1
|
ही माझी तुम्हांला भेटण्याची तिसरी वेळ आहे. ‘प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीने सिद्ध करावी.’ |
2
|
मी अगोदरच सूचना दिलेली होती जेव्हा दुसन्यावेळी मी तुमच्याबरोबर होतो. आता मी तुमच्यात नसताना ती सूचना पुन्हा सांगतो: माइया परत येण्याच्या वेळी अगोदर ज्यांनी पाप केले त्यांना मी सोडणार नाही किंवा दुसन्यांनाही नाही. |
3
|
खिस्त माझ्याद्वारे बोलतो याविषयीच्या पुराव्याची तुम्ही मागणी करीत आहात. तुमच्याशी व्यावहार करताना तो अशक्त नाही तर सामर्थ्यशाली आहे. |
4
|
कारण जरी तो अशक्तपणात वधस्तंभावर खिळला गेला तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत आहे, कारण आम्हीही त्याच्यामध्ये अशक्त आहोत. तरी देवाच्या सामर्थ्याने त्याच्याबरोबर तुमच्यासाठी आम्ही जिवंत असू. |
5
|
तुम्ही विश्वासात आहा की नाही याविषयी स्वत:ची परिक्षा पाहा. पारख करा. ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, ह्याची जाणीव तुम्हांला होत नाही का? जर अर्थात तुम्ही परीक्षेत उतरला नाही तर. |
6
|
आणि माझा विश्वास आहे की, तुम्ही हे शोधाल की, या परीक्षेत आम्ही अनुत्तीर्ण झालो नाही. |
7
|
आता आम्ही देवाजवळ आशी प्रार्थना करतो की, तुम्ही काहीही चुकीचे करणार नाही. आम्ही परीक्षेत उत्तीर्ण व्हावे यासाठी नव्हे तर अशासाठी की, आम्ही जरी नाकारलेल्यासारखे असलो तरी तुम्ही चांगले काम करावे. |
8
|
कारण खरेपणाविरुद्ध आम्हांस काही करता येत नाही. तर खरपणासाठी करता येते. |
9
|
जेव्हा आम्ही अशक्त आहो आणि तुम्ही शक्तीमान आहा, तेव्हा आम्ही आनंद करतो. आणि आम्ही प्रार्थनाही करतो, मी अशी की, तुम्ही पूर्ण व्हावे. |
10
|
यामुळे तुम्हापासून आम्ही दूर असताना हे तुम्हाला लिहितो, यासाठी की, प्रभुने जो अधिकार तुम्हांला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे तर वृद्धीसाठी मला दिला त्याप्रमाणे जवळ आल्यावर मी कठोर वागू नये. |
11
|
शेवटी बंधूनो, आपण भेटू या, परिपूर्णतेकडे ध्येय असू द्या. जसे मी तुम्हांला सांगितले तसे करा. एका मनाचे व्हा, शांतीने राहा. आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर असेल. |
12
|
पवित्र चुंबनाने एकमेकास भेटा. |
13
|
सर्व संत आपणांस सलाम सांगतात. |
14
|
प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीति आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वाबरोबर असो. |
2-Corinthians 13:1 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...