English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Revelation Chapters

Revelation 18 Verses

1 यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला आकाशातून खाली येताना पाहिले. त्याच्याकडे मोठे अधिकार होते. आणि त्याच्यागौरवाने पृथ्वी झळाळत होती.
2 प्रचंड आवाजात तो ओरडला:“पडली! महान बाबेल पडली! ती दुष्ट आत्म्यांचे घर बनली आहे. आणि प्रत्येक दुष्ट आत्म्याचा आश्रय आणि प्रत्येक अशुद्ध,धिक्कारलेल्या पक्षांचा आश्रय झाली आहे.
3 कारण तिच्या व्याभिचाराचा द्राक्षारस जो वेड लावणारा आहे तो सर्व राष्ट्रांनी प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशीव्यभिचार केला आहे आणि पृथ्वीवरील व्यापारी तिच्या अति संपत्तीने व ऐषारामाने श्रीमंत झाले आहेत.”
4 मग मी दुसरा एक आवाज आकाशातून ऐकला. तो म्हणाला:“माइया लोकांनो, तिच्यातून बाहेर या यासाठी की तिच्या पापात तुमचा वाटा असू नये यासाठी की तुमच्यावर तिच्याकोणत्याही पीडा येऊ नयेत.
5 कारण तिची पापे स्वर्गाला भिडली आहेत. आणि देवाला तिच्या अपराधांची आठवण झाली आहे.
6 तिने ज्याप्रमाणे तुम्हाला दिले आहे, तसे तुम्ही तिचे परत करा. तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठीकरा तिने दुसऱ्यांना दिले त्याच्या दुप्पट प्रमाणात तेज मद्य तिच्या प्याल्यात भरा.
7 तिने स्वत:ला जसे गौरव आणि ऐषाराम दिला तितक्या प्रमाणात तुम्ही तिला छळ व दु:ख द्या. ती तिच्या अंत:करणातगर्वाने म्हणते, ‘मी राणीसाखी सिंहासनावर बसते, मी विधवा नाही.’ आणि मी केव्हाच शोक करणार नाही.
8 म्हणून एका दिवसात तिच्या पीडा तिच्यावर येतील. (त्या पीडा म्हणजे): मृत्यू, शोक आणि दुष्काळ ती आगीत भस्महोऊन जाईल कारण सामर्थ्यशाली प्रभु देव तिचा न्याय करील.”
9 पृथ्वीवरील ज्या राजांनी त्या स्त्रीशी व्यभिचार केला, आणि जे तिच्या विलासाच्या दिवसाचे भागीदार झाले, ते ती जळतअसताना निघणारा धूर पाहून रडतील आणि तिच्याबद्दल शोक करतील.
10 तिच्या शारीरिक पीडांच्या भीतीमुळे ते राजे दूरउभे राहतील, आणि ओरडतील:“भयंकर! भयंकर, हे महान नगरी बाबेल, सामर्थ्याच्या शहरा! एका तासात तुझा न्याय तुझ्यावर येईल!”
11 पृथ्वीचे व्यापारी तिच्यासाठी रडतील आणि शोक करतील, कारण आता त्यांचा माल कोणीही घेणार नाही.
12 तो मालअसा: सोने, चांदी, मौल्यावान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, किरमिजी, रेशमी व जांभळे कापड, निरनिराळ्याप्रकारचे सुगंधी लाकूड, सर्व प्रकारची हस्तीदंती पात्रे, मोलवान लाकडे, तांब्याची, लोखंडाची हस्तीदंती पात्रे, मोलवानलाकडे, तांब्याची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे.
13 दालचिनी, उटणे ऊद, धूप, द्राक्षारस व जैतुनाचे तेल, मैदाव गहू, गुरेढोर व मेंढरे, घोडे व रथ, दासदासी, मानवी जीव.
14 “बाबेल, ज्या उत्तम गोष्टींची तुला अपेक्षा होती, त्या गोष्टी आता तुइयापासून गेल्या आहेत तुझी सर्व श्रीमंती व वैभवनाहीसे झाले आहे. त्याची तुला परत कधी भरपाई होणार नाही.”
15 ज्या व्यापाऱ्यांनी असा माल विकला, आणि त्यांची संपत्ति तिच्यापासून मिळविली ते तिच्या पिडेच्या भितीमुळे दूर उभेराहतील, ते रडतील व शोक करतील.
16 आणि ओरडतील:“भयंकर! भयंकर, हे महानगरी, तलम तागाचे, किरमीजी व जांभळे पोशाख नेसून जी नगरी सजली होती सोने, मौल्यवानरत्ने व मोती यांनी ती झगमगत होती!
17 एका तासात अशा प्रकारची प्रचंड संपत्ति नष्ट झाली!”प्रत्येक तांडेल, जलप्रवासी तसेच खलाशी आणि समुद्रावर पोट भरणारे सर्व लोक त्या नगरीपासून दूर राहतील.
18 आणि ती जळत आसताना तिचा धूर ते पाहतील तेव्हा ते ओरडून म्हणतील, “या नगरीसारखी दुसरी एवढी महान नगरीझाली नाही.”
19 मग ते आपल्या डोक्यात धूळ घालतील आणि शोक करतील.“भयंकर! भयंकर! हे महान नगरी, ज्या सर्वांकडे समुद्रात जहाजे आहेत ते तिच्या संपत्तीमुळे श्रीमंत झाले एका तासात तिचासर्वनाश झाला.
20 हे स्वर्गा, तिच्याबद्दल आनंद कर! संतानो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो आनंद करा! तिने ज्या प्रकारे तुम्हाला नागविलेत्याबद्दल देवाने तिचा न्याय केला आहे.”
21 मग एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलून तो समुद्रात टाकून दिला. आणि म्हणाला:“अगदी अशीच महान बाबेल नगरी जोराने खाली फेकण्यात येईल आणि परत ती कधीही कोणाला सापडणार नाही.
22 वीणा वाजविणाऱ्यांचा, संगीत वाजविणाऱ्यांचा, बासरी वाजविणाऱ्यांचा आणि कर्णा वाजविणाऱ्यांचा आवाज परत कधीतुझ्या येथे ऐकू येणार नाही. कोणताही कारागिरीचा व्यापारी तुइयामध्ये आढळणार नाही तुझ्या येथे जात्याचा आवाज कधीऐकू येणार नाही.
23 दिव्याचा प्रकाश तुझ्यामध्ये पुन्हा कधी प्रकाशणार नाही तुइया येथे वधूवरांचा आवाज पुन्हा कधी ऐकू येणार नाही तुझेव्यापारी जगातील मोठी माणसे होती तुझ्या जादूटोण्यामुळे सर्व राष्ट्रे बहकली गेली
24 त्या नगरीमध्ये संदेष्ट्यांचे देवाच्या पवित्र लोकांचे आणि जगात ज्यांची हत्या करण्यात आली अशांचे रक्त सांडल्याचेदिसून आले.”
×

Alert

×