Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Exodus Chapters

Exodus 36 Verses

Bible Versions

Books

Exodus Chapters

Exodus 36 Verses

1 “तेव्हा बसालेल व अहलियाब यांनी आणि परमेशवराने ज्या इतर कारागिरांना ह्या कामाच्या कसबाचे ज्ञान व समज दिली आहे त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे पवित्र मंडपाचे हे बांधकाम करावे.”
2 नंतर बसालेल व अहिलियाब यांना आणि ज्या कारागिरांना परमेश्वराने विशेष कसब व ज्ञान दिले होते त्यांना मोशेने बोलावले, ह्या कामात मदत व सेवा करण्याची त्या लोकांची इच्छा होती म्हणून तेही खुषीने आले.
3 इस्राएल लोकांची जी जी अर्पणे आणली होती त्यांचा देवाचे पवित्रस्थान बांधण्यासाठी त्यांनी उपयोग केला. रोज सकाळी इस्राएल लोकांनी अर्पणे आणणे चालूच ठेवले.
4 शेवटी मग सर्व कसबी कारागीर पवित्रस्थानाचे करीत असलेले आपले काम सोडून मोशेकडे आले व म्हणाले,
5 “लोकांनी खूप अर्पणे आणली आहेत! आम्हाला ह्या पवित्रस्थानाचे बांधकाम पूर्ण करवयास लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक आमच्यापाशी आले आहे!”
6 तेव्हा मोशेने सर्व छावणीभर असा हुकूम सोडला की, “कोणाही स्त्रीने किंवा पुरुषाने आता पवित्रस्थानाच्या सेवेसाठी अधिक अर्पणे आणू नयेत.” तेव्हा अशा रीतीने आणखी अर्पणे आणावयास बंदी घालण्यात आली.
7 लोकांनी हे काम पूर्ण करण्याकरता लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक साहित्य अर्पण केले होते!
8 मग त्या कसबी कारागिरांनी पवित्र निवास मंडप बांधण्याचे काम सुरु केले; त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचे दहा पडदे तयार केले व त्यांच्यावर त्यांनी, पसरलेल्या पंखाच्या, करुब दूतांची चित्रे शिवली.
9 प्रत्येक पडद्याचे मोजमाप सारखेच होते म्हणजे तो चौदावार-गज-लांब व दोन वार-गज-रुंद असे होते.
10 त्या कारागिरांनी त्यापैकी पांच पडदे जोडून एक भाग व दुसरे पांच पडदे जोडून दुसरा भाग असे दोन भाग तयार केले.
11 नंतर त्यांनी त्या दोन्हीही भागांच्या शेवटच्या किनारीवर निव्व्या सुताची बिरडी केली; तसेच दुसऱ्या पडद्याच्या किनारीवर ही तशीच बिरडी केली.
12 त्यानी एका पडद्याखाली किनारीवर पन्नास बिरडी व दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही पन्नास बिरडी केली; ती बिरडी समोरासमोर होती.
13 नंतर ते दोन पडदे एकत्र जोडण्यासाठी त्यांनी सोन्याच्या पन्नास गोल कड्या केल्या; त्या कड्यांनी ते पडदे एकत्र जोडल्यावर त्या सर्वाचा मिळून अखंड पवित्र निवास मंडप तयार झाला.
14 नंतर पवित्र निवास मंडप झाकण्यासाठी त्या कारागिरांनी बकऱ्याच्या केसांच्या अकरा पडद्यांचा एक तंबू बनविला.
15 ह्या सर्व पडद्यांचे मोजमाप सारखेच होते म्हणजे पंधरा वार लांब व दोन वार रुंद होते.
16 त्या कारागिरांनी त्यापैकी पाच पडदे जोडून एक भाग व दुसरे सहा पडदे जोडून दुसरा भाग तयार केला.
17 नंतर त्यांनी एका कनातीच्या बाहेरील शेकटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी व तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी केली.
18 हे दोन पडदे जोडून एक तंबू करण्यासाठी त्यांनी पितळेच्या पन्नास गोल कड्या केल्या.
19 मग त्यांनी पवित्र निवास मंडप झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या. मेंढ्याच्या कातड्याचे व दुसरे तहाशाच्या कमावलेल्या कातड्याचे अशी दोन आच्छादने केली.
20 मग पवित्र निवास मंडपाला आधार देण्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या फव्व्या तयार केल्या.
21 प्रत्येक फळी पंधरा फूट लांब व सत्तावीस इंच रुंद होती.
22 त्यांनी प्रत्येक फळीच्या दोन बाजूला दोन कुसे केली व उभ्या आडव्या तुकड्यांनी त्या दोन फव्व्या एकासारख्याच केल्या.
23 त्यांनी पवित्र निवास मंडपाच्या दक्षिण बाजूस लावण्यासाठी वीस फव्व्या केल्या;
24 मग त्या वीस फळयांच्या खाली लावण्यासाठी त्यांनी चांदीच्या चाळीस खुर्च्या केल्या, एका फळी खाली दोन म्हणजे प्रत्येक कुसाखाली एक याप्रमाणे त्या केल्या.
25 त्याचप्रमाणे पवित्र निवास मंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूस लावण्यासाठी त्यांनी वीस फळया केल्या.
26 त्यांनी त्या वीस फव्व्यासाठी एकेका फळीखाली दोन या प्रमाणे चांदीच्या चाळीस खुर्च्या केल्या.
27 पवित्र निवास मंडपाच्या मागील बाजूस म्हणजे पश्चिम बाजूस लावण्यासाठी सहा फव्व्या.
28 आणि त्याचप्रमाणे निवास मंडपाच्या कोपऱ्यासाठी दोन फव्व्या त्यांनी केल्या.
29 ह्या फव्व्या खालच्या बाजूला जोडलेल्या होत्या आणि वरच्या भागी एकत्र गोल कडीला त्या अडकवल्या होत्या; दोन्ही कोपऱ्यासाठी त्यांनी अशाच फव्व्या केल्या.
30 तेव्हा पवित्र निवास मंडपाच्या पश्चिमबाजूस एकूण आठ फव्व्या व प्रत्येक फळी खाली चांदीच्या दोन खुर्च्या अशा सोळा खुर्च्या झाल्या.
31 त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले-पवित्र निवास मंडपाच्या एका बाजूच्या फव्व्यासाठी पाच,
32 दुसऱ्या बाजूच्या फव्व्यासाठी पाच आणि पश्चिमेच्या म्हणजे मागल्या बाजूसाठी पांच;
33 आणि त्यांनी फव्व्याच्या भध्याभागी लावावयाचा अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोंचेल असा केला.
34 त्या फव्व्या त्यांनी सोन्याने मढविल्या, अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनविल्या आणि अडसरही सोन्याने मढविले.
35 मग त्यांनी निव्व्या जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनविला व त्यावर करूब दुतांची चित्रे शिवून घेतली,
36 आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व ते सोन्याने मढविले;
37 मग त्यांनी पवित्र निवास मंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा नक्षीदार पडदा बनविला.
38 व त्या पडद्यासाठी त्यांनी पाच खांब व त्यांच्या आकड्या बनविल्या; त्यांचा वरचा भाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या; आणि खांबासाठी पितळेच्या पाच खुर्च्या बनविल्या.

Exodus 36:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×