येशू त्या लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे असलेले काही असे आहेत की. ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही.”
तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करण्यासाठी आला पाहिजे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दु:खे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे?
आणि जेव्हा तो त्याला धरतो तेव्हा त्याला खाली आपटतो व तोंडाला फेस आणतो, दात चावतो व नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्याला काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.”
नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणाले आणि जेव्हा त्या आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळवटून टाकले, तो जमिनीवर पडला आणि तोंडाला फेस आला आणि तो लोळू लागला.
येशूने लोकसमुदाय त्याच्याकडे धावात येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे याला मुके बहिरे करणाऱ्या आत्म्या मी तुला आज्ञा करतो की, याच्यातून बाहेर नीघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको.”
कारण तो आपल्या शिष्यांना शिकवीत होता. तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून माणसांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला ठार मारतील. परंतु मारला गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उठेल.”
मग येशू खाली बसला, त्याने बारा जणांना बोलावून त्यांना म्हटले, “जर कोणाला पहिले व्हावयाचे असेल तर त्याने शेवटले झाले पाहिजे आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”
“जो कोणी ह्यासारख्या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो केवळ माझाच स्वीकार करतो असे नाही तर ज्याने मला पाठविले त्याचाही स्वीकार करतो.
माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला देवापासून परावृत्त करील, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकून देणे हे त्याच्यासाठी बरे आहे.
(43-44) जर तुझा उजवा हात तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा व्यंग असून जीवनात जाणे बरे.
(47-48) जर तुझा उजवा डोळा तुला पाप करावयास लावितो तर तो काढून टाक. दोन डोळे असून जेथे त्यांना खाणारे किडे मरत नाहीत आणि अग्नि विझत नाही अशा नरकात फेकले जावे यापेक्षा एक डोळा असून देवाच्या राज्यात जाणे हे बरे.