Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Judges Chapters

Judges 8 Verses

Bible Versions

Books

Judges Chapters

Judges 8 Verses

1 एफ्राईम लोक गिदोनवर चिडले होते. त्यामुळे गिदोनला भेटले तेव्हा त्यांनी विचारले, “तू मिद्यान्यांवर चढाई केलीस तेव्हा आम्हाला का बोलावले नाहीस? आम्हाला तू वागणूक का दिलीस?”
2 गिदोनने तेव्हा एफ्राईम लोकांना सांगितले, “माझे तुमच्या इतके चांगले चाललेले नाही. आमच्यापेक्षा तुम्ही कितीतरी जास्त पीक घेता. आम्ही अबियेजर जितकी द्राक्षे काढतो त्यापेक्षा जास्त द्राक्षे तर तुम्ही तशीच मव्व्यात पडू देता. हे खरे नाही काय?
3 याही वर्षी तुम्ही चांगले पीक घेतले आहे. ओरेब जेब या दोन मिद्यानी नेत्यांना तर परमेश्वराने तुमच्या हाती सोपवले. तुम्ही जे केलेत त्याच्याशी मी माझ्या यशाची तुलना कशी करु?” गिदोनचे हे उत्तर ऐकून एफ्राईम लोकांचा राग बराच निवळला.
4 मग गिदोन आपल्या तीनशे माणसांसह यार्देन नदी उतरुन पलीकडे गेला. पाठलाग करताना ते सर्व थकलेले आणि भुकेलेले होते.
5 गिदोन सुक्कोथ नगरातील लोकांना म्हणाला, “माझे सैनिक फार थकले आहेत. त्यांना काहीतरी खायला द्या अजूनही आम्हाला जेबह आणि सलमुन्ना या मिद्यानी राजांचा पाठलाग करायचा आहे.”
6 तेव्हा सुक्कोथ येथील अधिकारी म्हणाले, “आम्ही त्यांना खायला का द्यावे? अजून तर तुम्ही त्या दोन राजांना पकडलेलेही नाही.”
7 त्यावर गिदोन म्हणाला, “तुम्ही आम्हाला अन्न देत नाही तर जेबह आणि सलमुन्ना यांना ताब्यात घ्यायला परमेश्वरच आमच्या मदतीला येईल. मग मी परत इथे येईन. तेव्हा वाळवंटातील काटेरी झुडुपांनी मी तुमची चामडी लोळवीन.”
8 गिदोन मग सुक्कोथहून पनुएल शहराकडे निघाला. तेथील लोकांकडेही त्याने अन्नाची मागणी केली. पण पनुएल येथील लोकांनीही सुक्कोथ येथील लोकांनी दिले तसेच उत्तर दिले.
9 तेव्हा गिदोन त्या लोकांना म्हणाला, “विजयी होऊन परत आल्यावर मी येथील मनोरा उध्वस्त करीन.”
10 जेबह, सलामुन्ना आणि त्यांचे सैन्य कर्कोर नगरात होते. त्यांच्या सैन्यात पंधरा हजार माणसे होती. पूर्वेकडच्या लोकांमधून जगले वाचले ते एवढेच त्यांचे एक लाख वीस हजार शूर योध्दे मारले गेले.
11 मग गिदोन आणि त्याचे लोक नोबह आणि यागबहा या शहरांच्या पूर्वेकडील राहुट्यांचा रस्ता धरून कर्कोर येथे आले व त्यांनी शत्रूवर हल्ला चढवला. शत्रू बेसावध होता.
12 मिद्यान्यांचे राजे जेबह व सलमुन्ना पळून गेले. गिदोनने त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडले. शत्रूसैन्याचा गिदोनच्या सैन्याने पाडाव केला.
13 त्यानंतर हेरेसच्या घाटातून योवाशपुत्र गिदोन आणि त्याच्याबरोबरचे सैन्य परत फिरले.
14 गिदोनने सुक्कोथमधील एका तरुणाला पकडले आणि त्याला काही प्रश्न विचारले. त्या तरुणाने सुक्कोथ नगरातील अधिकारी आणि वडीलधारी अशा सत्याहत्तर जणांची नावे गिदोनला लिहून दिली.
15 त्यानंतर गिदोन सुक्कोथला आला. नगरवासीयांना तो म्हणाला, “हे पाहा जेबह आणि सलमुन्ना. “तुझ्या दमलेल्या सैनिकांना आम्ही अन्न का द्यावे? तुम्ही अजून जेबह आणि सलमुन्ना यांना कुठे पकडले आहे? असे म्हणून माझी चेष्टा करत होतात नाही का?”
16 नंतर गिदोनने शहरातील वडील धाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी वाळवंटातील काटेरी झुडुपांनी फोडून काढले.
17 पनुएल मधील मनोऱ्याचीही त्याने मोडतोड केली. नंतर नगरात राहणाऱ्या लोकांना ठार केले.
18 मग गिदोन, जेवह आणि सलमुन्ना यांना म्हणाला, “तुम्ही ताबोर डोंगरावर काही माणसे मारलीत. ती दिसायला कशी होती?”जेबह आणि सलमुन्ना म्हणाले, “ती तुझ्याप्रमाणेच चांगली राजबिंडी दिसत होती.”
19 गिदोन म्हणाला, “ती माझी भावंडे होती. माझ्या आईची पोटची मुले. परमेश्वराशपथ, तुम्ही त्यांना मारले नसते तर मीही आता तुम्हाला मारले नसते”
20 मग गिदोन आपल्या येथेर या ज्येष्ठ पुत्राला म्हणाला, “या राजांना मारुन टाक” पण येथेर पोरसवदा असल्यामुळे घाबरला. त्याला त्यांच्यावर तलवार चालवायचा धीर होईना.
21 तेव्हा ते राजे गिदोनला म्हणाले, “चल पुढे हो आणि तूच आमच्यावर प्रहार कर. तु पुरुष आहेस. तूच हे कृत्य करु शकशील.” तेव्हा गिदोनने त्यांना ठार केले. त्यांच्या उंटांच्या गव्व्यातील चंद्रकोरीच्या आकाराचे दागिने त्याने काढून घेतले.
22 मग इस्राएल लोक गिदोनला म्हणाले, “तू आम्हाला मिद्यानी लोकांच्या तावडीतून सोडवले आहेस तेव्हा आता तू आमच्यावर राज्य कर. तू तुझा मुलगा, तुझा नातू यांनीही आमच्यावर राज्य करावे.”
23 पण गिदोन त्यांना म्हणाला, “खुद्द परमेश्वरच सत्ताधीश आहे. मी किंवा माझा मुलगा तुमच्यावर राज्य करणार नाही.”
24 इस्राएल लोकांनी ज्या अनेकांचा पराभव केला त्यात इश्माएलीही होते. हे इश्माएली पुरुष सोन्याची कुंडले घालत. गिदोन इश्माएलींना म्हणाला, “तुम्ही जी लूट मिळवली आहे त्यातून तुमच्यापैकी प्रत्येकाने मला अशी सोन्याची कुंडले करुन द्या.”
25 त्याला इस्राएल लोक आनंदाने कबूल झाले त्यांनी जमिनीवर एक अंगरखा पसरला. त्यावर प्रत्येकाने कुंडले टाकले.
26 नंतर त्या सर्वांचे वजन केले ते त्रेचाळीस पौंड भरले. इस्राएल लोकांनी गिदोनला दिलेल्या इतर भेटवस्तू वेगव्व्याच त्यांचे वजन यात धरलेले नाही. चंद्रकोरी, लोलक या आकारांची भूषणे मिद्यानी राजांच्या अंगावरील जांभळी वस्त्रे उंटांच्या गव्व्यातील साखव्व्या अशा विविध भेटीही त्यांनी दिल्या.
27 या सोन्यातून गिदोनने एफोद बनवला तो त्याने आपल्या अफ्रा या गावी ठेवला. सर्व इस्राएल लोक त्याची पूजा करु लागले. परमेश्वरावरची त्यांची निष्ठा ढळून ते एफोदच्या नादी लागले. गिदोन आणि त्याचे कुटुंब यांना हा एफोद सापव्व्याप्रमाणे ठरुन त्यांना पापाचरणासाठी प्रवृत्त करायला कारणीभूत झाला.
28 मिद्यान अशाप्रकारे इस्राएलांचा अंकित झाला. त्यांनी पुन्हा डोके वर काढले नाही. गिदोन जिवंत असेपर्यंत, पुढे चाळीस वर्षे त्या प्रदेशात शांतता नांदत होती.
29 योवाशपुत्र यरुब्बाल गिदोन आपल्या घरी परतला.
30 त्याला सत्तर मुलगे होते. कारण त्याला अनेक बायका होत्या.
31 शखेम शहरात त्याला एक उपपत्नी होती. तिच्यापासून त्याला अबीमलेख नावाचा मुलगा झाला.
32 पुढे गिदोन बराच वृध्द होऊन मरण पावला. योवाशच्या कबरीत त्याला पुरण्यात आले. अबियेजर लोक राहतात त्या अफ्रा या गावात ही कबर आहे.
33 गिदोनच्या मृत्यूनंतर लगेचच इस्राएल लोक पुन्हा बआलच्या मागे लागले त्यांनी बआल-बरीथ याला परमेश्वर मानले.
34 भोवतालच्या सर्व शत्रूपासून परमेश्वराने त्यांना वाचवले असले तरी देखील इस्राएल लोकांना आपल्या परमेश्वराचा विसर पडला.
35 यरुब्बाल (गिदोन) याने त्यांच्यासाठी इतके केले तरीसुध्दा त्याच्या कुटुंबीयांशी इस्राएल लोक एकनिष्ठ राहिले नाहीत.

Judges 8:8 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×