1
|
मग मी आणखी एक शक्तीशाली देवदूत स्वर्गातून येताना पाहिला. तो ढगांनी आच्छादलेला होता. त्याच्या डोक्यावरमेघधनुष्य होते. त्याचा चेहरा सूर्यासारखा होता, त्याचे पाय जणू काय अग्नीचे खांब होते. |
2
|
त्याने लहान गुंडाळी धरलीहोती, जी त्याच्या हातात उघडी होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रात ठेवला होता व डावा पाय जमिनीवर ठेवला होता. |
3
|
आणि त्याने सिंहाच्या गर्जनेसारखी मोठ्याने गर्जना कली. जेव्हा तो ओरडला, तेव्हा त्या सात मेघगर्जनांनी आपापले शब्दउच्चारले. |
4
|
जेव्हा त्या सात मेघगर्जना बोलल्या, त्यावेळी मी लिहिणार एवढ्यात मला आकाशातून वाणी आली, तीम्हणाली, “सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द बंद करुन ठेव. ते लिहू नको.” |
5
|
मग ज्या देवदूताला मी समुद्रात व जमिनीवर पाहिले होते त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे उचलला. |
6
|
जो अनंतकाळजगतो, ज्याने आकाश व त्यातील सर्व काही बनविले, पृथ्वी व तीवरील, त्याच्या नावाने शपथ वाहिली. आणि म्हणाला,“आता आणाखी विलंब होणार नाही! |
7
|
पण जेव्हा सातवा देवदूत कर्णा वाजविण्याच्या तयारीत असेल त्या दिवसात देवाचीगुप्त योजना पूर्ण होईल. त्याचे सेवक जे संदेष्टे (भविष्यवदी) त्यांना दिलेल्या वचनानुसार घडून येईल.” |
8
|
तेव्हा आकाशातून झालेली वाणी जी मी ऐकली होती ती पुन्हा मला बोलली, “जा, गुंडाळी घे, जी गुंडाळी समुद्र व जमीनयावर उभ्या असलेल्या देवदूताच्या हातात उघडी आहे ती घे.” |
9
|
म्हणून मी त्या देवदूताकडे गेलो व मला ती लहान गुंडाळी दे असे म्हणालो. तो मला म्हणला, “ही घे, आणि ही खा. तीखाल्ल्याने तुझे पोट कडू होईल. पण तुझ्या तोंडाला मात्र ते मधासारखे गोड लागेल.” |
10
|
मी ती लहान गुंडाळी देवदूताच्याहातून घेतली व खाऊन टाकली. माझ्या तोंडात मला ती मदासारखी गोड वाटली, पण जेव्हा ती मी खाल्ली, तेव्हा माझेपोट कडवट झाले. |
11
|
तेव्हा माल सांगण्यात आले, “तू पुन्हा पुष्कळ लोकांना, राष्ट्रांना, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना वराजांना संदेश सांगितले पाहिजेत.” |
Revelation 10:1 Oriya Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...