Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Genesis Chapters

Genesis 23 Verses

Bible Versions

Books

Genesis Chapters

Genesis 23 Verses

1 सारा एकशें सत्तावीस वर्षे जगली;
2 ती कनान देशातील किर्याथ - आरबा (म्हणजे होब्रोन) येथे मरण पावली; तेव्हा अब्राहाम फार दु:खी झाला व त्याने तिच्यासाठी रडून खूप शोक केला.
3 मग अब्राहाम आपल्या मृत बायको जवळून उठला व तो हेथी लोकांस भेटण्यास गेला. तो म्हणाला,
4 “मी या देशाचा रहिवासी नाही, तर परदेशी आहे; म्हणून माझ्या बायकोला पुरण्यासाठी मला जागा नाही; तेव्हा मला जागेची गरज आहे, ती मला द्या.”
5 ते हेथी लोक अब्राहामाला म्हणाले,
6 “स्वामी, परमेश्वराच्या महान नेत्यांपैकी आपण एक आम्हामध्ये आहा; आम्हाकडे असलेल्या जागांपैकी चांगल्यातली चांगली जागा आपल्या मयतासाठी आपण घेऊ शकता; आमच्या कफनाच्या जागांपैकी तुम्हाला हवी ती जागा तुम्ही घेऊ शकता. अशा ठिकाणी आपल्या पत्नीला पुरण्यास आम्ही कोणीही मना करणार नाही.”
7 अब्राहाम उठला व अदबीने त्या लोकांना नमन करुन म्हणाला,
8 “तुम्हाला जर माझ्या मयत बायकोला पुरण्यासाठी खरोखर मला मदत करावी असे वाटत असेल तर मग माझ्यातर्फे सोहराचा मुलगा एफ्रर्न याच्याकडे शब्द टाका;
9 त्याच्या मालकीच्या शेताच्या एका टोकाला असलेली मकपेला येथील गुहा विकत घेणे मला आवडेल; मी तिची पुरेपूर किंमत त्याला देतो, व ती माझ्या मालकीची स्मशानभुमि म्हणून विकत घेतो; त्या बद्दल तुम्ही सर्वजण साक्षी असावे.”
10 त्या वेळी तेथे एफ्रोन हित्ती हा हेथी लोकान बसलेला होता; तो त्या सर्वांच्या देखत अब्राहामाला म्हणाला,
11 “नाही, नाही! माझे स्वामी, मी पैसे घेणार नाही; येथे माझ्या लोकांसमक्ष ते शेत व ती गुहा मी तुम्हाला देतो; तुम्ही तुमच्या बायकोला तेथे पुरा.”
12 मग अब्राहामाने हेथी लोकांस नमन केले;
13 अब्राहाम सर्व लोकांसमक्ष एफ्रोनास म्हणाला, “परंतु मला त्या शेताची पूर्ण किंमत तुला देऊन ते विकत घ्यायचे आहे; त्याचे पैसे माझ्याकडून घे आणि मग मी आपल्या मयतास तेथे मूठमाती देईन.”
14 एफ्रोनाने अब्राहामास उत्तर दिले,
15 “माझे स्वामी, माझे जरा ऐका; जमिनीची किंमत 10 पौंडचांदी आहे ही किंमत तुम्हाला व मला म्हणजे काय मोठे? तेव्हा त्यापेक्षा सरळ माझे शेत ताब्यात घ्या व तेथे तुमच्या बायकोला मूठमाती द्या.”
16 अब्राहामाने ही किंमतच असल्याचे समजून घेतले व त्याने एफ्रोनला त्यांच्या पद्धतीप्रमाणे चांदीची दहा नाणी (म्हणजे चारशे शेकेल भार रुप्याची नाणी) तोलून दिली.
17 या प्रमाणे मम्रेच्या पूर्वेला असलेले मकपेला येथील शेत, गुहा व त्यातील सर्व झाडी यांवरील एफ्रोनाचा मालकी हक्क बदलून तो अब्राहामाला मिळाला;
18 एफ्रोन व अब्राहाम यांच्यामध्ये ही मालकी हक्काची अदलाबदल नगरातील सर्व लोकांसमक्ष झाली;
19 त्यानंतर मम्रे (म्हणजे कनान देशातील हेब्रोन) जवळील त्या शेतातील गुहेत अब्राहामाने आपली बायको सारा हिला पुरले. याप्रमाणे ते शेत, गुहा इत्यादि हित्तीकडून विकत घेतल्यामुळे ती
20 अब्राहामाची मालमत्ता झाली आणि त्याने त्या जागेचा आपल्या मयतासाठी स्मशानभूमि म्हणून उपयोग केला.

Genesis 23:6 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×