Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Books

Revelation Chapters

Revelation 11 Verses

1 मग मला मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येण्यासारखी काठी देण्यात आली. आणि मला सांगण्यात आले, “जा आणिदेवाचे मंदिर, वेदी व तेथील उपासकांचे मोजमाप कर.
2 पण बाहेरचे अंगण सोडून दे. त्याचे मोजमाप करु नको. कारण तेविदेशी लोकांना दिलेले आहे. ते बेचाळीस महिने पवित्र शहर तुडवितील.
3 आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना सामर्थ्य देईन.ते देवाचा संदेश 1,260 दिवस देतील. ते तागाची वस्त्रेघालतील.”
4 हे दोन साक्षीदार म्हणजे दोन जैतुनाची झाडेआहेत. आणि पृथ्वीच्या प्रभुसमोर असणाऱ्या दीपसमया आहेत.
5 जर एखाद्या व्यक्तीने त्या साक्षीदारांना दुखविण्याचा प्रयत्नकेला तर त्यांच्या तोंडातून अग्नि निघून त्यांच्या शत्रूंना भस्म करीत राहत असे. जो कोणी त्यांना इजा करण्याचा प्रयत्नकरीत असे त्याला अवश्य मरावे लागे.
6 या साक्षीदारांना ते संदेश देत असताना पाऊस पडला तर तो थांबविण्याचे सामर्थ्यआहे. त्या साक्षीदारांना पाण्याचे रक्त करण्याचे सामर्थ्य आहे. पृथ्वीवर प्रत्येक प्रकारचे संकट पाठविण्याचे सामर्थ्य आहे आणित्यांना पाहिजे तितके वेळा ते हे करु शकतात.
7 आणि जेव्हा दोन साक्षीदार त्यांचा संदेश देण्याचे संपवतील तेव्हा त्या अभांग दऱ्यातून येणारा प्राणी त्यांच्याशी लढाईकरील. प्राणी त्यांचा पराभव करील व, त्यांना मारुन टाकील.
8 त्या साक्षीदारांची शरीरे मोठ्या शहराच्या रस्त्यावर पडतील.त्या शहरांचे नाव सदोम आणि इजिप्त असे आहे. शहरांच्या या नावांना विशेष अर्थ आहे. या शहरातच आपल्या प्रभूलावधस्तंभावर मारण्यात आले.
9 साडेतीन दिवसांपर्यंत प्रत्येक वंशाचे. जमातीचे, भाषेचे आणि राष्ट्राचे लोक त्या साक्षीदारांच्याशरीरांकडे पाहतील. पण त्यांना पुरण्यास नकार देतील.
10 पृथ्वीवर राहणारे लोक त्या दोन साक्षीदारांच्या मृत्यूने आनंदपावतील ते मेजवान्या आयोजित करतील व एकमेकांना भेटी पाठवतील. ते असे करतील कारण या दोन साक्षीदारांनी पृथ्वीवरराणाऱ्या लोकांना अतोनात क्लेश दिले होते.
11 पण सोडेतीन दिवसांनंतर देवाकडील जीवनाच्या श्वासाने त्या साक्षीदारांमध्ये प्रवेश केला. आणि ते त्यांच्या पायांवर उभेराहिले. ज्या सर्व लोकांनी त्यांना पाहिले ते सर्व घाबरुन गेले.
12 मग त्या दोन साक्षीदारांनी स्वर्गातून मोठा आवाज ऐकला. तो म्हणाला, “इकडे वर या!” मग ते दोन साक्षीदार ढगातूनस्वर्गात गेले. त्यांच्या शत्रूंनी त्यांना वर जाताना पाहिले.
13 त्याच वेळेला मोठा भूकंप झाला. एक दंशाश शहर नष्ट झाले व भूकंपात सात हजार लोक मारले गेले. जे लोक मेलेनाहीत ते खूप घाबरले होते. त्यांनी स्वर्गातील देवाला गौरव दिले.
14 दुसरे मोठे संकट संपले. तिसरे मोठे संकट लवकरच येत आहे.
15 सातव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाले. ते आवाज म्हणाले:“जगाचे राज्य आता आमच्या प्रभुचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. आणि तो अनंतकाळपर्यंत राज्य करील.”
16 मग जे चोवीस वडील सिंहासनावर बसले होते, ते आपल्या चेहऱ्यावर पडले त्यांनी आणि देवाची भक्ति केली. हे वडीलदेवासमोर त्यांच्या सिंहासनावर बसले.
17 ते म्हणाले:“आम्ही तुझे आभार मानतो. सर्वसमर्थ प्रभु देवा, तूच एक आहेस की जो तू आहेस व होतास. आम्ही तुझे उपकार मानतोकारण तुझे महान सामर्थ्य वापरुन सत्ता चालविण्यास सुरुवात केलीस
18 जगातील लोक रागावले पण आता तुझा राग आला आहे, आता मेलेल्या माणसांचा न्याय करण्याची वेळ आली आहे.तुझे सेवक, संदेष्टे यांना बक्षीस देण्याची वेळ आली आहे. आणि तुझ्या पवित्र लोकांना बक्षिस देण्याची वेळ आली आहे. जेलहानमोठे लोक तुझा आदर करतात, त्यांना बक्षिस देण्याची वेळ आली आहे. जे पृथ्वीचा नाश करतात, त्यांचा नाशकरण्याची वेळ आली आहे!”
19 मग देवाने स्वर्गातील मंदिर उघडले. तेव्हा तेथे कराराचा कोश दिसला आणि विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट,भूकंप व गारांचे वादळ झाले.
×

Alert

×