Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Jeremiah Chapters

Jeremiah 4 Verses

Bible Versions

Books

Jeremiah Chapters

Jeremiah 4 Verses

1 हा परमेश्वराचा संदेश आहे “इस्राएल तुला परत यायचे असेल तर माझ्याकडे परत ये. तुझ्या मूर्ती फेकून दे. माझ्यापासून दूर जाऊन भटकू नकोस.
2 तू ह्या गोष्टी केल्यास, तर तू शपथ घेण्यासाठी माझे नाव वापरु शकशील. ‘परमेश्वर असे तो पर्यंत,’ असे तू म्हणू शकशील. तू हे शब्द खऱ्या, प्रमाणिक आणि योग्य, तऱ्हेने वापरु शकशील. तू ह्या गोष्टी केल्यास परमेश्वर राष्ट्रांना आशीर्वाद देईल. ती राष्ट्रे परमेश्वराने केलेल्या कृत्यांबद्दल बढाया मारतील.”
3 परमेश्वर यहूदा व यरुशलेम मधील लोकांना म्हणतो:“तुमची शेते नांगरलेली नाहीत. तो शेते नांगरा. काट्यात बी पेरु नका.
4 परमेश्वराची माणसे व्हा. तुमची ह्रदये बदलायहुदातील आणि यरुशलेममधील लोकांनो तुम्ही बदलला नाहीत, तर मी खूप रागावेन. माझा राग आगीप्रमाणे वेगाने पसरुन तुम्हाला जाळून टाकील. असे का घडेल? तुम्ही केलेल्या दुष्कृंत्यांमुळे असे घडेल.”
5 “यहूदाच्या लोकांना हा संदेश द्या. यरुशलेममधील प्रत्येकाला सांगा:‘सर्व देशभर रणशिंगे फुंका, मोठ्याने ओरडून सांगा, “एकत्र या. सुरक्षिततेसाठी आपण सर्व मजबूत शहराकडे जाऊ या.’
6 खुणेचे ध्वज सियोनच्या दिशेने दाखवा. जीव वाचविण्यासाठी पळा. वाट पाहू नका. कारण मी उत्तरेकडून अरिष्ट आणीत आहे. मी भयानक विध्वंस घडवून आणीत आहे.”
7 “सिंह त्याच्या गुहेतून बाहेर आला आहे. राष्ट्रांचा नाश करणाऱ्याने कूच करायला सुरवात केली आहे. तुमच्या देशाचा नाश करण्यासाठी त्याने त्याचे घर सोडले आहे. तुमच्या शहरांचा नाश होईल. तेथे कोणीही शिल्लक राहणार नाही.
8 म्हणून शोकवस्त्रे घाला आणि मोठ्याने आक्रोश करा. का? कारण परमेश्वर आमच्यावर रागावला आहे.”
9 परमेश्वर म्हणतो, “हे घडत असताना, राजा आणि त्याचे अधिकारी यांचा धीर सुटेल, याजक घाबरतील, संदेष्ट्यांना धक्का बसेल.”
10 नंतर, मी, यिर्मया, म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू तू यहुदातील आणि यरुशलेममधील लोकांना खरोखरच युक्तीने फसविलेस. ‘तू त्यांना म्हणालास की तुम्हाला शांती मिळेल.’ पण आता, तू तलवारीचे पातेच त्यांच्या नरड्याला लावीत आहेस.”
11 त्या वेळेला यहुदा व यरुशलेम येथील लोकांना एक संदेश दिला जाईल. “उजाड टेकड्यावरुन गरम वारा वाहतो. तो वाळवंटातून माझ्या लोकांकडे वाहत येतो. फोलकटापासून धान्य वेगळे करण्याकरिता शेतकरी ज्या वाऱ्याचा उपयोग करतात, तसा हा सौम्य वारा नाही.”
12 हा वारा त्यापेक्षा जोराचा आहे आणि तो माझ्याकडून येतो आता, “मी यहुदाच्या लोकांविरुद्ध माझा निकाल जाहीर करीन.”
13 पाहा! शत्रू ढगाप्रमाणे वर येतो. त्याचे रथ वावटळीप्रमाणे दिसतात, त्यांचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. हे सर्व आपल्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. आपला विध्वंस झाला!
14 यरुशलेममधील लोकांनो, तुमच्या मनातील पाप धुवून टाका. तुमची मने शुद्ध करा. मग तुम्ही वाचविले जाऊ शकता. दुष्ट बेत करीत बसू नका.
15 ऐका! दान प्रांतातून दूताचा आवाज येत आहे. एफ्राईम ह्या टेकड्यांच्या देशातून हा माणूस वाईट बातमी आणीत आहे.
16 “ही बातमी ह्या देशाला कथन करा. यरुशलेमच्या लोकांत ही बातमी पसरवा दुरवरच्या देशांतून शत्रू येत आहेत. यहुदाच्या विरुद्ध ते युद्धाची घोषण करीत आहेत.
17 शेताचे रक्षण करण्यासाठी लोक शेताभोवती कडे करतात तसा शत्रूने यरुशलेमला वेढा घातला आहे. यहूदा, तू माझ्याविरुद्ध गेलीस म्हणून शत्रू तुझ्याविरुद्ध चढाई करण्यास येत आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
18 “तू ज्या तऱ्हेने राहिलीस आणि जी कर्मे केलीस. त्यामुळे हे संकट तुझ्यावर आले. तुझ्या पापाने तुझे जीवन कठीण केले. तुझ्या पापी जीवनामुळे, तुझ्या अंत:करणाला खोल जखमा होऊन वेदना झाल्या.”
19 अरे रे! दु:खाने आणि काळजीने माझ्या पोटात खड्ढा पडत आहे. मी वेदनेने वाकत आहे. मी खरच खूप घाबरलो आहे. माझ्या ह्रदया धडधडत आहे. मी गप्प बसू शकत नाही का? मी रणशिंग फुंकलेले ऐकले आहे. रणशिंग सैनिकांना युद्धासाठी बोलावीत आहे.
20 अरिष्टामागून अरिष्ट येते. संपूर्ण देशाचा नाश झाला. अचानक माझ्या तंबूचा नाश झाला. कनाती फाडल्या गेल्या.
21 परमेश्वरा, युद्धाची निशाणी मला किती काळ पाहिली पाहिजे? किती वेळ मी रणशिंग ऐकले पाहिजे?
22 देव म्हणतो, “माझे लोक मूर्ख आहेत. ते मला ओळखत नाहीत. ती मूर्ख मुले आहेत त्यांना समजत नाही. दुष्कृत्ये करण्यात ते पटाईत आहेत पण सत्कृत्ये कशी करावी त्यांना माहीत नाही.”
23 मी पृथ्वीकडे पाहिले. पृथ्वी उजाड आणि अस्ताव्यस्त होती. पृथ्वीवर काहीही नव्हते. मी आकाशाकडे पाहिले त्याचा प्रकाश गेला होता.
24 मी डोंगराकडे पाहिले ते कापत होते. सर्व टेकड्या थरथरत होत्या.
25 मी पाहिले पण कोठेही माणसे नव्हती. आकाशातील सर्व पक्षी दूर उडून गेले होते.
26 मी पाहिले आणि सुपीक जमिनीचे वाळवंट झाले. त्या भूमीवरील सर्व शहरांचा नाश झाला. परमेश्वराने हे घडविले. परमेश्वराने आणि त्याच्या क्रोधाने हे घडवून आणले.
27 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “संपूर्ण देशाचा नाश होईल. (पण मी देशाचा संपूर्ण नाश करणार नाही.)
28 म्हणून देशातील लोक मृतांसाठी शोक करतील. आकाश काळे होईल. मी बोललो आहे ते बदलणार नाही. मी निर्णय घेतला आहे आणि मी बदलणार नाही.”
29 यहुदातील लोक घोडेस्वारांचा व धनुर्धरांचा आवाज ऐकतील आणि ते पळून जातील. काही लोक गुहांतून लपतील काही झुडुपांत लपतील. काही डोंगरकड्यावर चढतील. यहुदातील सर्व शहरे ओस पडतील. तेथे कोणीही राहणार नाही.
30 यहूदा, तुझा नाश होत आला आहे. मग आता तू काय करीत आहेस? तुझा उत्तम लाल पोशाख तू का घालीत आहेस? तुझे सोन्याचे दागिने तू का घालीत आहेस? तू डोळ्यांचा साजशृंगार का करीत आहेस? तू स्वत:ला सुंदर बनवितेस पण हे वेळेचा अपव्यय करणे आहे. तुझे प्रियकर तुझा तिरस्कार करतात. ते तुला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.
31 स्त्री प्रसूतिवेदना होताना ओरडते, तसा आवाज मी ऐकतो. पहिल्या बाळंतपणाच्या वेळेला स्त्री ज्याप्रमाणे किंकाळी फोडते, तशीच ती किंकाळी आहे. हा सियोनकन्येचा आवाज आहे. ती प्रार्थनेसाठी हात जोडत आहे. ती म्हणत आहे, “हे देवा, मी चक्कर येऊन पडण्याच्या बेतात आहे. खुन्यांनी मला घेरले आहे!”

Jeremiah 4:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×