English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Jeremiah Chapters

Jeremiah 11 Verses

1 यिर्मयाला मिळालेला संदेश असा होता: हा संदेश परमेश्वराचा होता:
2 “यिर्मया, या कराराची कलमे ऐक यहूदाच्या लोकांना या कलमांबद्दल सांग. यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनाही सांग.
3 परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो ‘जे कोणी या कराराचे पालन करणार नाहीत. त्यांचे वाईट होईल.’
4 तुमच्या पूर्वजांशी केलेल्या कराराबद्दल मी बोलत आहे. त्यांची मिसर देशातून सुटका करताना मी त्यांच्याशी हा करार केला होता. त्या वेळी मिसर देश म्हणजे पुष्कळ संकटांची भूमी होती. लोखंडालाही वितळवू शकणाऱ्या भट्टीप्रमाणे तो देश होता. मी त्या लोकांना सांगितले की तुम्ही माझी आज्ञा पाळलीत, तर तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईन.
5 “तुमच्या पूर्वजांना दिलेल्या वचनाकरिता मी हे केले. दूध व मध यांची रेलचेल असलेली सुपीक भूमी द्यायचे मी त्यांना कबूल केले होते. त्याच भूमीवर तुम्ही आता राहत आहात.”मी (यिर्मयाने) ‘होय, परमेश्वरा!’ म्हणून पुष्टी दिली.
6 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, यहूदाच्या शहरांतून व यरुशलेमच्या रस्त्यांतून हा संदेश शिकव. संदेश असा आहे. कराराच्या शर्ती ऐका आणि त्यांचे पालन करा.
7 मिसरच्या बाहेर येताना म्हणजेच मिसरमधून सुटका करताना मी तुमच्या पूर्वजांना इशारा देत आलो आहे की माझी आज्ञा पाळा.
8 पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. ते दुराग्रही बनले आणि त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीला आवडेल तेच त्यांनी केले. माझ्या आज्ञा न पाळल्यास त्यांचे वाईट होईल असे करार सांगतो. मी त्यांना माझ्या आज्ञा पाळण्यास सांगितले, पण त्यांनी ते ऐकले नाही, म्हणून करारात उल्लेखलेल्या सर्व वाईट गोष्टी मला त्यांच्याबाबत कराव्या लागल्या.”
9 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, यहुदातील आणि यरुशलेममधील लोकांनी गुप्त योजना आखल्याचे मला माहीत आहे.
10 त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या पापांची ते पुनरावृत्ती करीत आहेत. त्यांच्या पूर्वजांनी माझे संदेश ऐकण्याचे नाकारले. त्यांनी दुसऱ्या देवांचे अनुसरण केले. त्यांची पूजा केली. इस्राएल व यहूदाच्या वंशजांनी, त्यांच्या पूर्वजांनी माझ्याशी केलेल्या, कराराचा भंग केला आहे.”
11 म्हणू परमेश्वर म्हणतो, “मी यहूदाच्या लोकांना कसल्यातरी भयंकर संकटात टाकीन. त्यातून त्यांना त्यांची सुटका करुन घेता येणार नाही. त्यांना दु:ख होईल आणि मदतीसाठी ते माझा धावा करतील. पण मी त्यांचे ऐकणार नाही.
12 यहूदातील व यरुशलेममधील लोक त्या मूर्तीकडे जातील. त्यांची प्रार्थना करुन मदत मागतील ते त्या मूर्तीपुढे धूप जाळतात. पण त्या भयंकर संकटकाळी लोकांना मदत करणे त्या मूर्तीना शक्य होणार नाही.
13 “यहूदावासीयांनो, तुमच्याकडे बऱ्याच मूर्ती आहेत. यहूदामध्ये जेवढी नगरे आहेत, जवळजवळ तेवढ्याच मूर्ती असतील. तिरस्करणीय बआल देवाची पूजा करण्यासाठी तुम्ही ज्या वेदी बांधल्या आहेत, त्याही जवळजवळ यरुशलेममधील रस्त्यांच्या संख्येइतक्या असतील.
14 “यिर्मया, तुझ्यापुरते बोलायचे झाल्यास, तू यहूदाच्या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस. त्यांच्यासाठी आळवणी करु नकोस. मी काही ऐकणार नाही. जेव्हा ते दु:ख भोगायला लागतील, तेव्हा माझा धावा करतील, पण ती त्यांचे ऐकणार नाही.
15 “माझी प्रेमिका (यहूदा) माझ्या घरात (मंदिरात) का? तिला तेथे येण्याचा काही अधिकार नाही. तिने बरीच पापे केली आहेत. यहूदा, तुझी विशेष वचने आणि प्राण्यांचे बळी तुला विनाशापासून तारतील, असे तुला वाटते का? मला यज्ञ अर्पण करुन तू शिक्षा टाळू शकशील असे तुला वाटते का?”
16 “दिसावयास देखणे असणाऱ्या हिरव्यागार जैतुन झाडाचे’ नाव परमेश्वराने तुला दिले. पण जोराच्या वादळाने देव त्या झाडाला आग लावील आणि त्याच्या फांद्या जाळून टाकील.
17 सर्वशक्तिमान परमेश्वराने तुझे रोपटे लावले, आणि आता तोच तुझ्यावर संकटे येणार असे म्हणतो. का? कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी कुकर्मे केली. त्यांनी ‘बआल’ देवाला यज्ञ अर्पण केले म्हणून मला राग आला.”
18 अनाथोथचे लोक माझ्याविरुद्ध कट करीत असल्याचे परमेश्वराने मला दाखविले. परमेश्वराने मला ते करीत असलेल्या गोष्टी दाखविल्या, त्यावरुन ते माझ्याविरुद्ध असल्याचे कळले.
19 लोक माझ्याविरुद्ध असल्याचे समजण्यापूर्वी मी कत्तल होण्याची वाट पाहणाऱ्या गरीब कोकरासारखा होतो. ते माझ्याविरुद्ध आहेत याची मला कल्पना नव्हती. “आपण या झाडाचा आणि त्याच्या फळांचा नाश करु. आपण त्याला मारुन टाकू म्हणजे लोक त्याला विसरतील” असे ते माझ्याबद्दल म्हणत.
20 पण परमेश्वरा तू खरा न्यायी आहेस. लोकांच्या ह्दयांची व मनांची कशी परीक्षा करावयाची हे तू जाणतोस. मी तुला माझे मुद्दे सांगेन आणि त्यांना योग्य शिक्षा देण्याचे तुझ्यावर सोपवीन.
21 अनाथोथचे लोक यिर्मयाला मारायचे ठरवीत होते. ते लोक यिर्मयाला म्हणाले, “परमेश्वराच्या नावावर भविष्यकथन करु नकोस, नाहीतर आम्ही तुला ठार करु” देवाने अनाथोथच्या लोकांबद्दल निर्णय घेऊन टाकला.
22 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणाला, “लवकरच अनाथोथच्या त्या लोकांना मी शिक्षा करीन. त्यांचे तरुण युद्धात कामी येतील. त्यांची मुलेमुली भुकेने मरतील.
23 अनाथोथमधील एकही माणूस शिल्लक राहणार नाही. कोणीही वाचणार नाही. मी त्यांना शिक्षा करीन. मी त्यांचे वाईट घडवून आणीन”
×

Alert

×