1
|
इस्राएलने मिसर देश सोडला. याकोबाने (इस्राएल) तो परका देश सोडला. |
2
|
यहुदा त्याचे निवडक राष्ट्र बनले इस्राएल त्याचे राज्य झाले. |
3
|
लाल समुद्राने हे पाहिले आणि तो पळून गेला. यार्देन नदी वळली आणि पळाली. |
4
|
पर्वत मेंढ्यांसारखा नाचला. टेकड्या कोकरासारख्या नाचल्या. |
5
|
लाल समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देन नदी तू का वळलीस आणि का पळून गेलीस? |
6
|
पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांसारखे का नाचलात? आणि टेकड्यांनो तुम्ही कोकरासारखे का नाचलात? |
7
|
पृथ्वी प्रभुसमोर, याकोबाच्या देवासमोर थर थर कापली. |
8
|
देवानेच खडकातून पाणी वहायला लावले. देवानेच कठीण खडकातून झरे वाहायला लावले. |
Psalms 114:1 English Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...