bible Versions

Books

Judges Chapters

Judges 10 Verses

1 अबीमलेखच्या मृत्यूनंतर इस्राएल लोकांच्या रक्षणासाठी देवाने तोला या न्यायाधीशाची योजना केली. तोला हा पुवाचा मुलगा आणि पुवा दोदोचा. तोला इस्साखारच्या वंशातील होता व एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शामीर या नगरात राहात असे.
2 तोलाने तेवीस वर्षे इस्राएल लोकांमध्ये काम केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्याला शामीरमध्ये पुरण्यात आले.
3 तोलानंतर देवाने याईरची नेमणूक केली. तो गिलाद भागात राहणारा होता. त्याने बावीस वर्षे न्यायाधीश म्हणून काम पाहिले.
4 याला तीस मुलगे होते आणि ते तीस गाढवांवरबसून गिलादमधील तीस गावांचा कारभार पाहात असत. या गावाना अजूनही याईरची गावे म्हणून ओळखले जाते.
5 याईरच्या मृत्यूनंतर त्याचे कामोन नगरात दफन करण्यात आले.
6 इस्राएल लोकांनी परमेश्वराला अमान्य असलेल्या गोष्टी पुन्हा करायला सुरूवात केली. बआल, अष्टारोथ, या दैवतांची तसेच अरामी, सीदोनी, मवाबी, अम्मोनी तसेच पलिष्टी या लोकांच्या दैवतांची त्यानी उपासना करायला सुरुवात केली. आपल्या परमेश्वरापासून ते दूर गेले, त्याची सेवा करणे त्यांनी थांबवले.
7 तेव्हा परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. त्याने अम्मोनी आणि पलिष्टी या लोकांच्या हातून त्यांचा पराभव करवला.
8 त्याच वर्षी गिलादांच्या प्रदेशात, यार्देन नदीच्या पूर्वेला राहणाऱ्या इस्राएल लोकांचा त्या लोकांनी संहार केला. हा प्रदेश अमोरी लोकांचा होता. या भागातील इस्राएल लोकांना अठरा वर्षे हाल अपेष्टा काढाव्या लागल्या.
9 अम्मोनी लोक मग यार्देनच्या पलीकडे गेले यहूदा, बन्यामीन आणि एफ्राईम यांच्या वंशजांशी त्यांनी लढाया केल्या. अम्मोनी लोकांमुळे इस्राएल लोकांना फार त्रास भोगावा लागला.
10 तेव्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. ते म्हणाले, “परमेश्वरा, आम्ही दुष्कृत्य केले आहे. देवाला सोडून आम्ही बआल या भलत्या दैवताची उपासना केली आहे.”
11 परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “मिसरी, अमोरी, अम्मोनी, पलिष्टी अशा वेगवेगव्व्या लोकांकडून जेव्हा जेव्हा तुम्हाला जाच झाला तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्याकडे गाऱ्हाणे आणलेत. मी तुमची सुटका करत गेलो.
12 सीदोनी, अमालेकी, मिद्यानी यांनीही तुम्हाला छळले तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. तेव्हा ही मी तुम्हाला वाचवले.
13 पण मला सोडून तुम्ही भलत्या दैवतांच्या पाठीमागे लागलात. तेव्हा आता पुन्हा मी तुमच्या मदतीला येणार नाही.
14 त्या दैवतांची उपासना करायला तुम्हाला आवडते, तेव्हा आता त्यांनाच बोलवा आणि मदतीसाठी विनंती करा. त्यांनाच तुमचे संकटातून रक्षण करु द्या.”
15 पण इस्राएल लोकांनी परमेश्वराची विनवणी केली. ते म्हणाले, “आमचे चुकले आम्हाला हवी ती शिक्षा दे, पण आता आम्हाला वाचव.”
16 मग इस्राएल लोकांनी त्या परक्या दैवतांचा त्याग केला. परमेश्वराकडे ते पुन्हा एकदा वळले. त्यांचे हाल पाहून परमेश्वराला त्यांची दया आली.
17 अम्मोनी लोक युध्दासाठी एकत्र जमले. गिलाद प्रदेशात त्यांची छावणी होती. इस्राएल लोकही एकत्र आले. मिस्या येथे त्यांनी तळ दिला.
18 गिलाद प्रदेशातील लोकांचे नेते म्हणाले, “अम्मोनी लोकांवरील हल्ल्याचे जो कोणी नेतृत्व करील तो गिलाद प्रदेशातील आम्हा लोकांचा मुख्य होईल.”

Judges 10:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×