तो म्हणाला, “इस्राएल लोकांची मोजणी करा, 20 वर्षाचे आणि 20 वर्षावरील सगव्व्या पुरुषांची मोजणी करा आणि त्यांची वंशाप्रमाणे यादी करा. तेच पुरुष इस्राएलच्या सैन्यात काम करू शकतील.”
त्या वेळी लोकांनी मवाबमधील यार्देन नदीच्या खोऱ्यात तळ दिला होता. तो यरीहोंच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होता. तेव्हा मोशे आणि याजक एलाजार लोकांशी बोलले, ते म्हणाले,
अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहोरानाच्या विरुद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहला पाठींबा दिला.
(19-20) यहुदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशी:शेलाचे शेलानी कूळ, पेरेसाचे पेरेसी कूळ, जेरहाचे जेरही कूळ. (यहुदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.)
पण तू कुठल्या कुळाला कुठली जमीन द्यायची ते ठरवण्यासाठी चिठ्ठ्याफासे टाक. प्रत्येक कुळाला त्याच्या जमिनीचा भाग मिळेल आणि त्या जमिनीला त्या कुळाचे नाव दिले जाईल.
अम्रामच्या बायकोचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.
लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या 23000 होती. परंतु यांची गणती इस्राएलच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांना जमीन दिली त्यात यांना हिस्सा मिळाला नाही.
खूप वर्षापूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मेले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते.
कारण इस्राएल लोकांना तुम्ही वाळवंटात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. ते होते यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनचा मुलगा यहोशवा.