1
|
देवा, माझे प्रार्थना गीत ऐक. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. |
2
|
मी कुठेही असलो कितीही अशक्त असलो तरी मी तुला मदतीसाठी हाक मारीन. तू मला अगदी उंचावरच्या सुरक्षित जागी घेऊन जा. |
3
|
तूच माझी सुरक्षित जागा आहेस. माझ्या शत्रूपासून माझे रक्षण करणारा तू बळकट किल्ला आहेस. |
4
|
तुझ्या तंबूत मला कायमचे राहायला पाहिजे, जेथे तू माझे रक्षण करु शकशील अशा ठिकाणी मला लपण्याची इच्छा आहे. |
5
|
देवा, मी तुला काही देण्याचे वचन दिले होते ते तू ऐकले होतेस परंतु तुझ्या उपासकांजवळ जे काही आहे ते तुझेच आहे. |
6
|
राजाला भरपूर आयुष्य दे त्याला कायमचे राहू दे. |
7
|
त्याला देवाजवळ चिरकाल राहू दे. तुझ्या खऱ्या प्रेमाने तू त्याचे रक्षण कर. |
8
|
आणि मी तुझ्या नावाचा सदैव जयजयकार करीन. ज्या गोष्टी करण्याचे मी वचन दिले त्या मी रोज करीन. |
Psalms 61:1 Oriya Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...