Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Jeremiah Chapters

Jeremiah 9 Verses

Bible Versions

Books

Jeremiah Chapters

Jeremiah 9 Verses

1 जर माझे मस्तक पाण्याने भरलेले असते आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांसाठी अहोरात्र रडलो असतो.
2 जर वाळवंटात माझी धर्मशाळा असती तर मी माझ्या लोकांना सोडून त्यांच्यापासून खूप दूर जाऊ शकलो असतो. का? कारण त्यांनी सर्वांनी देवाचा विश्वासघात केला आहे. ते देवाच्या विरुद्ध गेले आहेत.
3 “ते त्यांच्या जिभा धनुष्यासारख्या वापरतात. त्यातून खोट्याचे बाण उडतात. ह्या भूमीवर, सत्य नव्हे, तर असत्य, खोटे बलवान झाले आहे, हे लोक एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात. त्यांना माझे ज्ञान नाही.” परमेश्वर असे म्हणाला आहे.
4 “तुमच्या शेजाऱ्यावर नजर ठेवा. तुमच्या स्वत:च्या भावावरसुध्दा विश्वास ठेवू नका का? कारण प्रत्येक भाऊ लबाड आहे. प्रत्येक शेजारी चहाडखोर आहे.
5 प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याशी खोटे बोलतो, कोणीही खरे बोलत नाही. यहूदाच्या लोकांनी आपल्या जिभांना खोटे बोलण्यास शिकविले आहे त्यांना परत येणे अशक्य होईपर्यंत त्यांनी पाप केले.
6 एका वाईट गोष्टीमागून दुसरी वाईट गोष्ट आली. खोट्यामागून खोटे आले. लोकांनी मला जाणून घ्यायचे नाकारले.” परमेश्वराने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या.
7 म्हणून, सर्वशाक्तिमान परमेश्वर म्हणतो: “धातू शुद्ध आहे की नाही हे बघण्यासाठी कामगार तो तापवितो.” त्याप्रमाणे मी यहूदाच्या लोकांची परीक्षा घेईन. मला दुसरा पर्याय नाही. माझ्या लोकांनी पाप केले.
8 यहूदाच्या लोकांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत. ते खोटे बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो. पण गुप्तपणे तो शेजाऱ्यावर हल्ला करण्याचा बेत आखत आहे.
9 “मी आता यहूदाच्या लोकांना शिक्षा करावी.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी शिक्षा करावी अशा प्रकारचे ते लोक आहेत हे तुम्हाला माहीत आहे. त्यांना योग्य ती शिक्षा मी करावी.”
10 मी, यिर्मया, डोंगरासाठी आकांत करीन. मी वैराण शेतांसाठी शोकगीत गाईन. का? कारण सजीव सृष्टी नाहीशी केली गेली आहे. तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही. गुरांचे हंबरणे ऐकू येत नाही. पक्षी दूर उडून गेले आहेत. प्राणी निघून गेले आहेत.
11 “मी, परमेश्वर, यरुशलेम नगरी म्हणजे कचऱ्याचा ढीग करीन. मी कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल. मी यहूदातील नगरे नष्ट करीन. मग तेथे कोणीही राहणार नाही.”
12 ह्या गोष्टी समजू शकण्याइतका सुज्ञ कोणी आहे का? परमेश्वराकडून शिकविला गेलेला कोणी आहे का? परमेश्वराच्या संदेशाचे स्पष्टीकरण कोणी करु शकेल का? ह्या भूमीचा नाश का झाला? जेथे कोणीही जात नाही अशा वाळवंटासारखी ती का केली गेली?
13 परमेश्वराने ह्या प्रश्नांची उत्तरे दिली. तो म्हणाला, “माझ्या शिकवणुकीला अनुसरायचे यहूदाच्या लोकांनी सोडून दिले. मी त्यांना पाठ दिले. पण त्यानी ऐकायचे नाकारले. ते माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागले नाहीत.
14 यहूदातील लोक त्यांच्या मर्जीप्रमाणे जगले ते दुराग्रही होते. बआल या खोट्या देवाला ते अनुसरले. त्यांच्या वडिलांनी त्यांना खोट्या देवांना अनुसरायला शिकविले.”
15 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “लवकरच मी यहूदाच्या लोकांना कडू अन्न खायला लावीन, विषारी पाणी प्यायला लावीन.
16 मी यहूदाच्या लोकांना दुसऱ्या राष्ट्रांतून विखरु टाकीन त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधीही ज्यांच्याबद्दल ऐकले नव्हते अशा परक्या देशांत ते राहतील. मी तलवारी घेतलेले लोक पाठवीन. ते यहूदाच्या लोकांना ठार मारतील. सर्व लोकांचा नाश होईपर्यंत ते संहार करतील.”
17 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, “आता या गोष्टींचा विचार करा. प्रेतयात्रेच्या वेळी रडणाऱ्या भाडोत्री बायकांना बोलवा. त्या कामात वाकबगार असलेल्या स्त्रियांना बोलवा.
18 लोक म्हणतात, ‘त्या बायकांना लवकर येऊन आमच्यासाठी रडू द्या मग आमचे डोळे भरुन येतील आणि अश्रूंचा पूर येईल.’
19 “सियोन मधून मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकायला येतो आहे. ‘आपला खरोखरच नाश झाला आपली खरोखरच अप्रतिष्ठा झाली. आता आपण आपली भूमी सोडलीच पाहिजे. कारण आपली घरे नष्ट केली गेली. आता ती दगडधोंड्यांचा ढिगारा झाली आहेत.”‘
20 आता, यहूदातील स्त्रियांनो, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका. परमेश्वराच्या तोंडचे शब्द ऐका. देव म्हणतो, “तुमच्या मुलींना मोठ्याने रडायला शिकवा. प्रत्येक बाईला शोकगीत गाता आलेच पाहिजे.
21 ‘मृत्यू आला आहे. तो चढून खिडक्यातून आना आला. मृत्यू राजवाड्यात आला. रस्त्यांवर खेळणाऱ्या आमच्या मुलांकडे आला. सार्वजनिक ठिकाणी जमणाऱ्या तरुणांकडे तो आला.’
22 “यिर्मया, या गोष्टी सांग: परमेश्वर म्हणतो, ‘मृत शरीरे खताप्रमाणे शेतांत पडतील. शेतकऱ्यांनी कापलेल्या धान्याप्रमाणे ती जमिनीवर पडतील. पण त्यांना गोळा करणारे कोणीही नसेल.”‘
23 परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल बढाई मारु नये.” असे परमेश्वर म्हणतो.
24 पण कोणाला बढाईच मारायची असेल तर त्याला ह्या गोष्टीसाठी मारु द्या. तो मला ओळखायला शिकला म्हणून बढाई मारु द्या. मी परमेश्वर आहे, मी कृपाळू व न्यायी आहे, जगात चांगल्या गोष्टी मी करतो आणि त्या गोष्टी मला आवडतात हे कळल्याबद्दल त्याला बढाई मारु द्या.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
25 परमेश्वराचा संदेश असा आहे “ज्यांची फक्त शारीरिक सुंता झाली आहे, अशांना शिक्षा करण्याची वेळ येत आहे.
26 मिसर, यहुदा, अदोम, अम्मोन, मवाब यातील व वाळवंटात राहणाऱ्या इतर लोकांबद्दल मी बोलत आहे. ह्या देशातील लोकांची शारीरिक सुंताही खरोखरी झालेली नाही. पण इस्राएलच्या घराण्यातील लोकांच्या ह्दयाची सुंताही झालेली नाही.”

Jeremiah 9:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×