1
|
सारा एकशें सत्तावीस वर्षे जगली; |
2
|
ती कनान देशातील किर्याथ - आरबा (म्हणजे होब्रोन) येथे मरण पावली; तेव्हा अब्राहाम फार दु:खी झाला व त्याने तिच्यासाठी रडून खूप शोक केला. |
3
|
मग अब्राहाम आपल्या मृत बायको जवळून उठला व तो हेथी लोकांस भेटण्यास गेला. तो म्हणाला, |
4
|
“मी या देशाचा रहिवासी नाही, तर परदेशी आहे; म्हणून माझ्या बायकोला पुरण्यासाठी मला जागा नाही; तेव्हा मला जागेची गरज आहे, ती मला द्या.” |
5
|
ते हेथी लोक अब्राहामाला म्हणाले, |
6
|
“स्वामी, परमेश्वराच्या महान नेत्यांपैकी आपण एक आम्हामध्ये आहा; आम्हाकडे असलेल्या जागांपैकी चांगल्यातली चांगली जागा आपल्या मयतासाठी आपण घेऊ शकता; आमच्या कफनाच्या जागांपैकी तुम्हाला हवी ती जागा तुम्ही घेऊ शकता. अशा ठिकाणी आपल्या पत्नीला पुरण्यास आम्ही कोणीही मना करणार नाही.” |
7
|
अब्राहाम उठला व अदबीने त्या लोकांना नमन करुन म्हणाला, |
8
|
“तुम्हाला जर माझ्या मयत बायकोला पुरण्यासाठी खरोखर मला मदत करावी असे वाटत असेल तर मग माझ्यातर्फे सोहराचा मुलगा एफ्रर्न याच्याकडे शब्द टाका; |
9
|
त्याच्या मालकीच्या शेताच्या एका टोकाला असलेली मकपेला येथील गुहा विकत घेणे मला आवडेल; मी तिची पुरेपूर किंमत त्याला देतो, व ती माझ्या मालकीची स्मशानभुमि म्हणून विकत घेतो; त्या बद्दल तुम्ही सर्वजण साक्षी असावे.” |
10
|
त्या वेळी तेथे एफ्रोन हित्ती हा हेथी लोकान बसलेला होता; तो त्या सर्वांच्या देखत अब्राहामाला म्हणाला, |
11
|
“नाही, नाही! माझे स्वामी, मी पैसे घेणार नाही; येथे माझ्या लोकांसमक्ष ते शेत व ती गुहा मी तुम्हाला देतो; तुम्ही तुमच्या बायकोला तेथे पुरा.” |
12
|
मग अब्राहामाने हेथी लोकांस नमन केले; |
13
|
अब्राहाम सर्व लोकांसमक्ष एफ्रोनास म्हणाला, “परंतु मला त्या शेताची पूर्ण किंमत तुला देऊन ते विकत घ्यायचे आहे; त्याचे पैसे माझ्याकडून घे आणि मग मी आपल्या मयतास तेथे मूठमाती देईन.” |
14
|
एफ्रोनाने अब्राहामास उत्तर दिले, |
15
|
“माझे स्वामी, माझे जरा ऐका; जमिनीची किंमत 10 पौंडचांदी आहे ही किंमत तुम्हाला व मला म्हणजे काय मोठे? तेव्हा त्यापेक्षा सरळ माझे शेत ताब्यात घ्या व तेथे तुमच्या बायकोला मूठमाती द्या.” |
16
|
अब्राहामाने ही किंमतच असल्याचे समजून घेतले व त्याने एफ्रोनला त्यांच्या पद्धतीप्रमाणे चांदीची दहा नाणी (म्हणजे चारशे शेकेल भार रुप्याची नाणी) तोलून दिली. |
17
|
या प्रमाणे मम्रेच्या पूर्वेला असलेले मकपेला येथील शेत, गुहा व त्यातील सर्व झाडी यांवरील एफ्रोनाचा मालकी हक्क बदलून तो अब्राहामाला मिळाला; |
18
|
एफ्रोन व अब्राहाम यांच्यामध्ये ही मालकी हक्काची अदलाबदल नगरातील सर्व लोकांसमक्ष झाली; |
19
|
त्यानंतर मम्रे (म्हणजे कनान देशातील हेब्रोन) जवळील त्या शेतातील गुहेत अब्राहामाने आपली बायको सारा हिला पुरले. याप्रमाणे ते शेत, गुहा इत्यादि हित्तीकडून विकत घेतल्यामुळे ती |
20
|
अब्राहामाची मालमत्ता झाली आणि त्याने त्या जागेचा आपल्या मयतासाठी स्मशानभूमि म्हणून उपयोग केला. |
Genesis 23:3 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...