1
|
ही लमुएल राजाची नीतिसूत्रे आहेत त्याच्या आईने त्याला या गोष्टी शिकवल्या. |
2
|
तू माझा मुलगा आहेस. मी प्रेम करत असलेला मुलगा. ज्यासाठी मी प्रार्थना केली होती तोच मुलगा तू आहेस. |
3
|
तुझी शक्ती स्त्रियांवर खर्च करु नकोस. स्त्रियामुळेच राजांचा नाश होतो त्यांच्यापायी स्वत:चा नाश करु नकोस. |
4
|
लमुएला, द्राक्षारस पिणे हे राजांच्या दृष्टीने शहाणपणाचे नसते. मद्याची इच्छा धरणे हे राज्यकर्त्यांच्या दृष्टीने शहाणपणाचे नसते. |
5
|
ते कदाचित् खूप पितील आणि कायदा काय म्हणतो ते विसरुन जातील. नंतर ते गरीबांचे सर्व हक्क काढून घेतील. |
6
|
गरीब लोकांना मद्य द्या. जे लोक संकटात आहेत त्यांना द्राक्षारस द्या. |
7
|
ते नंतर पितील आणि ते गरीब आहेत हे विसरुन जातील. ते पितील आणि त्यांची सर्व संकटे विसरतील. |
8
|
जर एखादा माणूस स्वत:ला मदत करु शकत नसेल तर तुम्ही त्याला मदत करा. जे लोक संकटात आहेत त्या सर्वांना तुम्ही मदत केली पाहिजे. |
9
|
ज्या गोष्टी योग्य आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्या गोष्टीसाठी लढा आणि सर्वांना योग्य रीतीने न्याय द्या. गरीबांच्या आणि ज्या लोकांना तुमची गरज आहे अशा लोकांच्या न्यायाचे रक्षण करा. |
10
|
सर्वगुणसंपन्न स्त्री शोधणे खूप कठीण आहे. पण तिचे मोल जड-जवाहिऱ्यापेक्षा अधिक आहे. |
11
|
तिचा नवरा तिच्यावर अवलंबून असतो. तो कधीही गरीब होणार नाही. |
12
|
ती तिच्या आयुष्यभर नवऱ्याचे कल्याण करते. ती त्याच्यावर कधीही संकटे आणीत नाही. |
13
|
ती नेहमी लोकर आणि कापड तयार करण्यात मग्न असते. |
14
|
ती दूरच्या प्रदेशातील मेंढीसारखी असते. ती सर्व ठिकाणाहून घरी अन्न आणते. |
15
|
ती भल्या पहाटे उठते तिच्या कुटुंबासाठी अन्न शिजवते आणि नोकर मुलींना काय करायचे ते सांगते. |
16
|
ती जमिनी बघते आणि विकत घेते. तिने साठवलेल्या पैशांचा उपयोग करुन ती द्राक्षाचे मळे लावते. |
17
|
ती खूप काम करते. ती खूप शक्तिवान आहे. आणि सर्व काम करण्यात तरबेज आहे. |
18
|
तिने केलेल्या गोष्टी जेव्हा ती विकते तेव्हा तिला नेहमी नफा होतो. आणि ती रात्री उशीरापर्यंत काम करते. |
19
|
ती स्वत:चे सूत स्वत: कातते आणि स्वत:चे कपडे विणते. |
20
|
ती नेहमी गरीबांना देते आणि ज्यांना गराज असते अशांना मदत करते. |
21
|
जेव्हा बर्फ पडतो (म्हणजेच फार थंडी असते) तेव्हा ती आपल्या कुटुंबाची काळजी करत नाही. तिने त्या सर्वाना चांगले, गरम कपडे दिलेले असतात. |
22
|
ती अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला पांघरुणे तयार करते. चांगल्या कापडापासून केलेले कपडे ती वापरते. |
23
|
लोक तिच्या नवऱ्याचा आदर करतात. तो देशाचा एक नेता असतो. |
24
|
ती खूप चांगली उद्योगी - स्त्री असते. ती कपडे आणि पट्टे तयार करते आणि ती त्या वस्तू त्या व्यापाऱ्यांना विकते. |
25
|
ती खूप ताकतवान आहे आणि लोक तिला मान देतात ती भविष्याबद्दल विश्वास आहे. |
26
|
ती शहाणपणाचे बोल बोलते. ती लोकांना प्रेमळ व दयाळू असावे असे शिकविते. |
27
|
ती कधीही आळशी नसते. ती तिच्या घरातील गोष्टींची काळजी घेते. |
28
|
तिची मुले तिच्याबद्दल चांगले बोलतात. तिचा नवरा तिच्याबद्दल अभिमान बाळगतो आणि म्हणतो, |
29
|
“चांगल्या स्त्रिया खूप आहेत. पण तू सर्वांत चांगली आहेस.” |
30
|
मोहकता आणि सौंदर्य तुम्हाला फसवू शकेल. पण जी स्त्री परमेश्वराचा आदर करते तिची प्रशांसा केली पाहिजे. |
31
|
तिला साजेसे बक्षीस तिला द्या. लोकांमध्ये तिची प्रशंसा करा. तिने ज्या गोष्टी केल्या आहेत त्याबद्दल तिची स्तुती करा. |
Proverbs 31:1 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...