Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Acts Chapters

Acts 11 Verses

Bible Versions

Books

Acts Chapters

Acts 11 Verses

1 यहूदी नसलेल्या लोकांनीसुद्धा देवाच्या वचनाचा स्त्रीकार केला आहे हे यहूदा प्रांतातील प्रेषितांनी व बंधुंनी ऐकले.
2 पण जेव्हा पेत्र यरुशलेमला आला, तेव्हा काही यहूदी विश्वासणान्यांनी त्याच्याशी वाद घातला.
3 ते म्हणाले, “जे सुंता न झालेले वयहूदीतर आहेत अशा लोकांच्या घरी तुम्ही गेला, एकढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्यासह जेवणही केले!”
4 म्हणून पेत्राने त्यांना सर्व घटना स्पष्ट करुन सांगितल्या.
5 पेत्र म्हणाला, “मी यापो शहरात होतो. प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मला दृष्टान्त घडला. मी दृष्टान्तामध्ये आकाशातून काही तरी खाली येताना पाहिले. ते मोठ्या चादरीसारखे दिसत होते. व त्याचे चारही कोपरे धरुन ते खाली सोडले जात होते. ते खाली आले आणि अगदी माझ्याजवळ थांबले.
6 मी त्याच्या आतमध्ये पाहिले. मी त्यात पाळीव आणि जंगली प्राणी पाहीले. सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी मी त्यात पाहिले.
7 एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली. ‘पेत्रा, ऊठ, यातील कोणताही प्राणी मार व खा!’
8 पण मी म्हणालो, ‘प्रभु, मी असे कधीही करणार नाही. मी अपवित्र किंवा अशुद्ध असे कधीच खाल्ले नाही’.
9 आकाशातून त्य वाणीने पुन्हा उत्तर दिले, ‘देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत. त्यांना अपवित्र म्हणू नकोस!’
10 असे तीन वेळा घडले. मग ते सर्व पुन्हा वर आकाशात घेतले गेले.
11 तेवढयात तीन माणसे मी ज्या घरामध्ये राहत होतो, तेथे आली. कैसरीया शहरातून या तीन माणसांना माझ्याकडे पाठविण्यात आले होते.
12 आत्म्याने मला कोणत्याही प्रकारचा संशय न धरिता त्यांच्याबरोबर जाण्यास सांगितले. हे सहा बंधु (विश्वासणारे) जे येथे आहेत, तेही माझ्याबरोबर होते. आम्ही कर्नेल्याच्या घरी गेलो.
13 कर्नेल्याने आपल्या घरात देवदूत उभा असलेला कसा दिसला हे आम्हास सांगितले. देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “काही माणसे यापोस पाठव. शिमोन पेत्राला बोलावून घे.
14 तो तुझ्याशी बोलेल. तो ज्या गोष्टी तुला सांगेल, त्यामुळे तुझे व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल.’
15 त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला.
16 तेव्हा मला प्रभूचे शब्द आठवले. प्रभु म्हणाला होता, ‘योहान लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करीत असे. पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल!’
17 आपण येशू रिव्रस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यासही देवाने सारखेच दान दिले. मग देवाचे काम मी कसा थांबवू शकत होतो?”
18 जेव्हा यहूदी विश्वासणाऱ्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा त्यांनी आपले म्हणणे थांबविले, त्यांनी देवाची स्तति केली आणि म्हणाले. “म्हणजे देव यहूदी नसलेल्यांना त्यांचे अंत;करण बदलण्यासाठी मोकळीक देत आहे आणि आम्हांला जसे जीवन प्राप्त झाले तसे त्यांनाही देऊ इच्छीत आहे.”
19 स्तेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला, त्यामुळे विश्वासणारे पांगले. यतील काही दूरच्या ठिकाणी, उदा. फेनीके, कुप्र व अंत्युखियापर्यंत गेले. विश्वासणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहूदी लोकांनाच सुवार्ता सांगितली.
20 यातील काही विश्वासणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते. जेव्हा हे लोक अंत्युखियात आले, तेव्हा ते ग्रीक लोकांशीही बोलले. त्यांनी या ग्रीक लोकांना येशूविषयीची सुवार्ता सांगितली.
21 प्रभु विश्वासणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभुला अनुसरु लागले.
22 याविषयीची बातमी यरुशलेम येथील विश्वासणाऱ्या मंडळीच्या कानावर आली. म्हणून यरुशलेम येथील विश्वासणाऱ्यांनी बर्णबाला अंत्युखियाला पाठविले.
23 बर्णबा चांगला मनुष्य होता. तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता. जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांना खूपच आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला. अंत्युखियातील सर्व विश्वासणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, “कधीही तुमचा विश्वास गमावू नका. नेहमी प्रभूची आज्ञा अंत:करणापासून पाळा.” पुष्कळ लोक खिस्ताचे अनुयायी झाले.
25 जेव्हा बर्णबा तार्सस शहरी गेला तेव्हा तो शौलाचा शोध घेत होता.
26 जेव्हा बर्णबाने त्याला शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले. शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे राहून पुष्कळ लोकांना शिकवले. अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा मिळाले.
27 याच काळात काही संदेष्टे यरुशलेमहून अंत्युखियास आले.
28 यांच्यापैकी एकाचे नाव अगाब होते. अत्युखियात तो उभा राहिला आणि बोलू लागला. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने तो म्हणाला, “फार वाईट काळ सर्व पृथ्वीवर येत आहे. लोकांना खायला अन्न मिळणार नाही.” (क्लौदिया राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्या काळात हे घडले.)
29 विश्वासणाऱ्यांनी ठरविले की, यहूदीया येथील आपल्या बंधु व भगिनींना जास्तीत जास्त मदत पाठविण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक विश्वासणाऱ्याने जास्तीत जास्त मदत पाठवण्याचे ठरविले.
30 त्यांनी पैसे गोळा करुन बर्णबा व शौल यांच्याकडे दिले. मग बर्णबा व शौल यांनी ते पैसे यहूदीयातील वडीलजनांकडे आणले.

Acts 11:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×