Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Hebrews Chapters

Hebrews 3 Verses

Bible Versions

Books

Hebrews Chapters

Hebrews 3 Verses

1 म्हणून पवित्र बंधूनो, ज्यांना देवाने बोलाविलेले आहे, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित (प्रतिनिधी) आणि आमच्या विश्वासाचा मुख्य याजक आहे.
2 ज्या देवाने त्याला प्रेषित व मुख्य याजक म्हणून नेमले त्याच्याशी येशू विश्वासू होता, जसा देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे देवाशी विश्वासू होता.
3 ज्याप्रमाणे घरापेक्षा घर बांधणाराला अधिक मान असतो, त्याप्रमाणे येशू हा मोशेपेक्षा अधिक सन्मानास पात्र गणला गेला.
4 कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो, पण देवाने सर्व काही बांधलेले आहे.
5 देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे हा सेवक म्हणून अधिक विश्वासू होता, देव च्या गोष्टी पुढील काळात सांगणार होता, त्याविषयी त्याने लोकांना साक्ष दिली.
6 परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत.
7 म्हणून, पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे,“आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
8 तर आपली अंत:करणे कठीण करू नका. ज्याप्रमाणे तुम्ही अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली,
9 जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले, तेथे त्यांनी चाळीस वर्षे सामर्थ्यशाली कामे पाहिली.
10 त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि म्हणालो, ‘या लोकांच्या मनात नेहमी चुकीचे विचार येतात, या लोकांना माझे मार्ग कधीही समजले नाहीत’
11 म्हणून रागाच्या भरात मी शप वाहून म्हणालो, ‘हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.’”स्तोत्र. 95:7- 11
12 सावध असा, बंधूंनो, तुमच्यापैकी कोणाचीही अंत:करणे दुष्ट व अविश्वासू असू नयेत, ती जिवंत देवापासून दूर नेतात.
13 उलट, ‘आज’ म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंत:करणे कठीण होऊ नयेत.
14 कारण आपण सर्व जण ख्रिस्तामध्ये त्याच्यावरील विश्वासाचे वाटेकरी आहोत. जर आम्ही सुरुवातीला धरलेला आमचा विश्वास शेवटपर्यंत दृढ धरून राहिलो, तर
15 पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे:“आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तेव्हा तुम्ही देवाविरुद्ध बंड केलेत; तशी आपली अंत:करणे कठीण करू नका.”स्तोत्र. 95:7-8
16 ज्यांनी देवाची वाणी ऐकली पण त्याच्याविरुद्ध बंड केले असे कोण होते? तेच लोक नव्हते का, ज्यांना मोशेने इजिप्त देशातून बाहेर नेले होते?
17 आणि तो (देव) कोणावर चाळीस वर्षे रागावला होता? ते सर्व तेच नव्हते काय, ज्यांनी पाप केले आणि ज्यांची प्रेते अरण्यात पडली होती.
18 कोणाविषयी देवाने अशी शपथ वाहिली की ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत? ज्यांनी त्याच्या आज्ञा मोडल्या तेच नव्हते काय?
19 म्हणून आपण पाहतो की, ते लोक देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी त्यांच्या अविश्वासामुळे येऊ शकले नाहीत.

Hebrews 3:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×