या गोष्टी घडल्यानंतर देवाने अब्राहामाच्या विश्वासाची कसोटी घेण्याचे ठरवले. देवाने अब्राहामाला हाक मारली, “अब्राहाम”, आणि अब्राहाम म्हणाला, “मी येथे आहे”
तेव्हा अब्राहाम पहाटेस उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले; इसहाकाला व दोन सेवकांना आपल्या बरोबर घेतले तसेच होमार्पणाकरिता लाकडे घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी गेले.
मग अब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवा जवळ थांबा; मी माझ्या मुलाला घेऊन त्या समोरच्या जागी जातो, व देवाची उपासना करुन आम्ही माघारी येतो.”
अब्राहामाने लाकडे घेऊन मुल्याच्या खांद्यावर ठेवली; एक खास सुरा (बळी देण्याकरिता) आणि विस्तव घेतला. मग तो व त्याचा मुलगा असे दोघे जण देवाची उपासना करण्यासाठी होमार्पणाच्या जागेकडे संगती निघाले.
इसहाकाने आपल्या बापास हाक मारली, “बाबा!” अब्राहामाने उत्तर दिले, “काय माझ्या प्रिय मुला?” इसहाक म्हणाला, “मला लाकडे व विस्तव दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोंकरु? ते कोठे आहे?”
व देवाने सांगिलेल्या ठिकाणी ते जाऊन पोहोंचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली; नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधून वेदीवरील लाकडावर ठेवले;
परंतु तेवढ्यात, त्याच क्षणाला परमेश्वराच्या दूताने त्याला थांबवले; तो स्वर्गातून ओरडून त्याला म्हणाला, “अब्राहामा! अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”
देवदूत म्हणाला, “तू आपल्या मुलाला मारु नकोस, किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा करु नकोस; कारण आता मला खात्रीने समजले की तू देवाला घाबरतोस आणि त्याचा आदर करतोस; कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका लाडक्या पुत्रालाही, अर्पण करावयास मागेपुढे न पाहता तयार झालास.”
आणि मग अब्राहामाने वर दृष्टि करुन सभोंवार पाहिले तेव्हा त्याला एका झुडपात शिंगे अडकलेला एक एडका दिसला; मग त्याने जाऊन तो घेतला व परमेश्वराला होमार्पणासाठी त्याचा बळी दिला. अशा रीतीने अब्राहामाचा मुलगा इसहाक वांचला.
तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो की तू माझ्यासाठी तुझ्या एकुलत्या एका लाडक्या मुलाचा बळी द्यावयांस मागे पुढे न पाहता तयार झालास म्हणून मी परमेश्वर स्वत:ची शपथ घेऊन तुला वचन देती की
मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझी वाढ करीन; मी तुला असंख्य वंशज देईन; तुझी संतती आकाशातील ताऱ्याइतकी, समुद्रकिनाऱ्यावरील वाळू इतकी होईल असे मी करीन; आणि तुझी संतनी आपल्या सर्व शत्रुंचा पराभव करुन त्यांना जिंकेल.
मग अब्राहाम आपल्या सेवकाकडे मागे आला आणि अब्राहाम, इसहाक व त्याचे सेवक असे सर्व मिळून प्रवास करीत मागे बैरशेबाला गेले; आणि अब्राहामाने बैर - शेबा येथे वस्ती केली.